Language Marathi

साध्या साध्या गोष्टीभाग 7

ग्रुप टूर आणि इंडिपेंडन्ट टेलरमेड हॉलिडे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही गोष्टी वीणा वर्ल्ड करतं. पर्यटकांच्या ह्या दोन ‘मनःस्थिती’ आहेत असं मी म्हणते. ग्रुप टूर मेन्टॅलिटीचा पर्यटक इंडिपेंडन्ट हॉलिडेला गेला किंवा इंडिपेंडन्ट हॉलिडेवाला ग्रुप टूरला आला तर त्या संपूर्ण सहलीचा विचका होऊ शकतो

वीणा वर्ल्डच्या जाहिरातीद्वारे, माझ्या लिखाणाद्वारे एक गोष्ट नेहमी ठासवण्याचा प्रयत्न असतो तो म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी पर्यटनासाठीचे सुपरपीक सीझन टाळावेत. आजी-आजोबा, नवविवाहीत, ऑफिस गोअर्स थोडक्यात शाळा कॉलेजेसवाल्या मुलांच्या फॅमिलीज सोडून सर्वांनी मीड सीझन, लो सीझनमध्ये प्रवास करावा. शाळा कॉलेजेसच्या सुट्ट्यांवर अवलंबून असणार्‍या फॅमिलीजना पर्याय नसतो त्यांना सुट्ट्यांमध्येच प्रवास वा पर्यटन करावं लागतं. कान्ट हेल्प. अशावेळी पर्यटक मग मेंटली प्रीपेअर्ड असतात पर्यटनस्थळांच्या गर्दीचा सामना करण्यासाठी. जे पीक सीझन वगळून प्रवास करतात त्यांना सहलीचा खर्च कमी असतो कम्पॅरिटीवली आणि पर्यटनस्थळी निवांतपणा असल्याने त्याचा आनंद पुरेपूर घेता येतो. ‘क्यू’ किंवा रांगांमध्ये उभं राहाण्यात लागणारा वेळ वाचतो. फोटोग्राफीला किंवा सोव्हिनियर शॉपिंगला किंवा जस्ट ‘रोम अराऊंड’ ला वेळ मिळतो हे अनेक फायद्यांपैकी काही फायदे. आज स्थलदर्शन हा विषय घ्यायचा हे मी ठरवलं पण त्याचं मूळ मला ‘कधी सहलीला निघायचं’ ह्यात दिसलं. स्थलदर्शन नीट व्हायचं असेल तर त्याला अशी बुकिंगपासूनची तयारी आहे. आता सर्वांचंच पर्यटनावरचं प्रेम वाढलंय. आमच्याकडे वर्षाला एक लाख पर्यटक जर प्रवास करीत असतील तर त्यातले पन्नास हजार प्रवासी हे भारतात पर्यटन करतात तर पन्नास हजार प्रवासी परदेशात. प्रवास करताना फिजिकली आणि मेंटली फिट असणं सर्वात महत्वाचं. ‘सर सलामत तो पगडी पचास’ प्रमाणे प्रवासाला निघायचं म्हणजे शरीर, मन आणि सामान ह्या तिनही गोष्टी लाइट असायला पाहिजेत. आता प्रवासाला निघायचंय म्हणून कोणी पटकन चला दहा-वीस किलो वजन घटवूया असं होत नाही. पण तरीही शरीर ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में’ ह्या स्टाईलमध्ये आणण्यासाठी तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रवासात आपलं पोट साफ असलं पाहिजे. दुसरं आपल्याला झोप चांगली लागली पाहिजे आणि तिसरं आपलं मन कायम आनंदात विहार करीत असलं पाहिजे. आणि ह्या तिनही गोष्टी शक्य होऊ शकतात. आपण कुठे जाणार आहोत, आपला पहिल्या दिवशीचा विमानप्रवास कधी आहे, जाणार्‍या देशाचा आणि भारताचा टाईम डिफरन्स काय आहे त्यानुसार आठ दिवस आधीपासून आपण आपलं बॉडी क्लॉक किंवा बॉडी सायकल अ‍ॅडजस्ट करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपण जर पूर्वेकडच्या देशांमध्ये जाणार असू तर तिथे दिवस आधी सुरू होतो त्यामुळे आपण आठ-पंधरा दिवस आधीपासून जर पहाटे उठायची सवय केली तर तिथे गेल्यावर अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लागत नाही. जर आपण पाश्‍चिमात्य देशांकडे जात असू तर ते वेळेच्या बाबतीत आपल्या मागे असल्याने रात्री उशिरा झोपायला सुरुवात करायची आणि सकाळी उशिरा उठायला. हे केल्याने जेटलॅगचा त्रास आपण टाळू शकतो. त्यानंतर येतो विमानप्रवासाचा पहिला दिवस. ह्यात विमानाची तिथे पोहोचण्याची वेळ बघायची आणि विमानात आपण झोपायचं की जागं राहायचं ते ठरवायचं. थोडक्यात आपण जाणार असलेल्या देशाच्या दिवस रात्रीचं चक्र आत्मसात करायचं. जर त्या देशी रात्र असेल तर शक्यतोवर विमानात खाणं टाळायचं. अल्कोहोलला तर सोडचिठ्ठीच. कारण अडनिड्यावेळी खायल्याप्यायल्याने जर दुसर्‍या दिवशी पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या तर मग सहलीच्या पहिल्या दिवशीच मूड ऑफ होऊ शकतो. दुसरी गोष्ट सहलीला निघण्यापूर्वी आपण कुठे जातोय, किती दिवस जातोय, आपला तिथला टेलिफोन नंबर ह्या गोष्टी इथे असणार्‍या आपल्या नियर अ‍ॅन्ड डीयरकडे ठेवून द्याव्या. तसंच तुमचा पासपोर्ट आणि व्हिसाची कॉपीही तुमच्यासोबत असावी. दोघं प्रवास करीत असाल तर एकाची कॉपी दुसर्‍याकडे ठेवावी. एकाच पर्समध्ये पासपोर्ट आणि कॉपी ठेवू नये. तीच गोष्ट कपड्यांची, प्रवास म्हटला की अनेक सरप्राईजेसना आपल्याला सामोरं जावं लागतं; त्यात फ्लाइट डीले, बॅग मिसिंग हे प्रकार होऊ शकतात. आणि आपण लकी असलो तर आपल्याला सहलीसोबत तोही अनुभव फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. त्यामुळे आपल्या चेक इन बॅग्ज जरी ‘वन पर्सन, वन बॅग’ अशा सेपरेट सेपरेट असल्या तरी प्रत्येकाने कपड्यांचा एक-एक जोड हा दुसर्‍याच्या बॅगेत ठेवावा. मग बॅग मिसप्लेस झाली, ती मिळायला उशीर झाला तरी अडत नाही. तसंच बहुतेक सर्व सहलींवर आपण सकाळी पोहोचतो. युनिव्हर्सल चेक-इन टाईम दुपारी तीन वाजता असल्याने आपल्याला एखादं स्थलदर्शन करून हॉटेल चेक-इन करावं लागतं. त्यामुळे एअरपोर्टवरंच फ्रेशनअप व्हावं लागतं, त्यादृष्टीने टॉयलेटरीज आणि बदलण्यासाठी एखादा टॉप वा टी-शर्ट हँडबॅगेत ठेवावा. जेणेकरून ब्रश केला, टी-शर्ट बदलला आणि जरा हलकासा मेकअप केला की आपल्यालाच बरंं वाटतं. न बदलता येणार्‍या परिस्थितीशी जमवून घेण्याचा हा मार्ग.

