India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

रंग माझा वेगळा...

19 mins. read
Veena Patil
Veena Patil
19 Mins Read
March 09, 2024
March 09, 2024

Quick Summary

जयपूरला जाण्यासाठी इंडिगो एअरने मुंबई-जयपूर फ्लाइट घ्या आणि शक्य असेल तर विंडो सीट निवडा.

पंजाबी शादीचा अनुभव घेण्यासाठी राजस्थानमधील रीसॉर्टमधील फंक्शनला जा आणि आंतरराष्ट्रीय भारतीय जोडप्याचा उत्सव नक्की बघा.

फ्लाइटमध्ये वेळ घालवण्यासाठी फ्लाइट मॅगेझिन वाचनाचा प्लॅन करा आणि प्रवासाचा आनंद जाणीवपूर्वक जपून ठेवा.

जयपूरच्या पिंक सिटी ओळखीला जपण्यासाठी शहर गुलाबी ठेवण्याच्या धोरणांवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

विमानातून जयपूर पिंक दिसत नसेल तर ते पर्यटकांच्या अपेक्षांवर परिणाम करू शकते, त्यामुळे शहराची रंगसंगती टिकवण्याचा आग्रह ठेवा.

जोधपूर ब्ल्यू सिटीचा अनुभव घ्यायचा असेल तर मेहरांगड फोर्टवरून निळ्या घरांचा नजारा पाहा.

