IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

आय कॅन...वी कॅन!

20 mins. read

Published in the Sunday Sakal on 05 May, 2024

प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये एक जागा असते, जिथे कामाव्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी चर्चिल्या जातात. बॉलिवूड हॉलिवूड ओटीटी क्रिकेट राजकारण गॉसिप मग ते मॅनेजरबद्दल, ऑर्गनायझेशनबद्दल, सहकाऱ्यांबद्दल किंवा मग अगदी पर्सनल लाइफ, घरचे प्रॉब्लेम्स, हा असा का वागला, ती असं का बोलली.. ह्या सगळ्याचं चर्वित चर्वण करायला एक जागा आणि एक वेळ लागते. आमच्याकडे ती जागा व वेळ बहुतेक करून लंचटाइमची असते. एच आर ने ठरवून दिलेली वेळ पंचेचाळीस मिनिटांची असते. किती गप्पा मारायच्या आहेत वा किती गॉसिप्स एकमेकांमध्ये शेअर करायची आहेत त्याप्रमाणे बिचाऱ्या जेवणाला वेळ मिळतो. कधी पंधरा मिनिटात मग जेवण उरकून गॉसिप गोष्टींना महत्व मिळतं तर कधी मस्त तीस पस्तीस मिनिटं देऊन जेवणाला न्याय दिला जातो. हॉलिवूड सिरीज मध्ये ही जागा किंवा तिथल्या अशा चर्चांसाठी जी जागा दाखवली जाते ती वॉटरकूलर वा कॉफी मशीनची रूम, `वॉटरकूलर टॉक्स’ म्हणून ह्या चर्चा प्रसिद्ध. ह्या वेळेसाठी किंवा त्या जागी जाण्यासाठी आपण वाट बघत असतो. आम्हीही असेच त्या लंचटाइमकडे डोळे लावून बसतो. थोडं लूज आऊट होणं ही गरजेचं असतं. सतत स्ेट फेस ठेवून स्ॅटजी टार्गेट्स प्रॉब्लेम्स सोल्युशन्स ह्या सगळ्या आव्हानांचा सामना करीत असताना थोडावेळ कुठेतरी मोकळं ढाकळं व्हायला हवंच नं.

