India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

लेट्स कंट्रोल अवर इमोशन्स...

8 mins. read
Veena Patil
Veena Patil
8 Mins Read
June 27, 2019
June 27, 2019

Quick Summary

टूरला जाताना रांगेची शिस्त पाळा, सर्व्हिस देणाऱ्यांना धन्यवाद द्या, आणि स्मार्ट ट्रॅव्हलरची प्रतिमा जपा.

ग्रुप टूरमध्ये एकमेकांच्या वेळेची कदर करा आणि सहलीचा ऑर्केस्ट्रा सुरळीत चालेल यासाठी सहकार्य करा.

परदेशात इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिस्त पाहून भारावून गेल्यावरही आपल्या देशाला नावं ठेवणे टाळा.

इतर देश किंवा पर्यटनस्थळांशी तुलना करून वाद निर्माण होऊ देऊ नका, कारण प्रत्येक ठिकाण वेगळं असतं.

आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवा आणि जुगाडच्या सवयीमुळे नियमभंग होऊ देऊ नका.

इंडियन टाईमसारख्या सवयींमुळे देशाची प्रतिमा खराब होते, म्हणून वेळ पाळा आणि इतरांच्या वेळेचा आदर करा.

पस्तीस वर्षांच्या ह्या पर्यटन आयुष्यात इतक्या गोष्टी बघितल्या, आणि आता त्याविषयी सगळेच देश इतके आग्रही बनलेत की जर असं काही झालंच तर मानसिक-आर्थिक-सामाजिक असा सर्वच प्रकारचा मनस्ताप आपल्याला होतो. रांगेची शिस्त पाळणं, आपल्याला सर्व्हिस देणार्‍या ऑफिशियल्सना थँक्यू म्हणणं, सामानाचं ओझं कमीत कमी करून एक स्मार्ट ट्रॅव्हलर अशी आपली छबी निर्माण करणं, ग्रुप टूरमध्ये असू तर एकमेकांच्या वेळेची कदर करणं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत. त्या अंगी बाणवाव्या लागतातच, पण...

दोन आठवड्यांपूर्वी कोल्हापूरला गेले होते. निमित्त होतं वीणा वर्ल्डची प्रीफर्ड सेल्स पार्टनर अबोली रावळच्या ड्रीम हॉलिडेज्च्या नवीन प्रशस्त कार्यालयाचं उद्घाटन. टुगेदर वुई ग्रो हा आमचा नारा खरा करीत आमचे सेल्स पार्टनर्सही वाढताहेत हे बघून खूप आनंद झाला. कोल्हापूरच्या पर्यटकांशी संवाद साधताना प्रश्‍न आला की, पर्यटक देशविदेशात ज्यावेळी पर्यटनाला जातात तेव्हा त्यांनी कोणत्या तीन गोष्टी टाळाव्यात असं तुम्हाला वाटतं? खरंतर पर्यटनाला निघताना त्यात समाविष्ट असलेल्या प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. पर्यटनसंस्था म्हणून आम्ही पर्यटकांना जे प्रॉमिस केलंय ते पाळायचं असतं, आमचे जे देशविदेशातील लोकल पार्टनर्स असतात त्यांनी आम्हाला दिलेलं प्रॉमिस पाळायचं असतं, एअरलाईन्स- कॉन्स्युलेटच्या अखत्यारित येणारा भाग त्यांनी पर्यटकांसाठी जेवढा सोपा करता येईल तेवढा तो करायचा असतो, आणि शेवटी महत्त्वाचा असतो तो आमचा पर्यटक, त्याच्या सहकार्याने आणि आमच्या संबंधित सर्व घटकांच्या व्यवस्थित आयोजनाने सहलीचा ऑर्केस्ट्रा खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करायचा असतो. आणि तसा तो परफॉर्मन्स आम्ही देतोय ह्याचा सार्थ अभिमानही आहे. माझ्या पस्तीस वर्षांच्या पर्यटन आयुष्यात वीस वर्ष मी टूर मॅनेजर म्हणून भारतात आणि परदेशात सहली आयोजित केल्या आहेत. आता काम बदललंय तरीही वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या काही सहलींना मी एक दिवसाची हजेरी लावते, पर्यटकांशी संवाद सुरू ठेवते. टूर मॅनेजर म्हणून पर्यटकांना जवळून जाणल्यावर, त्यांचं निरीक्षण केल्यावर काही गोष्टी दिसल्या की ज्या टाळल्याच पाहिजेत, ज्याविषयी मी कोल्हापूरवासीयांशी संवाद साधला.