Published in the Sunday Sakal on 10 March, 2024

मागच्या महिन्यात जयपूरला गेलो होतो. शादी का मौसम. राजस्थानने डेस्टिनेशन वेडिंगचा बालेकिल्ला बनविलाय स्वत:ला. त्यामुळे कधीतरी आपल्या प्रत्येकालाच राजस्थानच्या शादीचा अनुभव घेता येतो. मी आणि सुधीर निघालो होतो राजस्थानच्या एका रीसॉर्टमध्ये पंजाबी शादीची मजा लुटायला. आमचे असोसिएट नरेश अरोरा ह्यांच्या मुलीचं लग्न होतं. हे आहेत पंजाबी, राहतात अहमदाबादला, बिझनेस करतात संपूर्ण भारतभर आणि मुलीचं लग्न जमवलं होतं अमेरिकन भारतीय मुलाशी, त्यामुळे ह्या लग्नात आम्हाला नॅशनल नव्हे तर इंटरनॅशनल इंटिग्रेशन बघायला मिळालं. एकाच फंक्शनसाठी आम्ही गेलो कारण दुसर्‍या दिवशी पुन्हा प्रवासाला निघायचं होतं. मुंबई-जयपूरचा प्रवास आम्ही इंडिगो एअर ने केला. विंडो सीटचं आकर्षण आपण कितीही  प्रवास करीत असू किंवा कितीही वय झालेलं असलं तरी आपल्या प्रत्येकाला असतंच. सर्वसाधारणपणे आपल्या भारतातील विमानप्रवासात एका साईडला तीन आणि दुसर्‍या साईडला तीन सीट्स असं थ्री बाय थ्री कॉन्फिगरेशन असतं सीट्सचं. आम्हाला एक विंडो आणि एक मधली सीट होती. आता तिसरं कोण असणार त्या आइल सीटवर ह्यावर मला विंडो मिळणार की सुधीरला हे ठरणार होतं. मी मनातल्या मनात आईल सीटवर कुणीतरी पुरुष प्रवासी येऊ दे अशी प्रार्थना करीत होते म्हणजे मग सुधीरला मध्ये बसावं लागणार आणि मला विंडो मिळणार. दोन तासांचा प्रवास पण माझ्या अंतर्मनातले बालहट्ट काही केल्या संपायला तयार नाहीत, आणि ते नकोच संपायला कधी. आयुष्य रसरसून जगायची तसंच प्रत्येक क्षण उत्साहवर्धक आणि आनंदी बनविण्याची उर्जा आहे ती. मनाच्या एका कोपर्‍यात ही बालसुलभ जिज्ञासा कुतूहल उत्सुकता जिवंत ठेवता आली पाहिजे. आज नशीब बलवत्तर होतं सुधीरचं. आईल सीटवर मुलगी होती, मला चुपचाप मधल्या सीटवर बसावं लागलं आणि सुधीरची स्वारी, ’बघ मी अपेक्षा करीत नाही कधी त्यामुळे मला नेहमी चांगल ते मिळत’, असे विजयी भाव चेहर्‍यावर घेऊन विंडो सीटवर विराजमान झाली. ’आलीया भोगासी’ म्हणत मी माझ्या सॅन्डविच सीटवर ’लेट्स एन्जॉय रीडिंग’ करीत इंडिगोचं फ्लाइट मॅगेझिन घेऊन बसले. पुढच्या दोन तासात अथपासून इतिपर्यंत मॅगेझिन वाचून झालं. पायलटने ‘थोड्याच वेळात आपण जयपूरला उतरू’अशी अनाऊंसमेंट केली. विमान खाली उतरता उतरला सुधीर म्हणाला,’जयपूर आता पूर्वीसारखं गुलाबी राह्यलं नाही’. हे वाक्य एखाद्या वेदनेसारखं मला लागलं. कुणा गायकाला, ’तुझा सूर आता पूर्वीसारखा लागत नाही’ म्हटल्यावर कसं वाटेल तसंच काहीसं मला झालं. जगातल्या वेगवेगळ्या देशांतून येणार्‍या पर्यटकांना ’पिंक सिटी जयपूर’ बघायची असते आणि विमानातून ती जर पिंक दिसली नाही तर मग ते लेबल मिरविण्यात काय अर्थ आहे? जयपूरने, राजस्थानने आणि