मागच्या आठवड्यात असेच लंचला एकत्र बसलेलो असताना विषय निघाला क्रिकेटचा. आयपीएल सुरू आहे नं. लगेच सगळ्यांना म्हटलं, ‘अरे कुणीतरी क्रिकेटवर बोला सुधीरसरांशी‘. मला क्रिकेटचं ज्ञान आणि आवड यथातथाच. कोण कोणाशी कुठे खेळतोय हा माझा प्रश्‍न. पत्नीने पतीला आनंदात सुख दु:खात साथ द्यायची असते पण ह्या क्रिकेटच्या आनंदात मी काही सुधीरला साथ देऊ शकले नाही ह्याचं दाखवण्यापुरतं दु:ख मला आहे. पुर्वी मुलं घरात असायची तेव्हा क्रिकेट एकत्र बघितलं, चर्चिलं जायचं. नील राज दोघंही क्रिकेट खेळायचे. लहान मुलांच्या मनावर काय गोष्टी कसा परीणाम करून जातील सांगता येत नाही. सतरा अठरा वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये चालणारं बेटिंग आणि त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी एकदम प्रकाशझोतात आल्या आणि आमच्या धाकट्या मुलाने राजने क्रिकेटला रामराम ठोकला. काय त्याच्या मनाने घेतलं काय माहीत पण त्यानंतर आजतागायत ना त्याने कधी क्रिकेटचं नाव काढलं ना मॅच बघितली.  त्यानंतर आमच्या घरात मी आणि राज क्रिकेट न आवडणारे आणि सुधीर नील क्रिकेटप्रेमी असे गट पडले. आता हेताने नीलच्या आयुष्यात प्रवेश केला आणि क्रिकेट प्रेमींचं पारडं जड झालं. मुलांची आजीही तशी क्रिकेटप्रेमी, त्यामुळे चार विरूद्ध दोन असा प्रकार. त्यात राज गेला युएसएला, त्यामुळे चार विरूद्ध एक झाल्याने मी एकटी पडले. विरोधकांची संख्या नेहमी कमी ठेवावी असं म्हणतात त्यामुळे मी सुद्धा माझा क्रिकेट न आवडणाऱ्यांचा पक्ष सोडून क्रिकेटप्रेमी गटात घुसायचा प्रयत्न करतेय. तसाही निवडणूकांचा सीझन आहे. भविष्यातल्या संकटांचा विचार करून एकटं पडण्यापेक्षा घरातल्या घरात थोडा दलबदलूपणा केला तर काय हरकत आहे. सो सध्या मला थोडंसं कळायला लागल्यामुळे मी सुद्धा चर्चांमध्ये भाग घेते. आणि ह्या लंचटाइम गप्पांमध्ये थोडं सुपरफिशियल नॉलेज चालतं, तिथे विश्‍लेषण थोडंच करायचं असतं. तर त्यादिवशी विषय चर्चिला जात होता, `अरे यार मुंबई इंडियन्स हरतंय’ अर्ध लंच टेबल दु:खात बुडलेलं. माझा प्रश्‍न, `पण तुम्हाला मुंबई इंडियन्सच्या हरण्याचं दु:ख का?’ माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत तिरकस प्रश्‍न आला, `म्हणजे काय? आपण मुंबईचे म्हणून आपली टीम मुंबई. आपली टीम हरत असली तर दु:ख नाही होणार?’ ज्या जोशात प्रश्‍न आला त्याला माझा प्रतिप्रश्‍न,`आयपीएलमध्ये भारताच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत नं? मग तुम्ही मला सांगा तुम्ही प्रथम भारतीय की प्रथम मुंबईकर?’ आधी कोफ्लबडी की आधी अंड सारखा गुगली प्रश्‍न मी टाकला. `भारतातली कोणतीही टीम ही तुमची टीम होऊ शकते नं. देश पहिला. मग आपण मुंबईपुरताच मर्यादित विचार का करतो?’ आता संवाद परिसंवाद वादविवादाकडे झेपावताना दिसला. माझ्यात `चक दे इंडिया’ मधला `कोच कबीर‘ संचारला होता. `चला, मनापासून सांगा बरं कुणाला कोणती टीम आवडते? विसरून जा तुम्ही मुंबईचे आहात’. आणि खरंच मुंबईचं झापड डोळ्यावरून काढल्यावर कुणी म्हणालं, ‘मला चेन्नर्इ सुपरकिंग्ज आवडते‘ तर कुणी म्हणालं ‘मला राजस्थान रॉयल्स’. कुणाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या टीम ने एकदातरी जिकावं म्हणून प्रार्थना कराविशी वाटते तर कुणाला गुजरात टीमवर असलेल्या `परफॉर्मन्स प्रेशर’ची काळजी वाटतेय. एकाने म्हटलं ‘अरे, हैद्राबादवाली टीम मला आवडत, सायलेंटली परफॉर्म करताहेत, पुढे येताहेत‘. एकंदरीत लंच टेबलाने आता फक्त मुंबई केंद्रीत न राहता आपला दृष्टीकोन भारतव्यापी केला होता.

