India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

हॉलिडे हवा तसा हवा तेव्हा!

6 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
6 Mins Read
January 21, 2023
January 21, 2023

Quick Summary

तुमच्या आवडीप्रमाणे स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रोसाठी कस्टमाईज्ड सेल्फ ड्राईव्ह हॉलिडे प्लॅन करा.

समुद्रकिनारी मोकळा दिवस मिळताच गाडी पार्क करा आणि स्वच्छ एड्रियाटिक पाण्यात पोहण्याचा ब्रेक घ्या.

गर्दी टाळण्यासाठी गूगल मॅपवर कमी ओळखीची बीचेस शोधा आणि हवामान छान असेल तेव्हा थांबा.

क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रोमध्ये लोकल्ससारखं सनबाथिंग आणि पोहण्याचा आनंद उन्हाळ्यात नक्की घ्या.

पॅरिससाठी 2 ते 3 रात्रींचं वास्तव्य वेगवेगळ्या प्रकारे कस्टमाईज करा आणि परिसर बघण्यासाठी जास्त दिवस ठेवा.

आयफेल टॉवरसाठी स्किप द लाईन तिकीट आणि बिहाइंड द सीन्स टूर घेऊन गर्दी टाळा आणि खास अनुभव मिळवा.

स्वत: गाडी चालवत स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रो बघण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीबरोबर कस्टमाईज्ड सेल्फ ड्राईव्ह हॉलिडे निवडला होता. आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमने आमच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आमच्या मनासारखा सहल कार्यक्रम आखून आमच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन केले होते.

‘किती सुंदर आहे ही जागा. आपण इथे थोडावेळ थांबून पोहूया का?’ माझ्या मैत्रिणीने विचारताच मी आमची गाडी पार्किंगमध्ये लावली. स्वच्छ सूर्यप्रकाशात एड्रियाटिक समुद्राचे पाणी चमकत होते. त्या आरसपाणी पाण्यातून ती स्वच्छ वाळू खालपर्यंत दिसत होती. थंड वारा वाहत होता आणि अतिशय प्रसन्न वाटत होते. मॉन्टेनेग्रो ते  क्रोएशियाच्या समुद्रकिनार्‍यावर त्या सुंदर दिवशी आम्हाला ती जागा खूपच आवडली. खरेतर त्या जागेचे नावसुद्धा आम्हाला माहीत नव्हते, ते आम्ही गूगल मॅपवर बघितले. तसा आजचा दिवस पूर्णपणे मोकळा असल्याने पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर आमचे कुठलेच स्थलदर्शन आयोजित केले नव्हते त्यामुळे इथे थांबायला काहीच हरकत नव्हती. त्यात ती जागा इतकी सुंदर होती की त्या स्वच्छ पाण्यात पोहण्याचा मोह आम्हाला सोडवेना. क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रोमध्ये असे अनेक बीचेस् दिसतात व तिथे उन्हाळ्यात सनबाथिंग आणि पोहण्याचा आनंद घेताना टूरिस्ट आणि लोकल्स समप्रमाणात दिसतात. क्रोएशियाच्या समुद्रात डुंबून आम्हीसुद्धा त्या लोकल लोकांप्रमाणे जगण्याचा आनंद घेतला.

स्वत: गाडी चालवत स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रो बघण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीबरोबर एक कस्टमाईज्ड सेल्फ ड्राईव्ह हॉलिडे निवडला होता. ग्रुप टूरबरोबर न जाता आम्ही वैयक्तिकरित्या प्रवास करत आमच्या हॉलिडेवर निघालो होतो. आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमने आमच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आमच्या मनासारखा सहल कार्यक्रम आखून आमच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन केले होते.

वैयक्तिकरित्या प्रवास करण्याची अनेक कारणे असू शकतात. काही पर्यटकांना सर्वात लक्झुरियस हॉलिडे हवा असतो तर काही लोकांना स्वत:हून फिरून त्या ठिकाणचे खाद्यपदार्थ चाखत, शहरातल्या कानाकोपर्‍यात लपलेले खजिने शोधून काढायचे असतात. अगदी दुकानात रेेडिमेड कपडे न विकत घेता आपल्या मापाप्रमाणे जसे आपण आपली लांबी, उंची इ.चे माप देऊन टेलरकडून आपले कपडे शिवून घेतो तसेच टेलरमेड किंवा आपल्या आवडीनुसार आपला हॉलिडे आपण कस्टमाईज्ड करून घेऊ शकतो. अर्थात त्यासाठी आमच्या टीमला सर्वप्रथम तुमच्या आवडी-निवडीची पूर्ण ओळख झाली पाहिजे.