भारतानेही सिरियसली ह्याचा विचार केला पाहिजे. कलरफूल कंट्री म्हणून आपल्या भारताकडे बघितलं जातं आणि त्याचं बरचसं श्रेय हे राजस्थानला आहे. महाराजा सवाई रामसिंग ह्यांनी १८७६ मध्ये क्वीन व्हिक्टोरियाचा मोठा मुलगा भविष्यातला राजा प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड ज्यावेळी भारत भेटीत जयपूरला भेट देणार होता त्यावेळी त्याच्या स्वागतार्ह्य राजस्थानची अगत्यशीलता आणि आतिथ्य ह्याचा रंग म्हणून संपूर्ण जयपूर शहर गुलाबी करून टाकलं. ते इतकं सुंदर दिसायला लागलं की जयपूरच्या राणीने प्रश्न केला येणारी प्रत्येक वास्तू ह्याच रंगात का रंगवू नये? एक एक करीत गुलाबी घरांची संख्या वाढू लागाली कारण राणीच्या आग्रहाखातर राजाने कायदाच पास करून टाकला. तसं जयपूरला जाणं बर्‍याचदा झालंय आणि त्यामुळेच असेल कदाचित जयपूरच्या गुलाबी रंगाचा प्रॉमिनन्स तेवढा दिसत नाही किंवा विमानातून तरी तो दिसत नाही हे सुधीरच्या वाक्याने जाणवलं. पिंक सिटी ही जयपूरची ओळख आहे. येणार्‍या पिढ्यानपिढ्यांनसाठी ती तशी राहिलीच पाहिजे म्हणून सरकारने तो कायदा आणि त्याची अंमलबजावणी ह्यावर सक्त नजर ठेवली पाहिजे. दिडशे वर्षांपूर्वी जेव्हा सोयी सुविधा फारशा नसताना महाराजा सवाई रामसिंग द्वितीय ह्यांनी संपूर्ण शहर गुलाबी करून दाखविण्याची किमया केली असेल तर आजच्या सरकारने त्याच्या पुढची पायरी गाठायला पाहिजे नाही का? पुर्वी राजे लोकं अंबारीतून, घोड्यावरून फिरायचे थोडक्यात रस्त्यावरून चालायचे. त्यांच्या व जनतेच्या डोळ्यांना ते गुलाबी शहर मस्त दिसायचं. आता आपण किंवा देशविदेशातले पर्यटक जास्त करून विमानाने जयपूरला उतरतात. त्यानां जयपूर हे पिंक शहर वरून आकाशातून गुलाबी दिसलं पाहिजे. इच्छाशक्ती असली तर सगळं काही शक्य आहे.

राजस्थानमध्ये जयपूर जसं पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं तसं जोधपूर ब्ल्यू सिटी म्हणून ओळखलं जातं. जोधपूरच्या मेहरांगड फोर्टवरून ह्या ब्ल्यू सिटीचा नजारा तुम्हाला बघायला मिळेल. शहरातली ही निळी घरं आधी फक्त उच्चवर्णियांसाठी बांधली जायची पण काळानुरूप हे बदललं, सर्वच घरं निळी झाली आणि जोधपूरला ‘ब्ल्यू सिटी‘चं लेबल लागलं. उदयपूर आणि आजूबाजूचा एरिया म्हणजे राजस्थानातल्या मार्बल साम्राज्याचं माहेरघर. इथल्या इमारती जास्तीत जास्त व्हाईट मार्बलने सजल्या आणि उदयपूरला  ’व्हाईट सिटी’ असं नाव चिकटलं. सोनार फोर्ट ह्या सोनेरी किल्ल्यामुळे आणि जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या घरांमुळे जैसलमेर बनली गोल्डन सिटी किंवा ’येलो सिटी’. अजमेर फोर्टच्या लाल रंगावरून अजमेरला ’रेड सिटी’चा मान मिरवता आला. म्हटलं नं भारताला कलरफूल कंट्री म्हटलं जातं त्यात राजस्थानच्या सिंहाचा वाटा आहे.