मुंबई टीम हरतेय म्हणून कुणीतरी जिंकतंय आणि त्या जिंकण्यापाठची जिद्द महत्वाची. कारण मुंबई टीममध्ये सर्वात चांगले प्लेअर्स असणार, त्यांना सर्वात चांगल्या फॅसिलिटीज्‌‍ असणार आणि त्याचं प्रेशर इतर टीममधल्यांना असणार हे स्वाभाविक आहे. पण हा खेळ आहे आणि त्या खेळात मी त्या मैदानावर नेमंक काय करतोय ह्यावर सगळं अवलंबून आहे. इथे ना मला कुणी रोखू शकत ना अडथळे आणू शकत. आणि मग जो चांगला परफॉर्म करेल त्याच्या बाजूने मी जार्इन किंवा जाते. मी एक भारतीय आहे आणि माझ्या प्रोत्साहनाची त्या खेळाडूला गरज आहे आणि ते मी त्याला देणार कारण त्याचं चांगलं खेळणं हा चमत्कार नाहीये तर त्याने केलेल्या अखंड मेहेनतीचं, मार्गातल्या अडथळ्यांच्या शर्यतीला पार करीत इथवर पोहोचल्याचं, आयुष्यातल्या दु:खांना-निराशेला मागे टाकत फक्त एकाच ध्येयाकडे लक्ष केंद्रित केल्याचं ते फळ आहे. अनेकांचं प्ररेणास्थान बनण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि आपण एकशे तीस कोटी भारतीय जेव्हा जातीच्या धर्माच्या शहरांच्या राज्यांच्या सीमा पार करून खुल्या दिलाने, मोकळ्या मनाने असं पुढे जाणाऱ्यांसाठी आपल्या प्रोत्साहनांची प्रार्थनांची पूंजी मोकळी सोडू तेव्हा तो एक एक खेळाडू, आहे त्यापेक्षा अव्वल बनू शकेल. मेहनतीला जोड लागते ती प्रोत्साहनाची आणि का नाही आपण आपल्या खेळाडूंना ती खैरातीसारखी वाटायची? क्रिकेट एके क्रिकेट असणाऱ्या आपल्या देशात आता वेगवेगळ्या खेळांचे वारे जोरात वाहू लागलेत ही चांगली गोष्ट आहे आणि सरकार त्यासाठी करीत असलेले प्रयत्न बघून बरं वाटतं. कितीही व्यस्त असले तरी आपले पंतप्रधान खेळाडूंचं प्रत्यक्ष अभिनंदन करण्याला अग्रक्रम देतात ही गोष्ट निश्चितपणे वाखाणण्यासारखी आहे. ऑलिम्पिक्समध्ये वा कोणत्याही इंटरनॅशनल गेम्समध्ये का बरं सतत अमेरिका चायना किंवा युरोपातील देशांनी जास्तीत जास्त मेडल्स घेऊन जायची? आपल्या एकशे तीस कोटींमधून का नाही निर्माण होऊ शकत हे सितारे? घरातलं प्रोत्साहन, शाळेतून दिली गेलेली दिशा, सरकारने सर्व प्रकारच्या खेळांसाठी निर्माण केलेली अनबायस्ड इकोसिस्टम आणि तमाम भारतवासियांचे प्रत्येक खेळाडूला मनोभावे दिलेले शुभाशिर्वाद नक्कीच क्रांती घडवतील. हे घडत नाहीये असं नाहीये. पण भारताच्या अगदी कानाकोपऱ्यातून, निम्न आर्थिक स्तरात आयुष्याची लढाई लढणाऱ्यांतून हे हीरे शोधले पाहिजेत. एक एक जण महत्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं पाहिजे. तेच एक एक जण पूर्ण करतील आपलं गेम्स कॅटॅगरीतलं कॉम्पिटिशन टार्गेट. चायनाची बरोबरी किंवा आपल्याला त्याच्यापुढे जायचं असेल तर हे एक टार्गेट आपण ठेवू शकतो नं, की आम्हाला 2032 च्या ऑलिम्पिक्समध्ये चायनाएवढी मेडल्स मिळाली पाहिजेत. खूप जास्त होतंय का टार्गेट? मग दोन पर्याय आहेत. 2032 ला चायनाच्या साठ टक्के किंवा 2036 ला चायनाएवढी. अकरा किंवा पंधरा वर्ष आहेत आपल्याला मुलांची अगदी लहानपणापासून तयारी करून घ्यायला. चायनाचं टार्गेट घ्यायचं नसेल तर आपण अमेरिकेकडे बघू शकतो. देश मोठा पण लोकसंख्या फक्त 35 कोटीच्या आसपास, आणि त्यातून ते एवढे खेळाडू निर्माण करू शकतात मग आपले 130 कोटी? मान्य आहे तिथे सुविधा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, पण आपणही पॉर्इंट टू पॉइंट सुविधा निर्माण करू शकतो. सुविधा नसल्यामुळे मुलं मागे पडली हे पातक आपल्या डोक्यावर आपण घेऊ शकत नाही जेव्हा आपण येणाऱ्या भविष्यात एक ग्लोबल पॉवर निर्माण करणार आहोत. मार्केटिंगमध्ये आम्हाला एक थिअरी शिकवली जाते. ‘बाय डीफॉल्ट - बाय डीझाइन'. आत्तापर्यंत आपल्यात जे सितारे निर्माण झाले त्यांना किंवा त्यांच्यातील टॅलेन्टला, मेहनतीला कदाचित चांगल्या फॅसिलिटीज्‌‍ मिळाल्या असतील, चांगले प्रशिक्षक लाभले असतील. ते खेळाडू पुढे आले हे स्टार्ट अप कंपन्यांसारखं थोडंसं ‘बाय डीफॉल्ट‘ झालं असेल पण नंतर त्याला ‘बाय डीझाइन‘ म्हणजे ठरवून पैलू पाडले गेले असतील. आता सर्व खेळांचा विचार करायचाय आणि भारतातल्या अगदी छोट्यात छोट्या गावातील टॅलेंटचा विचार करायचाय. बाय डीझाइन म्हणने स्ट्रॅटेजी फूलप्रूफ करायचीय. लक्ष्य 2032 वा 2036 ऑलिम्पिक्स वा फुटबॉल वर्ल्ड कप वा विम्बल्डन! आणि हे एवढं पक्कं ठरवायचंय की सरकार कुणाचंही येवो वा जावो, ही प्रगती थांबणार नाही. कबड्डी खो-खो युरोप अमेरिकेत वाहवा होत खेळले जातील का कधी? का नाही, सरकारने ठरवलं तर या मार्केटिंगच्या युगात काहीही अशक्य नाही. एक देश, एक निषाण, एक निवडणूक, एक संविधान, वसुधैव कुटुंबकम्‌‍ अशा छान छान स्लोगन सोबत ‘एक देश अनेक खेल‘ सारखं काहीतरी एक आम्हा भारतीयांपुढे ठेवणं महत्वाचं आहे. स्लोगन्स आर लाइक मॅजिक. बघा नं सध्या एवढ्या ठिकाणी मुंबई खोदून ठेवलीय, ॅफिक जाम ने बेजार झालोय पण त्या ट्रॅफिक जॅममध्ये बाजूला भिंतीवर लिहिलेली पाटी दिसते, 'मुंबई के उज्ज्वल भविष्य के लिए‘ आणि आपण शांत होतो. ही जादू आहे त्या चार शब्दांची. खेळांसाठी इट हाय टाइम नाऊ. आपणही एक सामान्य नागरिकाच्या भूमिकेतून हे भविष्यातले सितारे आपल्या आजुबाजूला कुठे ‘यस आय कॅन' म्हणत त्यांच्यातलं टॅलेंट दर्शवित असतील तर मनःपूर्वक त्या ‘ऑय कॅन'ला 'वी कॅन' ची साथ दिली पाहिजे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