देशात किंवा परदेशात जेव्हा आपण पर्यटनाला निघतो तेव्हा आपण आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे, आपल्या समाजाचे, आपल्या कुटुंबाचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवतेचे प्रतिनिधी म्हणून जात असतो. हे प्रतिनिधित्व खूप चांगल्या तर्‍हेने पार पाडता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याची आठवण आणि जाणीवही असली पाहिजे, थोडक्यात काय करायचं? काय करायचं नाही? ह्यावर प्रत्येकाचा कंट्रोल असायला पाहिजे. फक्त तीनच गोष्टी सांगा असं सांगितल्यामुळे मी ही तीन गोष्टीच सांगितल्या. एक-भारताला म्हणजेच आपल्या देशाला नावं ठेवायची नाहीत. दोन-तुलना करायची नाही. तीन- आपल्या इमोशन्सना कंट्रोलमध्ये ठेवायचं.

आपण परदेशी जातो तेव्हा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, शिस्त, चकचकाट बघून भारावून जातो आणि आपल्या देशाला नावं ठेवायला लागतो. मोठ्या बसप्रवासात अशातर्‍हेचा संवाद सुरू होतो. इथे आपण प्रत्येकाने स्वत:ला कंट्रोल केलं पाहिजे. एखाद्या देशाची महती सांगताना आपल्या देशाला नावं कशाला ठेवायची? आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतंय, काही वर्षांमध्ये आपल्याला ते बदल चांगल्या तर्‍हेने जाणवतील. पण प्रश्‍न नुसता इन्फ्रास्ट्रक्चरचा नाहीच आहे, आपण शिस्त पाळतो का? नियम बरहुकूम चालतो का? हे प्रश्‍न आपणच स्वत:ला विचारले पाहिजेत. प्रत्येक बाबतीत जुगाड ने आपल्याला ग्रासलंय त्यातून बाहेर येणं ही आपली जबाबदारी आहे. खंडप्राय देश आहे, पाच हजार वर्षांची परंपरा आहे, गोष्टी बदलायला वेळ लागणार आणि त्यासाठी आपलं प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. म्हणूनच आमच्या टूर मॅनेजर्सच्या मिटिंगमध्ये आम्ही एक ठरवलंय की, भारताला दुषणं देणारा संवाद सहलीवर सुरू झाला तर विनंती करा तो थांबविण्याची किंवा शिताफीने विषयांतर करा. देशविदेशात आपल्या भारतीयांना चिकटलेला आणि आपल्याला वेदना देणारा एक शब्द ऐकायला मिळतो तो म्हणजे इंडियन टाईम. आपणातले कुणीतरी वेळ पाळत नाहीत किंवा दुसर्‍यांच्या वेळेचं महत्त्व त्यांना कळत नाही म्हणून आपल्या देशाला हे बिरुद चिकटलं. आता मला सांगा आपल्या ह्या करणीमध्ये देशाचा काय दोष. आपल्यामुळे देशाचं नाव का खराब करायचं. आता जसं हे नाव खराब होत गेलं आपल्यामुळे ते आपण सुधारुही शकतो एक एक करून नाही का. आमचा प्रत्येक टूर मॅनेजर ह्यासाठी दक्ष असतो.