ग्रुप टूर आणि इंडिपेंडन्ट टेलरमेड हॉलिडे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही गोष्टी वीणा वर्ल्ड करतं. पर्यटकांच्या ह्या दोन ‘मनःस्थिती’ आहेत असं मी म्हणते. ग्रुप टूर मेन्टॅलिटीचा पर्यटक इंडिपेंडन्ट हॉलिडेला गेला किंवा इंडिपेंडन्ट हॉलिडेवाला ग्रुप टूरला आला तर त्या संपूर्ण सहलीचा विचका होऊ शकतो त्यामुळे आपली मनःस्थिती, स्वभाव, आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार हॉलिडे वा टूर बूक करणं चांगलं. ह्याचं कारण, जेव्हा तुम्ही ग्रुप टूरला येता तेव्हा तुमची आयटिनरी किंवा सहल कार्यक्रम आम्ही स्थलदर्शनाने खचाखच भरलेला असतो. कमी वेळात आणि कमी खर्चात जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला दाखवायच्या असतात. कधी कधी मी जेव्हा पर्यटकांना भेटते सहलींवर तेव्हा कुणीतरी ‘अहो थोडं कमी दाखवलं तरी चालेल आमचे डोळे दिपले आणि थकले आता बघून’ असा फिडबॅक मिळतो. मी हसून म्हणते की, “इथे आल्यावर तुम्ही हे म्हणता पण बुकिंग करण्याआधी, हे नाही का तुमच्याकडे, ते नाही का? असं कम्पॅरिझन तुम्हीच करता नं”. मग कुणीतरी मागून म्हणतं, “हो, आम्हीसुध्दा पाच-सहा ट्रॅव्हल कंपन्यांच्या कार्यक्रमासोबत तुलना केली होती’. मला काही बोलावंच लागत नाही पण माझं स्वतःचं मत आहे की जेव्हा तुम्ही सहलीच्या दिवसाच्या प्रत्येक तासाचे अमूक एक पैसे भरता तेव्हा त्या दिवसाच्या कार्यक्रमात जेवढं बसतं तेवढं जास्तीत जास्त दाखवायचा आमचा प्रयत्न असतो. आमचे टूर मॅनेजर्स ह्यावरून माझी खिल्ली उडवत असतात, ‘ह्यांना शक्य असतं नं तर ह्यांनी रात्रीही पर्यटकांना स्थलदर्शन करायला लावलं असतं’. असो. जोक्स अपार्ट, पण ग्रुप टूरला आल्यावर तुमचा दिवस फुल्ली पॅक्ड असणार हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. तिथे आमच्या इंडिपेंडन्ट सिग्नेचर हॉलिडेजवाल्या पर्यटकासारखा आरामाला वेळ नसतो. आराम करायचा म्हणजे रात्री किमान सहा तास व्यवस्थित झोप घ्यायची हॉटेलमध्ये आणि जर बस प्रवास सिनिक नसेल तर शक्य झाल्यास त्या प्रवासात झोप भरून काढावी. अर्थात आमचे टूर मॅनेजर्स बस प्रवासात धम्माल आणण्यासाठीही सुप्रसिध्द आहेत ही गोष्ट वेगळी.

बरीच मंडळी या आणि पुढच्या आठवड्यात प्रवासाला निघालीयत. त्यांना हॅप्पी जर्नी! बॉन व्होयाज! एन्जॉय एव्हरी मोमेंट अ‍ॅन्ड सेलिब्रेट लाईफ!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*