काही देशांच्या नावाची गंमत असते, म्हणजे त्यांच्या अधिकृत नावांपेक्षा प्रचारातलं नावच अधिक परिचयाचं असतं. ईस्ट एशियातील ‘रिपब्लिक ऑफ चायना’ हा देश कुठे आहे विचारलं तर अनेकांना सांगता नाही येणार पण ‘तैवान कुठे आहे?’ विचारलं तर लगेच सांगू शकतील. कारण तैवानचं अधिकृत नाव आर.ओ.सी.म्हणजेच रिपब्लिक ऑफ चायना आहे हेच अनेकांना माहित नसतं. चायनामधल्या अंतर्गत संघर्षात कम्युनिस्ट विचारसरणीच्या पक्षानं देशावर ताबा मिळवला आणि चेंग काइ शेख यांच्या पक्षाला तैवानचा आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून तैवानला ही ओळख मिळाली. तैवान हा बेटावरचा देश आकारानं इतका लहान आहे की कारमधून फक्त आठ तासात तुम्ही या बेटाची प्रदक्षिणा करू शकता. इथल्या हाय स्पीड ट्रेननं दक्षिणेकडून उत्तरेकडचा प्रवास फक्त दोन तासात करता येतो. अशा या तैवानमधलं एक अनोखं पर्यटक आकर्षण म्हणजे ‘रेनबो व्हिलेज’. तैवानच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ताइचुंग शहरात हे नावाप्रमाणेच रंगिबेरंगी गाव आहे. आज आकर्षक चित्रांनी सजलेलं हे गाव, ही वस्ती मुळात 1940-50च्या दशकात लष्करातल्या लोकांसाठी तात्पुरती वसाहत म्हणून उभारण्यात आली होती. नव्वदच्या दशकात रीडेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये अशा वसाहती तोडून तिथं नवीन इमारती बांधायला सुरुवात झाली तेव्हा ताइचुंगमधल्या अशा वस्तीतल्या एका माजी सैनिकाने-हुआंग युंग फु यानं इथली घरं रंगवायला सुरुवात केली. इतकी वर्षे ज्या घरांनी आसरा दिला, ज्या परिसरात राहिलो त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हुआंगने ती घरं बाहेरून-आतून रंगवायला सुरुवात केली. हळू हळू त्या परिसरातील शिल्लक घरांचं रूपच पालटलं. हुआंग हा मूळचा हाँगकाँगचा. 1946 मध्ये तो चायनाच्या रीव्होल्युशनरी आर्मीत सामील झाला. पुढे या पक्षाचा पराभव झाल्यावर तोही तैवान म्हणजे रिपब्लिक ऑफ चायनामध्ये आला. इथे आल्यावर ताइचुंगमधल्या या गावात जेव्हा तो राहू लागला तेव्हा इथं 1200 लोक रहात होते. नंतर  रीडेव्हलपमेंट योजनेत हुआंगच्या गावातील बहुतेकांनी नुकसान भरपाई घेऊन घरं खाली केली, तेव्हा त्या वस्तीत फक्त अकरा घरं आणि एकटा हुआंग उरला. त्याने आधी पेंटिंग करून स्वतःचं घर सजवलं, मग शेजारचं रिकामं घर, मग पलिकडचं घर असं करीत करीत त्याने पक्षी, पारंपरिक नक्षी, प्राणी, माणसांचे चेहरे, भौमितिक आकार यांनी हा परिसर नटवून टाकला. या भागातून जाणाऱ्या काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ही कलाकुसर पाहिली आणि ती जगासमोर आली. या कलाकारीमुळे या परिसराला रेनबो व्हिलेज हे नाव मिळालं तर ही कलाकारी करणाऱ्या हुआंगला ‘ग्रँडपा रेनबो’ अशी नवी ओळख मिळाली. 2024 च्या जानेवारी महिन्यात ग्रँडपा रेनबोंनी वयाच्या 101व्या वर्षी जगाचा निरोप घेतला पण त्यांची चित्रकला आणि त्यामुळे जीवंत झालेली घरं मात्र रेनबो व्हिलेजमध्ये जगभरातल्या पर्यटकांचे मनोरंजन करीत आहे. वीणा वर्ल्डच्या कोरिया तैवान, जपान कोरिया तैवान, हाँगकाँग मकाव तैवान आणि कोरिया तैवान ह्या सहलींमध्ये आपण ह्या रेनबो व्हिलेज ला आवर्जून भेट देतो.