आता बघा नं, जगातल्या एका सर्वात रोमँटिक शहराला म्हणजेच पॅरिसला भेट द्यायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारे दोन-तीन रात्रींचे वास्तव्य करत आपण हॉलिडे प्लॅन करू शकता. पॅरिस आणि पॅरिस सभोवतालचा परिसर बघायचा असेल तर तीन काय सात रात्रीसुद्धा पुरणार नाहीत. आपण जर आपल्या मुलांना घेऊन पॅरिसला भेट देणार असाल तर एक संपूर्ण दिवस युरो डिसनीमध्ये नक्कीच लागेल. तसे पॅरिसमध्ये डिसनीलँड पॅरिसचे दोन पार्क आहेत, डिस्नीलँड थीम पार्क आणि वॉल्ट डिसनी स्टुडिओज् पार्क. या दोन्ही पार्क्सना भेट द्यायची असेल तर पार्कमधल्या हॉटेलमध्ये राहणे योग्य ठरेल. इथे डिनर किंवा ब्रेकफास्टला मिकी माऊस व इतर डिसनी पात्रांना भेटण्याची उत्तम संधीसुद्धा मिळते. पॅरिसजवळच लहानांच्या आवडीचा अजून एक प्रसिद्ध थीम पार्क म्हणजे ‘पार्क अ‍ॅस्टेरिक्स’. आता थीम पार्कमध्येच तीन दिवस मजा केल्यावर पॅरिस शहर बघण्यासाठी केवळ दोन-तीन दिवसांचा हॉलिडे कसा पुरेल. आपण जर पॅरिस शहराची शान म्हणजेच आयफेल टॉवरला भेट देत असाल आणि हनिमून किंवा एक रोमँटिक हॉलिडे घेत असाल तर केवळ आयफेलला भेट देण्यापेक्षा तिथल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये पॅरिसचा पॅनोरॅमिक नजारा बघत लंच किंवा डिनरचा आस्वाद घेणे आपल्याला नक्कीच जास्त आवडेल नाही का? अगदी पर्यटकांच्या गर्दीपासून लांब रहायचे असेल तर ‘स्किप द लाईन’ असे खास तिकीटसुद्धा आपण घेऊ शकता. आपल्यातल्या उत्सुक व चिकित्सक मंडळींना आम्ही ‘बिहाइन्ड द सीन्स आयफेल टूर’ नक्कीच सुचवू. आपल्या गाईडबरोबर आयफेल टॉवरच्या इंजीन रूममध्ये जाऊन इथले एलीवेटर्स कसे काम करतात इथपासून ते त्या जमिनीखाली लपलेल्या एका ‘बंकर’ रूमला भेट देण्यापर्यंत अर्थातच आयफेल टॉवरवरून दिसणार्‍या नजार्‍याची मजा लुटत आपण आपली आयफेल टॉवरची टूर करू शकता. थोडक्यात काय शहर किंवा स्थलदर्शन तेच असले तरीही त्या टूरला आपण अनेक प्रकारे कस्टमाईज्ड करू शकतो.

कस्टमाईज्ड हॉलिडेज्मध्ये जसे स्थलदर्शनात आपल्याला अनेक पर्याय निवडता येतात तसेच वास्तव्यासाठीसुद्दा आपण अनेक पर्याय निवडू शकता. आपण जर ट्रेन,बस असे लोकल ट्रान्सपोर्ट वापरणार असाल तर नक्कीच सिटी सेंटर हॉटेल्स योग्य ठरतील. मग आपण स्थलदर्शनाची टूर संपल्यानंतरसुद्दा आपल्या मनाप्रमाणे फेरफटका मारू शकतो व लोकल मार्केट, लोकल फूड, शॉपिंग या सर्वांची पुरेपूर मजा घेऊ शकतो. आपले बजेट कळले की योग्य ते 3स्टार, 4स्टार किंवा 5स्टार हॉटेल आम्ही सुचवतो.काही पर्यटकांना पारंपरिक हॉटेल्स आवडतात तर काही मंडळींना अगदी मॉडर्न हॉटेल्स आवडतात. जगात बर्‍याच ठिकाणी शहराच्याजवळ  एक-दोन तासांवर अनेक सुंदर रीसॉर्ट्समध्ये सुद्दा आपण राहू शकता. मात्र इथे राहणार असाल तर सोबत गाडी आणि ड्राईव्हर हवा किंवा स्वतःतरी गाडी चालवायला हवी. भारतात तर सगळीकडे कस्टमाईज्ड हॉलिडेवर आपल्याला आपली प्रायव्हेट गाडी व ड्राईव्हर हा सहलखर्चात समाविष्ट असतोच. परदेशात फिरताना आपल्याला ट्रेन,बस,प्रायव्हेट शोफर ड्रिव्हन कार,किंवा जगातल्या इतर पर्यटकांबरोबर मिळून- मिसळून शेअर्ड कोच ट्रान्सफर किंवा टूरमध्ये सहभागी होता येते.