दुसरी गोष्ट आहे ती तुलना. एका देशाची दुसर्‍या देशाशी, एका पर्यटनस्थळाची दुसर्‍या पर्यटनस्थळाशी किंवा एका सहलीची दुसर्‍या सहलीशी तुलना करायची नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक देश, राज्य, पर्यटनस्थळ वेगळं आहे. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली डेव्हलपमेंट, तिथला निसर्ग ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्या-त्या ठिकाणचं जे काही चांगलं आहे, जे सहलखर्चात पॉसिबल आहे ते द्यायचा आमचा किंवा कोणत्याही पर्यटनसंस्थेचा प्रयत्न असतो. पण अमेरिकेला गेल्यावर यापेक्षा युरोप जास्त चांगलं आहे, ऑस्ट्रेलियाला गेल्यावर अमेरिका जास्त बरं होतं किंवा लेह लडाख-नॉर्थ ईस्टच्या निसर्गरम्य पण सुखसुविधांच्या दृष्टीने अजून बर्‍यापैकी अनडेव्हलप्ड असलेल्या ठिकाणांची तुलना आपण केरळ राजस्थानशी किंवा आधी केलेल्या परदेश सहलीशी नाही करू शकत. त्यामुळे आपण चालू सहलीची मजा कीरकिरी करतो. साऊथ ईस्ट एशियामध्ये हॉटेल्स बर्‍यापैकी मोठी असतात. तीच युरोपमध्ये गेलो तर तुलनेने छोटी असतात, जपानमध्ये रूम्स आणखी लहान असतात ह्या गोष्टी आम्हीही आधी पर्यटकांना सांगायला पाहिजेत आणि पर्यटकांनीही त्या समजून घेतल्या पाहिजेत.