नियोजनपूर्वक पर्यटन म्हणजे आनंदाची हमी!

Veena World Travel Mission

मला स्वतःला भटकंतीचं वेड आहे, मी दरवर्षी किमान 5 ते 6 नवीन देश बघतोच. आता हे मला कसं जमतं? तर मी अतिशय अभ्यासपूर्वक माझ्या सहलींचं नियोजन करतो. त्यासाठी मला मोलाची मदत मिळते ती वीणा वर्ल्डची. 2016 साली मी पहिल्यांदा वीणा वर्ल्डच्या प्रभादेवी ऑफिसमधून टूर बुक केली, तेव्हापासून गेली नऊ वर्ष सातत्याने मी फक्त वीणा वर्ल्डबरोबर सहल करून माझं भ्रमंतीचं स्वप्न पूर्ण करतोय. मी ह्या सहली करायला सुरुवात केली आणि मला अगदी हवा होता तसा ट्रॅव्हल कन्सलटंट पार्टनर कम गाइड मिळाला. मला तर सगळं जग बघायचं आहे कारण ‘ए खुदा पता नाहीं तुझे कब अपनी आखों से मैं खुद देख पाऊंगा। क्यूँ ना तब तक तेरी बनायी हुई दुनिया में तुझे देख लूं l' त्यामुळे मी वीणा वर्ल्डच्या प्रभादेवी ऑफिसमध्ये जाऊन मला कोणत्या देशांना भेट द्यायची आहे त्यांची यादीच देतो. नंतर त्यांच्या डेस्टिनेशन एक्सपर्ट कडून त्या देशांना भेट द्यायचा सर्वोत्तम काळ कोणता ते माहिती करून घेतो. मग टूर बूक करतो. आत्तापर्यंत वीणा वर्ल्डसोबत मी 59 देश पाहिले आहेत.