सरकारचे अनेक प्रोजेक्ट्स सुरू असतात, का नाही हा एक कलरफूल सिटीजचा प्रोजेक्ट हातात घ्यायचा? शहरातला एखादा रस्ता, पहाडावरचं एखादं गाव, एखादी कोस्टलाईन का नाही कलरफूल बनवायची? आपल्या देशात अठ्ठाविस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यातल्या किमान पंचवीस टक्के राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये आपण ही रंगाची उधळण केली तर भारत देश भविष्यात आणखी परदेशी पर्यटकांना आकर्षित करेल आणि ही एक गोष्ट भारताच्या खजिन्यात फॉरिन एक्सचेंजची भर टाकील परदेशी पर्यटकांद्वारे. आणि हा स्वप्नविलास नाही बरं का. जगात अनेक ठिकाणी ह्या रंगांनी आपली एक ओळख त्या त्या ठिकाणांना दिलीय आणि जगातले असंख्य पर्यटक त्या ठिकाणांना आपल्या बकेट लिस्ट मध्ये समाविष्ट करताहेत. आम्ही पर्यटकांना अशा अनेक ठिकाणी घेऊन जात असतो. त्यातली काही द्यायची म्हटली तर अशी..

मोरोक्को मध्ये असलेलं, पंधराव्या शतकात ज्यू लोकांनी वसवलेलं शेफशावन हे नीळं शहर मारोक्कोची ओळख बनलंय आणि लाखो पर्यटक ह्या ठिकाणी भेट देत असतात. शीपयार्डमधल्या स्क्रॅप मटेरियलमधून उभं राहिलं अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्समधलं कलरफूल ’ला बोका’. लाल पिवळा निळा नारंगी अशा एकदम ब्राइट कलर्समधलं हे ठिकाण अर्जेंटिनाच्या सहलीतलं मस्त व्हिजिट डेस्टिनेशन आहे. मेक्सिकोमधलं ‘लास पाल्मितास‘ हे शहर किंवा दोनशे नव्वद घरांचं एका टेकडीवरचं गाव लोअर इनकमवाल्या लोकांची घरं असल्यामुळे, त्याचा एकंदरीत नजारा हा यशातथाच म्हणजे झोपडपट्टीचा. ग्राफिटीसाठी फेमस असेलेल्या तिथल्या एका युथ ऑर्गनायझेशनने एकत्र येऊन मेक्सिको सरकारच्या मदतीने ही साधी घरं रंगवली वेगवेगळ्या भडक रंगांमध्ये आणि ती टेकडी त्या रंगवलेल्या घरांमुळे एका म्युरलमध्ये कर्न्व्हट झाली. हे लो इनकमवालं भांडाभांडीचं आगर ठरलेलं गाव पर्यटनस्थळामध्ये  विकसित झालं. तरुणाईला कामं मिळाली, क्राइम कमी झाला आणि एक आदर्श उदाहरण जगासमोर आलं. स्पेनमधल्या हुस्कार शहराची तर गोष्टच वेगळी. सोनी पिक्चर्सने त्यांच्या हॉलिवूड मूव्ही ‘द स्मर्फस‘ साठी हे शहर रंगवलं संपूर्णपणे निळ्या रंगात. घरांच्या मालकांना त्यांनी सांगितलं की शूटिंग आणि प्रमोशन संपल्यावर आम्ही पुन्हा तुमचं गाव व सगळी घरं होती त्या स्वरूपात करून देऊ. प्रमोशन संपल्यावर गावातल्या सगळ्या घरमालकांनीच एकत्र येऊन सोनीला सांगितलं, ’आम्हाला नको आमच्या घरांचा ओरिजिनल कलर, राहुदे असंच नीळं टाऊन. आणि आता हे नीळं शहर हुस्कार ‘कस्टमाईज्ड हॉलिडे‘ घेऊन जाणार्‍या पर्यटकांच्या यादीत समाविष्ट झालंय. कोलंबियामधल्या गुआतापे या कलरफूल शहराची कहाणीही तशी छान आहे. तिथे श्रीमंतांची घरं मस्त रंगामध्ये रंगवलेली असायची, अतिशय सुंंदर नक्षीकाम त्यावर असायचं. तिथल्या मेयरला गरीब श्रीमंतातली ही दर्शनीय दूरी मिटवायची होती म्हणून त्याने सर्वांना साधनसामग्री पुरवली आणि सर्वांचीच घरं सुंदर दिसायला लागली. आता हे शहर जगभरातल्या टूरिस्टचं आकर्षण बनलंय. मला आणखी एक गोष्ट आवडते ती पेस्टल शेड मध्ये रंगवलेल्या रेनबो रो ह्या चार्ल्सटन साऊथ कॅरोलिना मधल्या रस्त्याची. एका जजने इथे घर घेतलं आणि ते पेस्टल शेडमध्ये रंगवलं. ते शेजार्‍याला इतकं आवडलं की त्यानेही दुसर्‍या रंगाच्या पेस्टल शेडमध्ये स्वत:चं घर रंगवलं. ती दोनही घरं इतकी छान दिसायला लागली की आजूबाजूच्यांनीही आपल्या घरांचे रंग पेस्टल शेड्समध्ये बदलले आणि रस्त्याला जान आली. ग्रीनलँड म्हणजे बर्फाचं आगर. तिथली घरं अर्थातच डेन्मार्क कोपनहेगनच्या धर्तीवर बांधलेली. तेथील नूक गावात ती अल्ट्रामॉडर्न झोपडीसारखी दिसणारी ड्रिफ्टवूडची घरं त्यांनी ब्राईट कलरने रंगवली आणि फक्त एकच बदल केला तो म्हणजे त्या बिल्डिंगच्या उपयोगाप्रमाणे रंग दिले म्हणजे हॉस्पिटल्स क्लिनिक्स, डॉक्टर्सच्या घरांना पिवळा रंग, कमर्शियल बिल्डिंग्ज, शाळा चर्चेस टीचर्स आणि मिनिस्टर्सच्या घरांना लाल रंग, टेलिकम्युनिकेशन बिल्डिंग्जना हिरवा तर फिश फॅक्टरीजना निळा. किती मस्त विचार नाही का. ग्रीसमध्ये उन्हाळ्यात सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आणि उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी बनवली गेली व्हाईट वॉश्ड हाऊसेस. समुद्राचा निळा रंग, पांढरी घरं, मधूनच डोकावणारे ब्ल्यु डोम्स आणि गुलाबी रंगाच्या अनेक छटा दाखवणारी बोगनवेलीची फुलं. उगाचच नाही भारतीय आजकाल मोठ्या संख्येने ग्रीसकडे निघालेयत. पिवळ्या पांढर्‍या रंगातलं स्पॅनिश-पोर्तुगीज आर्किटेक्चर मग ते कॅलिफोर्नियातलं सांता बारबारा असो किंवा आपल्या भारतातलं गोवा वा पाँडिचेरी, त्याचा बाजच वेगळा. जगातलं कोणतंही स्पॅनिश-पोर्तुगीज अंमलावालं टाऊन घ्या तिथे पर्यटकांची गर्दी नाही असं होणारच नाही. पोर्तुगीझांनी आपला ठसा उमटवून त्या शहरांना कायमची वेगळी ओळख दिली ती अशी. ब्राइटन बीच मेलबर्न ऑस्ट्रेलियामध्ये समुद्रकिनार्‍यावर लोकांनी कलरफुल बॉक्सेस निर्माण केलीयत ती सुध्दा इतकी मस्त दिसतात की पर्यटकांचं लक्ष तिथे न गेलं तरच नवल. आपल्याकडे पुर्वंजानी ही मस्त रंगाची उधळण करून आपलं वेगळेपण जगासमोर ठेवलंय. आता ही वेळ आहे त्या रंगांना आणखी उठाव देण्याची, सुंदर बनविण्याची, आणखी काही चांगलं निर्माण करण्याची.

वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.


अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

काही वेळा एखाद्या व्यक्तीचे नाव ऐकल्यावर त्याच्या दिसण्याविषयी आपल्या मनात एक काल्पनिक चित्र तयार होतं आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीला भेटल्यावर त्या विरुध्द चेहरा दिसला की कळतं आपली फसगत झाली आहे. असा अनुभव देणारा देश म्हणजे ‘आईसलँड’. नावावरूनच हा देश म्हणजे पांढर्‍याशुभ्र बर्फाने आच्छादलेला वाटतो पण प्रत्यक्षात या देशाच्या भूमीपैकी फक्त ११% भागच बर्फाच्या ग्लेशियर्सनी आच्छादलेला आहे. नॉर्थ अ‍ॅटलांटिक आणि आर्क्टिक ओशनमध्ये वसलेला हा देश बेटांनी बनलेला आहे. युरोप आणि नॉर्थ अमेरिकेच्या मध्ये असला तरी अमेरिकेच्या मुख्य भूमीपेक्षा हा युरोपला अधिक जवळचा आहे. युरोप खंडातील बेटांच्या यादीत आकारमानानुसार आईसलँडचा क्रमांक ग्रेट ब्रिटन खालोखाल दुसरा लागतो. भौगोलिकदृष्ट्या या देशाची भूमी अगदी तरुण आहे आणि या भूमीच्या अंतरंगात अनेक ज्वालामुखी खदखदत आहेत. त्यातल्याच ‘एया फैतला योकुत्ल ’(Eyjafjallajokull) या ज्वालामुखीच्या  २०१० मध्ये झालेल्या उद्रेकामुळे अवघ्या युरोपचं आकाश झाकोळलं होतं आणि महिनाभर युरोपवरून होणारी हवाई सेवा ठप्पं झाली होती. आईसलँडचं लँडस्केप आपल्या देशातल्या लडाखची आठवण करून देतं. या देशाचं सर्वात आगळं भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे इथले नैसर्गिक ‘गिझर्स’ अर्थात गरम पाण्याचे फवारे.

आईसलँडमधली पहिली मानवी वसाहत साधारण ११०० वर्षांपूर्वी जिथे झाली ते म्हणजे ‘रेकयाविक’ हे आज या देशाचं राजधानीचं शहर आहे. अत्यंत लहरी हवामानासाठी प्रसिध्द असलेलं हे शहर या देशातलं सर्वात जास्त लोकसंख्येचं शहरही आहे. याच शहरापासून १८० किलोमीटर्सवर इथला पर्यटकांच्या यादीत अग्रक्रमाने असलेला ‘ब्लॅक सँड बीच’ आहे. ‘रेयनिजफियारा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या सागर किनार्‍यावरचे पाण्यातले खडकांचे उंच सुळके चटकन लक्ष वेधून घेतात. एच.बी.ओ. वरच्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेत या समुद्रातल्या सुळक्यांचे दर्शन घडते. यांची एक लोककथाही आहे, त्यानुसार ट्रोल्सनी म्हणजेच ठेंगू यक्षांनी एकदा एक जहाज खेचून न्यायचा प्रयत्न केला, पण अचानक सुर्योदय झाला आणि सूर्य किरणांमुळे ट्रोल्सचे रुपांतर सुळक्यांमध्ये झाले. या किनार्‍यावरची काळी वोल्कॅनिक राख आणि काळे सुळके यामुळेच याला ‘ब्लॅक सँड बीच’ अशी प्रसिध्दी मिळाली. या किनार्‍यावरची वाळू काळी का? तर हजारो वर्षांपूर्वी इथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातून लाव्हा रस वाहत आला. या लाव्हा रसाचे अग्निजन्य काळे खडक तयार झाले, ते समुद्राच्या लाटांच्या आघातांनी फुटले, त्याची जी वाळू झाली ती अर्थातच काळी झाली. या सागर किनार्‍यावरचे नैसर्गिकरित्या तयार झालेले षटकोनी आकाराचे बसॉल्ट रॉकचे स्तंभ पाहून चकित व्हायला होतं. तर मग असे एक से एक अनोखे नजारे आणि किनारे बघायला चला वीणा वर्ल्डसोबत आईसलँडच्या सहलीला !


पर्यटनाची गोल्डन ज्युबिली!

आम्हाला दोघांना पर्यटनाची आवड असल्यानेच, जास्तीत जास्त देश बघण्यासाठी आम्ही वीणा वर्ल्डने २०१४ मध्ये जाहीर केलेल्या सुपर जम्बो डिस्काउंट प्लॅनचा फायदा घेतला आणि कोविडची अडीच वर्ष वगळता 5 वर्षांमध्ये जगातले 50 देश बघायचं स्वप्नं पूर्ण केलं सुध्दा!

ह्या 50 देशांमधील शेवटची टूर २०२३ मध्ये आम्ही आफ्रिकेतील केनिया-व्हिक्टोरिया फॉल्स पाहून पर्यटनाचं अर्धशतक मोठ्या दिमाखात पूर्ण केलं. प्रवासाची फारच आवड असल्याने आम्ही अनेकदा वीणा वर्ल्डने आम्हाला दिलेल्या ओरिजनल प्लॅनमध्ये आणखी ठिकाणांची भर घालायला लावायचो. म्हणजे आमच्या प्लॅनमध्ये  यु.एस.ए. ईस्ट आणि वेस्ट कोस्ट अशी टूर होती पण आम्ही जास्त म्हणजे १९ दिवसांची यु.एस.ए. टूर विथ बहामाज क्रुझ ही टूर निवडली. जगभरातले देश बघताना आम्हाला युरोपने विशेष भुरळ घातली. युरोप खंडाचा इतिहास आणि त्याला लाभलेल्या अप्रतिम निसर्गसौंदयार्र्ची सांगड घालणारी ठिकाणं, युरोपमधल्या क्रुझ सेलिंग्ज, युरोपमधील वास्तू वैभव याचा आमच्या मनावर कायमचा ठसा उमटला आहे.