आपल्या इमोशन्सवर कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे.पस्तीस वर्षांच्या ह्या पर्यटन आयुष्यात इतक्या गोष्टी बघितल्या, आणि आता त्याविषयी सगळेच देश इतके आग्रही बनलेत की जर असं काही झालंच तर मानसिक-आर्थिक-सामाजिक असा सर्वच प्रकारचा मनस्ताप आपल्याला होतो. रांगेची शिस्त पाळणं, आपल्याला सर्व्हिस देणार्‍या ऑफिशियल्सना थँक्यू म्हणणं, सामानाचं ओझं कमीत कमी करून एक स्मार्ट ट्रॅव्हलर अशी आपली छबी निर्माण करणं, ग्रुप टूरमध्ये असू तर एकमेकांच्या वेळेची कदर करणं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत. त्या अंगी बाणवाव्या लागतातच. इतक्या वर्षांमध्ये अशा काही प्रसगांना आम्ही सामोरे गेलोय की ते लिहीतानाही त्रास होतोय. पण त्याबाबतीत डायरेक्ट जेल होऊ शकते, मोठा भूर्दंड भरावा लागतो, सहल मध्येच सोडावी लागते, स्वत:च्या पैशाने भारतात परत यावं लागतं आणि ह्यासंबंधीच आहे ही तिसरी गोष्ट. इथे इमोशन्स कंट्रोल करणं फार फार महत्त्वाचं आहे. सार्वजनिक शांततेचा भंग आपल्याकडून होणार नाही ह्याची काळजी घेणं हा आता मोलाचा शिष्टाचार झाला आहे. कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये पती-पत्नीमधलं द्वंद्व, धक्काबुक्की ही गोष्ट तेथील एनव्हार्यमेंटला डिस्टर्ब करणारी ठरते तसेच ते पती-पत्नी एकमेकांसोबत राहणे सुरक्षित नाही या कारणाखाली त्यांना अडवलं जातं, सहल त्यांना तिथेच सोडून द्यावी लागते. आणि नंतर ज्या काही सोपस्कारांतून त्यांना जावं लागतं त्याचा विचारही न केलेला बरा. पासपोर्ट जप्त केले जातात. दोघांना एकमेकांपासून धोका नाही हे त्यांना पटवून द्यावं लागतं, त्यासाठी त्यांना कोर्टात जाऊन पेटीशन सही करून द्यावं लागतं, त्यात जर कोर्टाची सुट्टी आली किंवा वीकेंड आला तर त्याठिकाणी स्वखर्चाने दोन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रहावं लागतं. त्यांची खात्री पटत नाही तोपर्यंत त्यांना एकत्र राहू दिलं जात नाही. आणि हे फक्त पती-पत्नी मध्येच नाही तर कोणाही दोघांमध्ये झालं तरी साधारणपणे ह्याच दिव्यातून जावं लागतं. बेटर कंट्रोल द इमोशन्स. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणच्या स्थानिक महिला, हॉटेलमध्ये काम करणार्‍या ऑफिशियल्स ह्यांच्या बाबतीत जर चुकून किंवा मुद्दामहून काही घडलंच तर मग सरळ देवाचंच नाव घ्यायचं एवढ्या प्रचंड मानहानीतून त्या व्यक्तीला जावं लागतं. आधी लॉकअपमध्ये जेलमध्ये बंद केलं जातं, पासपोर्ट काढून घेतला जातो, तेथील स्थानिक संघटनांची माफी मागावी लागते. आणि एवढं सगळं केल्यावरही त्यांना पुढची सहल करण्याची परवानगी दिली जात नाही. तिथूनच स्वदेशी परत यावं लागतं. थोडक्यात अशातर्‍हेचं असभ्य वर्तन केल्यामुळे त्यांना त्या देशातून डीपोर्ट केलं जातं. ह्यामुळे वैयक्तिक नुकसान होतंच पण पर्यटनसंस्थेच्या नावाला धक्का बसतो तसंच भारताविषयी आणि भारतीयांविषयी नाव खराब होतं. तिसरी गोष्ट आहे, दुकानातून पैसे न भरता आपल्या पर्समध्ये एखादी वस्तू येणं, हे चुकून झालं तरी यासाठी डायरेक्ट तुरुंगवास आहे. शॉप लिफ्टिंग म्हणतात ह्याला. गेल्यावर्षी तुम्हाला आठवत असेल तर वृत्तपत्रात एक मोठी बातमी आली होती जी तुम्हीही वाचली असेल. काही सो कॉल्ड अप्पर मिडल क्लास मैत्रीणी व्हाया टर्की युरोपमध्ये चालल्या होत्या, त्यातल्या एकीने लक्झरी शॉपमधून पैसे न भरता ग्लेअर्स पर्समध्ये टाकले. इरादा काय होता माहीत नाही पण ह्या महिलेला तिथे डायरेक्ट जेलची हवा खावी लागली. बाकी मैत्रिणींना तिला सोडून पुढे जावं लागलं. हे असं का होतं हा अभ्यास जेव्हा मानसशास्त्र्रज्ञांनी केला तेव्हा त्यातून लक्षात आलं की शॉप लिफ्टिंग हा एक आजार आहे आणि गरीब- श्रीमंत, लहान-मोठे ह्यातील कुणीही त्याचे शिकार असू शकतात. आता ह्या आठवड्यात एका ऑफिशियलच्या बाबतीत वृत्तपत्रात बातमी वाचली. एवढ्या मोठ्या हुद्यावरची माणसंही ह्या आजाराची शिकार आहेत हे बघून वाईट वाटलं. आता तुम्ही म्हणाल असे पर्यटक येतात टूरवर?, तर तसं नाहीये. पस्तीस वर्षांत दहा पेक्षा कमी केसेस आहेत पण आता सर्वत्र नियम खूप कठीण झालेयत. आपल्या इमोशन्सना आवरणं आपल्या हातात आहे.

आज माझा लेख थोड्या वेगळ्या अंगाने गेला पण अनुभवांनी आपल्या पर्यटकांना काही गोष्टी माहीत करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. बाकी डोन्ट वरी, तुमची सहल उत्कृष्टरित्या पार पाडायला आम्ही सज्ज आहोत कंबर कसून. हॅव अ हॅप्पी संडे!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
या मशीनमध्ये दडलंय काय?
8 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!
8 mins, read

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026 ...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभू

प्रवासाला निमित्त कशाला?
8 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top