मी पाहिलेल्या देशांमधले नॉर्वे आणि फिनलँड हे मला सर्वात आवडलेले देश आहेत, म्हणजे मी त्यांना दोन वेळा भेट दिली आहे. दरवर्षाच्या सुरुवातीला मी ठरवतो की यावेळी तीन चारच देश बघायचे, पण हळू हळू माझं बजेट एक्स्टेंड होत जातं आणि वर्षाअखेरीला मी सात आठ देश बघितलेले असतात. मी कायम वीणा वर्ल्डबरोबर प्रवास करतो कारण त्यांच्या आयटीनररीज एकदम परफेक्ट असतात. त्यात महत्वाची सगळी स्थळं समाविष्ट असतात, प्रत्येक ठिकाणी भोजनाची व्यवस्था एकदम उत्तम असते. मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते वीणा वर्ल्डच्या टूर मॅनेजर्सचं. हे सगळे जाणकार, अनुभवी टूर मॅनेजर्स सहलीवरची कोणतीही परिस्थिती हाताळायला सक्षम आहेत हे मी अनुभवलं आहे. मी सगळ्या सहलींवर एकटाच जातो पण वीणा वर्ल्डबरोबर जातोय म्हटल्यावर माझे कुटुंबीय निर्धास्त असतात. मला आजही आठवतंय आमच्या साउथ कोरिया टूरवर वीणा वर्ल्डची संपदा  टूर मॅनेजर होती. तोपर्यंत मी नेहमी जेन्ट्स टूर मॅनेजर्सची सर्व्हिस अनुभवली होती, पण संपदाने त्याच दर्जाची, तितकीच तत्पर सेवा आम्हाला दिली. या टूरवर एकदा मुसळधार पाऊस पडत होता, तेव्हा संपदाने प्रसंगावधान राखून आम्हाला सगळ्यांना विचारलं की आत्ताचं लंच आपण बसमध्येच करूया का ? आणि लोकांच्या संमतीनंतर आम्हाला ते बसमध्येच दिलं. त्यामुळे आम्ही जणू एखाद्या घरगुती पिकनिकला आलोय असंच वातावरण निर्माण झालं. मला वाटतं वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स जेव्हा त्यांचा यलो टिशर्ट घालतात तेव्हा जणू ते सुपरहिरो बनतात. प्रत्येक टूरवरच्या नाश्‍ता भोजनाचेही मी न चुकता फोटो काढतो आणि माझ्या फेसबुक पेजवर अपलोड करतो. त्यातही मजा असते. माझ्या ह्या सगळ्या सहलींच्या आनंदी आठवणी मी छायाचित्रांमधून जपल्या आहेत.


काय बाई खाऊ

कसं गं खाऊ

नेकदा सामान्य नाम (कॉमन नाऊन) हेच विशेष नाम (प्रॉपर नाउन) बनून जातं. आपल्या सगळ्यांच्या माहितीचं उदाहरण म्हणजे ‘झेरॉक्स’, आता हे कंपनीचं नाव आहे पण फोटो कॉपीसाठी हेच नाव आपण सर्रास वापरतो. तसंच एका पदार्थाचं झालं आहे, इटलीला गेल्यावर ‘जेलातो’ अवश्‍य खा असं नेहमी सांगितलं जातं. खरंतर जेलातो हे काही इटालियन आईस्क्रीमचं ब्रँड नेम नाही तर इटालियन भाषेत ‘आईस्क्रीम’ साठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यामुळे खरंतर कुठलंही आईस्क्रीम इटालियन भाषेत ‘जेलातो’च असतं. पण इंग्रजी भाषेत मात्र हा शब्द ‘इटालियन आईस्क्रीम’ म्हणून रुढ झाला आहे. हे जेलातो इटलीशी कसं जोडलं गेलं? तर इटलीमधील फ्लोरेन्स शहरात 16 व्या शतकात कोसिमो रुजीएरी ह्याने पहिल्यांदा जेलातो बनवलं असं मानलं जातं. कॅथरीन मेडीची (जी पुढे फ्रान्सची महाराणी झाली) हिच्या दरबारात भरलेल्या एका पाककला स्पर्धेत जेलातो बनवलं गेलं. ‘आजपर्यंतचा सर्वात अनोखा पदार्थ' बनवा अशीच ती स्पर्धा होती. साहजिकच जेलातोनं आपली एंट्री लक्षणीय केली. सतराव्या शतकात फ्रॅन्सेस्को प्रोकोपिओ कुतो या सिसिलीयन माणसाने पॅरिसमध्ये कॅफे सुरू करून लोकांना जेलातोची चटक लावली. आजही पारंपरिक पध्दतीने जेलातो तयार करताना त्यात दूध, क्रीम, साखर, फळं याचाच वापर केला जातो. जेलातो चविष्ट बनवण्यासाठी त्यात अंडी, काजू, हेझलनट, अक्रोड, बदाम असा सुकामेवा घातला जातो. शिवाय स्ट्रॉबेरी, रासबेरी, पीच, सफरचंद, संत्र, जर्दाळू अशी ताजी फळे वापरूनही जेलातोची टेस्ट खुलवली जाते. इटालियन जेलातो आणि आपण खातो ते आईस्क्रीम यात फरक म्हणजे जेलातो अधिक दाट असतं.  इतर आईस्क्रीम पेक्षा जेलातोमध्ये फॅट्स अगदी कमी असतात, त्यामुळे जेलातोची चव तुमच्या जिभेवर रेंगाळते. मग ओरिजिनल जेलातोचा स्वाद घेण्यासाठी चला वीणा वर्ल्डच्या इटली सहलीला. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हल्सचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सफ्लोअर सेलिब्रेट लाईफ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast


चलो कश्मीर!