जगभरात फिरताना आम्ही नेहमी वीणा वर्ल्डबरोबरच का फिरतो तर  वीणा वर्ल्डच्या ऑल इन्क्लुझिव्ह प्राइसमुळे. एकदा पैसे भरले की मग फक्त शॉपिंगसाठी पाकीट उघडावं लागतं. शिवाय वीणा वर्ल्डची मॅनेजमेंट उत्तम आहे, पर्यटकांच्या प्रत्येक गरजेचा विचार करून सगळी व्यवस्था केलेली असते, आवश्यक सूचना दिल्या जातात. त्यामुळे अतिशय बिनधास्तपणे पर्यटक सहलीचा आनंद घेऊ शकतात. ५० देशांचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता आम्हाला वेध लागले आहेत ते पुढचा म्हणजे ७५ देशांचा टप्पा गाठण्याचे आणि त्याची सुरुवात टर्की किंवा आईसलँडने करायची आमची इच्छा आहे. तर मग आमच्याप्रमाणेच तुम्हालाही तुमचं ट्रॅव्हल मिशन पूर्ण करायचं असेल तर वीणा वर्ल्डकडून तुम्ही तुमचा ट्रॅव्हल पोर्टफोलिओ आजच बनवून घ्या.

श्री.देवेंद्र खडसे व सौ.प्रमीला खडसे, वाशी


कायबाई खाऊ कसं गं खाऊ!

आपल्या भारत देशाच्या भौगोलिक वैविध्यात महत्वाची भर घालणारा प्रांत म्हणजे भारताच्या उत्तर टोकावर हिमालयाच्या अंगाखांद्यावर वसलेला ‘लडाख’. या युनियन टेरिटरीच्या नावाचा अर्थच मुळी ‘लॅन्ड ऑफ हाय पासेस’ म्हणजे उंचावरच्या खिंडींचा प्रदेश असा होतो. जिथला बहुतेक भूभाग हा ९००० फूटांवर आहे ते लडाख ‘शीत वाळवंट’ म्हणूनच ओळखले जाते. या शीत वाळवंटात दोन मदारीचे उंटही पाहायला मिळतात. चीन आणि पाकिस्तान या भारताच्या सख्ख्या(!) शेजार्‍यांशी लडाखची सीमा भिडलेली असल्याने १९४८ पासून ते १९९९ पर्यंत या भागाने अनेक युध्दे अनुभवली आहेत. तसेच लामायुरू, ठिकसे, हेमिस, अल्ची अशा प्राचीन मॉनेस्ट्रीजमधून लडाखने बौध्द धर्म जतन केला आहे. लडाखच्या खाद्य संस्कृतीवर तिबेटी पाककलेचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. भाज्या आणि मटणाबरोबर इथे ‘तिंग्मो’ खातात. एखाद्या फुगलेल्या करंजीसारखा दिसणारा हा पाव गव्हाच्या पिठाचा असतो आणि त्यात कसलेही स्टफिंग नसते. तिंग्मो नाश्त्यालाही खाल्ला जातो.तिंग्मोबरोबर थुक्पा हा खास लडाखी बेत असतो. सुपी न्युडल्स असे थुक्पाचे वर्णन करता येईल पण ते त्याच्या चवीला न्याय देणारे नाही ठरणार. त्यासाठी गरम गरम थुक्पाच खायला हवा. थेंतुक, पाकथुक असे या थुक्पाचे आणखी काही प्रकारही इथे केले जातात.

लडाखच्या वैराण पहाडांमधून प्रवास करताना आलेला शिणवटा घालवायचा असेल तर खास लडाखमध्येच मिळणारा ‘बटर टी’ प्यायलाच हवा. या चहाला स्थानिक ‘गुरगुर चाय ’ म्हणतात. या चहात थोडं मिठ आणि याकच्या दुधापासून केलेलं लोणी घालतात. त्यामुळे एक वेगळीच चव या चहाला येते. लडाखच्या बोचर्‍या थंडीवर बटर टी म्हणजे रामबाण उपाय. या बटर टी सोबत इथला ‘खंबिर’ नावाचा पाव अवश्य खावा. गुलाबी रंगाचा दिसणारा आणि आपल्या नेहमीच्या चहासारखी चव अजिबात नसलेला बटर टी पिऊन बघण्यासाठी वीणा वर्ल्डच्या लेह लडाख टूरमध्ये अवश्य सहभागी व्हा. देश विदेशातील अशाच विविध खाद्य परंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast


आर्क्टिक आणि अंटार्क्टिक

ह्यावर्षी आम्ही आमचाच रेकॉर्ड मोडला. आत्तापर्यंत एकच टूर अंटार्क्टिकाला जात असे वर्षभरातून. ह्यावर्षी अंटार्क्टिकाला दोन टूर्स गेल्या. एक फेब्रुवारीला दिनेश बांदिवडेकर ह्या आमच्या टूर मॅनेजरने केली आणि पर्यटकांनी त्यांचा सातवा खंड पूर्ण केला. दुसरी टूर आत्ता सुरू आहे आणि आमचा टूर मॅनेजर कमलेश सावंत अंटार्क्टिकामध्ये पर्यटकांच्या दिमतीला आहे. अंटार्क्टिकाचं जगच वेगळं आहे. इथे जाऊन आल्यावर एखाद्या तीर्थस्थानी जाऊन आल्याचं समाधान मिळतं. तिथून आल्यानंतर तर पर्यटकांची प्रतिक्रिया होती, आता आम्ही सर्वांना सांगणार पैसे जमवा आणि अंटार्क्टिका एकदा बघाच!’

जेव्हा अंटार्क्टिकाच्या टूर्सचा सीझन संपत आला तेव्हा आमची आणि आमच्या पर्यटकांची नजर वळली आर्क्टिककडे. आर्क्टिक पोलर बेअर एक्सप्रेसची टूर आम्ही जाहीर केली आणि पर्यटकांनी लागलीच प्रतिसाद दिला. ह्या टूरसाठी सीट्स लिमिटेड आहेत, फक्त तीसच आणि त्यातल्या सतरा सीट्स ऑलरेडी भरल्यासुद्धा. जर तुम्ही ह्या टूरचा विचार करीत असाल तर लागलीच बुकिंग करा कारण ह्या वर्षातली ही एकमेव टूर आहे. आत्ताच अंटार्क्टिकावरून आलेल्या पर्यटकांपैकी काही पर्यटक आर्क्टिक पोलर बेअर एक्स्प्रेस क्रुझला यायचा विचार करीत आहेत. त्यामुळे तेही रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत एकाचवर्षी आर्क्टिक आणि अंटार्क्टिक या दोन्ही रीजनना भेट देण्याचा. ह्या टूरवरचे काही खास फोटो इथे खाली देत आहोेत.  सो, चलो, बॅग भरो, निकल पडो! आर्क्टिकला पोलर बेअर बघायला वा अंटार्क्टिकाला पेंग्विन्सच्या कॉलनीज् बघायला.


वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्

एनीटाइम! एनी व्हेअर!

अराऊंट द वर्ल्ड!

हा महिना आणि त्याच्या पुढचा महिना म्हणजे घराघरात परीक्षांची धामधूम. हॉलिडे सुट्टी टूर्स असे शब्दही उच्चारायची परवानगी नसते. मुलांना एकदा का परीक्षेसाठी सेंटरवर पाठवलं की हाश हूश करीत सुट्टीतल्या प्लॅनची चर्चा. आणि ती करावीच लागते कारण परीक्षा संपायची वाट पाहिली तर एअरफेअर्स काहीच्या बाही महाग झालेली असतात. एका बाजूला परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रार्थना करीत रहायचं तर दुसर्‍या बाजूला परीक्षेनंतरच्या हॉलिडे सरप्राइजसाठीची तयारी करायची, मुलांना अतापता लावू न देता, ही तारेवरची कसरत आत्ता प्रत्येक घरात सुरू असेल. टेंशन घेऊ नका. वीणा वर्ल्ड है ना! ग्रुप टूर, कस्टमाईज्ड हॉलिडेज्, कॉर्पोेरेट टूर्स, वुमन्स स्पेशल, सिनियर्स स्पेशल, हनिमून टूर्स सगळं काही घेऊन आम्ही तयार आहोत तुमच्या स्वागताला. आणि वर दिलेल्या बर्‍याचशा गोष्टी ग्रुप टूर्सवाल्या असल्या तरी तुमचा फॅमिली ग्रुप तुमच्या मित्रमंडळींचा ग्रुप, तुमच्या मुलांच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप, तुमचा भिषी ग्रुप, तुमचा ट्रेन ग्रुप, तुमचा ऑफिस ग्रुप...असा कोणताही ग्रुप तुम्ही तयार करून आणलात तर त्यासाठी आम्ही तुम्हाला जिथे हवा तिथे, जसा हवा तसा, जेव्हा हवा तेव्हा आणि हो तुमच्या ग्रुपसाठी तुम्हाला टूर मॅनेजर हवा असेल तर टूर मॅनेजरसह कस्टमाईज्ड हॉलिडे आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो. युवर विश इज अवर कमांड. एनिटाइम एनिव्हेअर अराऊंड द वर्ल्ड आम्ही हे तुमच्यासाठी करू शकतो. व्हिसा लागणार्‍या देशांचा हॉलिडे करायचा असेल तर जरा लागलीच वीणा वर्ल्डचं ऑफिस गाठावं लागेल कारण आता व्हिसा कॉन्स्युलेट्समधली गर्दी वाढू लागली आहे. अर्थात असेही अनेक देश आहेत जिथे व्हिसा लागत नाही किंवा व्हिसा ऑन अरायव्हल’ असतो. तिथे पासपोर्ट घ्यायचा आणि चलो, बॅग भरो, निकल पडो’ करायचं. कस्टमाइज्ड हॉलिडेमध्ये तुम्ही तीन-चार गोष्टी आधी ठरवायच्या असतात.