आपल्या मनासारखा हॉलिडे करण्यासाठी आज जगभरात आपण अनेक प्रकारच्या हॉटेल्स आणि रीसॉर्ट्सची निवड करू शकता. जमल्यास आपल्या हॉलिडेचे शेवटचे एक-दोन दिवसांचे वास्तव्य हे नेहमी एखाद्या रीसॉर्टमध्ये करा. इथल्या अनेक सुविधांनी आपल्या हॉलिडेचा क्षीण तसंच रोजच्या कामाचा ताणतणाव अगदी आरामात दूर होईल आणि अगदी ताजेतवाने होऊन आपण घरी परत जाल. अनेक रीसॉर्ट हे स्पा ट्रीटमेन्टसाठी प्रसिद्ध आहेत. स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, आईसलँड, जपानसारख्या अनेक ठिकाणी तर नैसर्गिक गरम पाण्याच्या थर्मल स्पाज्भोवती रीसॉर्टस् बांधले आहेत. बालीला भेट देत असाल तर नक्कीच पूल व्हिलामध्ये राहून पहा. रोमँटिक हॉलिडे असो किंवा फॅमिली ब्रेक, आपल्या रूमलाच लागून असलेल्या पूलमध्ये डुंबायची मजा काही औरच असते. जर तुम्हाला पूल व्हिलाचा हा पूल लहान वाटत असेल तर मालदीवसारख्या ठिकाणी वॉटर व्हिलाजमध्ये राहून पहा. थेट रूममधूनच समुद्रात उतरण्याची सोय इथे असल्याने संपूर्ण समुद्रच आपले स्विमिंग पूल ठरते.

अनेकवेळा आपल्याला ग्रुप टूरच्या सोईंचा, टूर मॅनेजरच्या नियोजनाचा व इतर पर्यटकांबरोबर फिरण्याचा आनंद हवा असतो पण त्याचबरोबर थोडासा विसावासुद्दा हवा असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन वीणा वर्ल्डने ग्रुप टूर संपल्यानंतर आपल्यासाठी आणले आहेत पोस्ट टूर हॉलिडे. काही लोकप्रिय ठिकाणी ग्रुप टूरनंतर आपण पोस्ट टूर हॉलिडेची निवड करून गु्रप आणि कस्टमाईज्ड अशा दोन्ही टूरचा आनंद घेऊ शकता. तसंच तुमचा स्वतःचा खाजगी ग्रुप असेल तर तुम्हाला आम्ही टूर मॅनेजरसुद्धा देऊ शकतो. कोस्टारिकावरून भारत फिरण्यासाठी आलेल्या इग्नेशियो भावंडांनी तर केवळ दोनच जणं असूनही टूर मॅनेजर घेण्याची पसंती दाखवली. मग वाट कसली बघायची?

चलो, बॅग भरो, निकल पडो! आणि अनुभवा आपल्या मनासारखा हॉलिडे-हवा तेव्हा हवा तसा!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
Similarities between Korean and Tamil Culture
6 mins, read

Similarities between Korean and Tamil Culture

As the world gets connected more and more with technology, we are getting closer to different cultures. Earlier American and British movies and songs were available worldwide and everyone hummed to th

बॉर्डर
6 mins, read

बॉर्डर

‘हा व्हिसाच बंद झाला तर किती बरे होईल ना!’ असे पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाला नेहमीच वाटत असते. व्हिसाच काय, देशांमधल्या ह्या बॉर्डर्सच नसत्या तर किती बरे झाले असते, असंही बर्‍याचदा वाटून

न्यूझीलंड टू न्यूयॉर्क
6 mins, read

न्यूझीलंड टू न्यूयॉर्क

नवीन वर्षाचं स्वागत करायला उगवत्या सूर्याचा देश, ‘लँड ऑफ द रायझिंग सन-जपान’ कसा वाटतो तुम्हाला? की भारतात जिथे सूर्याची किरणं प्रथम पडतात ते अरुणाचल प्रदेश, म्हणजेच नॉर्थ ईस्ट तुम्हाला खुणावतंय? सर्वा

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Our OfficesLocate Us

Located across the country, ready to plan your dream vacation today!

Locate Us

Call us1800 313 5555

Request a quote or chat - we’re here to help anytime!

Write to us

We're always happy to help!

Connect with us

Reviews, podcasts, blogs and more...

Veena world
Associated withIATAIATOTAAITAFI

*Caution: Beware of Fake Promotions or Offers *Please do not believe or engage with any promotional emails, SMS or Web-link which ask you to click on a link and fill in your details. All Veena World authorized email communications are delivered from domain @veenaworld.com or @veenaworld.in or SMS from VNAWLD or 741324. *Veena World bears no liability or responsibility whatsoever for any communication which is fraudulent or misleading in nature and not received from registered domain.

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top