Taking in the Surreal Beauty of Dal Jheel in Kashmir

समर व्हेकेशनमध्ये कश्मीरला जायचा आता आहे लास्ट चान्स

भू तलावरचा स्वर्ग ज्याला म्हटलं जातं ते कश्मीर निसर्गसौंदर्यानं जसं बहरून आलंय तसंच ते पर्यटकांनीही गजबजून गेलंय. काहीही म्हणा कश्मीरला पर्यटकांनी नेहमीच अग्रस्थान दिलंय. त्याची नजाकतच वेगळी. माझा पर्यटन प्रवास आता चाळीस वर्षांचा झाला, तेव्हापासून आजपर्यंत कश्मीरचा चार्म कधीही कमी झाला नाही. उलट आता सरकारच्या अनेक सुधारणांमुळे कश्मीर अधिकाधिक सुंदर व्हायला लागलंय. वीणा वर्ल्ड अकरा वर्षांचं झालं. ह्या अकरा वर्षात पूर, दरडी कोसळणं, अतिरेकी कारवाया ह्यामुळे अधूनमधून ब्रेक बसला तरी चान्स मिळाला रे मिळाला की कश्मीर पर्यटकांनी हाऊस फुल्ल झालेलं आम्ही पाह्यलंय. आता अतिरेकी कारवाया इतिहासजमा झाल्या. ह्यावर्षीही काश्‍मीर पर्यटकांच्या 'टॉप ऑफ द चार्ट' मध्ये आहे म्हणायला हरकत नाही. ह्या क्षणी वीणा वर्ल्डच्या 48 टूर्स शंभरहून अधिक टूर मॅनेजर्ससह कश्मीर मध्ये सुरू आहेत. आणि हे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे तसंच पुढे दोन महिने चालू राहणार आहे. कश्मीरच्या बऱ्याच सहली फुल्ल झाल्या असल्या तरी या आठवड्यापर्यंत काही टूर्स मध्ये जागा असतील. अजून बुकिंग केलं नसेल तर लागलीच वीणा वर्ल्डचं ऑफिस गाठा आणि चला कश्मीर ला. कश्मीर साठी जास्तीत जास्त पर्यटक पसंती देतात ती 6 दिवस, 7 दिवस व 8 दिवसांच्या रेग्युलर टूर्सना. काही सहली आम्ही अपग्रेडेड हॉटेल्सच्या पण आणल्या आहेत खास पर्यटकांच्या आग्रहास्तव. हॉटेल्सची नावं बघून मगच बुकिंग करा. सो, चलो, बॅग भरो, निकल पडो, ह्यावेळी कश्मीर ला वीणा वर्ल्ड सोबत. आणि ज्या पर्यटकांना वैयक्तिकरित्या जायचंय आणि त्यांच्या मनाप्रमाणे हॉटेल्स स्थलदर्शन ट्रान्सपोर्ट फ्लाइट्स हवी आहेत त्यांच्यासाठी वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलडे आहेच तसंच कश्मीर ला वीणा वर्ल्ड MICE द्वारे कॉर्पोरेट टूर्सही अरेंज करते बरं का!


वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

लास्ट मिनिट प्रायव्हेट हॉलिडे!

सध्या आपली लाइफ स्टाइल इतकी बिझी बिझी झाली आहे की अनेकदा हॉलिडेचं प्लॅनिंग करायलाही वेळ मिळत नाही. म्हणजे ते म्हणतात ना ‘खुद की अपॉइंटमेंट ही नहीं मिल रही’ तशातली गत आहे. पण जसजसा उन्हाळा वाढायला लागतो, अवती भवतीच्या लोकांचे सुट्ट्यांचे प्लॅन्स कानावर यायला लागतात तेव्हा मात्र 'हीच वेळ आहे एक झक्कास हॉलिडे घ्यायची' असं मनाला वाटतं. मग वाटतं आता  उशीर तर झाला नाही ना? लास्ट मिनिट हॉलिडे कसा शक्य आहे? इंटरनॅशनल डेस्टिनेशन्सवर जायचं तर व्हिसा, एअर तिकीट्स मिळतील का? डोमेस्टिक डेस्टिनेशन्सवर लास्ट मिनिट चांगली हॉटेल्स उपलब्ध असतील का? अहो, त्यासाठीच वीणा वर्ल्ड आहे ना! आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज डिव्हिजनकडून तुमचे हे सगळे प्रश्न सोडवले जातील. लास्ट मिनिट हॉलिडेसाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत ते तर पाहा.