विमानप्रवास: तुम्हाला एखादी प्रेफर्ड एअरलाइनच हवी आहे का? इकॉनॉमी क्लास, प्रिमियम इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लॉस की फर्स्ट क्लासने तुम्हाला विमानप्रवास करायचा आहे? एअरपोर्टवर तुम्हाला काही स्पेशल सर्व्हिस हवी आहे का?

गाडी: तुमचा ग्रुप मोठा असेल तर तुम्हाला बस हवीय की छोट्या कार्स हव्यात की परदेशात जाणार असाल तर मर्सिडिज बेन्झ हवी आहे की कॅम्पर व्हॅन कॅराव्हॅन सारख्या गाड्या हव्यात?

हॉटेल्स: हॉटेल्स, रीसॉर्ट, व्हिलाज्, बंगलो, काय तर्‍हेचं अ‍ॅकोमोडेशन हवंय? त्याची स्टार कॅटेगरी काय बघताय तुम्ही म्हणजे थ्री स्टार, फोर स्टार, फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार, लक्झरी स्टे?

स्थलदर्शन: ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या इथूनच बूक केलेल्या बर्‍या असतात कारण बर्‍याच ठिकाणी ऐनवेळी बुकिंग मिळणं कठीण होतं.

भोजन: तुम्हाला जर अमुक एका रेस्टॉरंटमध्येच जेवण घ्यायचं असेल तर त्याचं बुकिंगही आम्ही तुमच्यासाठी इथूनच करू शकतो.

सो, तुमची फॅमिली, तुमचा ग्रुप, तुमचं बजेट, तुमची आवड आम्हाला सांगा आणि निघा परीक्षांनतर श्रमपरिहाराला एखाद्या मस्त अशा डेस्टिनेशनला भारतात किंवा परदेशात. तुमच्या दिमतीला अगदी तुम्ही टूरवर असतानासुद्धा आहेच व्हर्च्युअली 24/7 वीणा वर्ल्ड कस्टमाइज्ड हॉलिडे टीम. सो डोन्ट वरी! जस्ट गो!

तुमच्या पर्यटनाचे इंट्रेस्टिंग किस्से जरूर कळवा Email: stories@veenaworld.com

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
या मशीनमध्ये दडलंय काय?
19 mins, read

या मशीनमध्ये दडलंय काय?

Published in Maharashtra Times. Date 31st May, 2026 अनेक वर्षं या मशीनमधून फार पूर्वीच बंद झालेली, 1970 आणि 80 च्या दशकातली पेयं पुरवली जात होती. ती त्यात कोण आणून भरतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्य

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!
19 mins, read

ग्रीस - जितकं जुनं ... तितकंच नवीन!

Published in Loksatta Lokrang. Date 31st May, 2026 ...गडद गुलाबी रंगांच्या बोगनवेली उठून दिसत होत्या. सोबत निळ्या कुंड्यांमधली झाडं आणि त्याच्या मागे निळाशार समुद्र असं हे एकदम पोस्टकार्डमध्ये शोभू

प्रवासाला निमित्त कशाला?
19 mins, read

प्रवासाला निमित्त कशाला?

Published in Maharashtra Times. Date 24th May, 2026 ...मात्र सगळ्यात मोठा बदल घडतो तो तुमच्या अंतरंगात. तुम्ही आनंदाचा अनुभव पुढे ढकलणं थांबवता. ‌‘जरा वेळ मिळाला की नंतर करेन‌’ असं स्वतःला न सांगता

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top