तुम्हाला एक मस्त फॅमिली हॉलिडे घ्यायचा असेल तर साउथ ईस्ट एशियामधील सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग यांची निवड करावी. सिंगापूरमधल्या झू मध्ये तुम्ही जगभरातले वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघू तर शकताच पण तिथला ‘ब्रेकफास्ट इन द वाइल्ड’ हा तर घ्यायलाच हवा असा अनुभव असतो. सिंगापूरच्याच सेंटोसा आयलंडवरच्या ‘इक्वेरियस ओशन स्वीट्स’ मधला निवास तुमच्या हॉलिडेला एकदम नेक्स्ट लेव्हल वर नेतो. या दुमजली आलिशान घरात राहताना खालच्या मजल्यावरच्या मोठ्या खिडक्यांमुळे समुद्राखालची अद्भूत दुनिया तुम्ही बसल्याजागी पाहू शकता. हाँगकाँग मधील डिस्ने लँड काय किंवा मलेशियातील ‘लेगो लँड’ काय बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांनाही मज्जा करायला फुल्ल स्कोप मिळतो इथे. अशीच धम्माल तुम्ही अबुधाबीच्या यास आयलंडवर करू शकता.

लास्ट मिनिट हॉलिडे प्लॅन करताना इझी व्हिसासाठी ओळखल्या जाणाऱ्या मॉलदिव्हज्‌‍, बाली, थायलंड, श्रीलंका, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया या देशांचा विचार करू शकता. कमी अंतरावरचे देश म्हणून दुबई, नेपाळ यांचाही विचार करता येईल. असा हॉलिडे तुम्ही भारतातही एन्जॉय करू शकता. काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड, नॉर्थ ईस्ट, सिक्कीम-दार्जिलिंग ही ठिकाणं तर प्रसिध्द आहेतच, पण जरा वेगळी डेस्टिनेशन्स म्हणून उटी, कॉफीच्या मळ्यांचे कूर्ग किंवा मुन्नारच्या टी इस्टेट्सचा विचार करू शकता. तुमचा हॉलिडे जर थ्रिलिंग करायचा असेल तर रणथंबोर, बांधवगड, ताडोबा, जीम कॉर्बेट पार्क इथल्या टायगर सफारींचा पर्यायही तुम्ही निवडू शकता.

तुम्हाला कामाच्या प्रेशरमधून फ्रेश करणारा एकदम रोमँटिक हॉलिडे एन्जॉय करायचा असेल तर त्यासाठी बीच डेस्टिनेशन्स आहेतच. बाली सारखं निसर्गसुंदर किंवा सेशेल्ससारखं महासागरातलं मोती म्हणून ओळखलं जाणारं डेस्टिनेशन तुम्ही लास्ट मिनिट प्लॅन करूच शकता. मॉलदिव्हज्‌‍चे वॉटर व्हिला तर प्रसिध्दच आहेत शिवाय तिथे सीप्लेन ट्रान्सफर, अंडरवॉटर रेस्टॉरंट अशा अनोख्या सुविधांमुळे तुमचा हॉलिडे एकदम संस्मरणीय होऊन जातो. मॉरिशस आणि मॉलदिव्हज्‌‍ला जाणाऱ्या आमच्या अनेक गेस्टनी तिथलं नवीन आकर्षण ‘बीच बबल स्टे’ बूक केलं आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपला हॉलिडे अधिकच रीज्युविनेटिंग केला. मग आता आणखी वेळ नका घालवू, तुमचा लास्ट मिनिट हॉलिडे बूक करण्यासाठी आजच वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमला कॉन्टॅक्ट करा आणि मनासारखा प्रायव्हेट हॉलिडे एन्जॉय करा.

तुमच्या पर्यटनाचे इंट्रेस्टिंग किस्से जरूर कळवा Email: stories@veenaworld.com

May 04, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top