पोस्ट टूर हॉलिडे

0 comments
Reading Time: 7 minutes

कोणतीही सहल म्हटली की स्थलदर्शनाने ती खचाखच भरलेली असणार हे ओघाने आलं. पूर्वी मी म्हणत असे की, “सहलीवरून घरी आल्यावर दोन दिवस आराम करा आणि मग रूटीन सुरू करा”. आता मी म्हणतेय, “सहल संपल्यावर त्या शेवटच्या शहरात दोन-तीन दिवस राहा, पायी फिरा, स्थानिकांसारखं कॉफी शॉपमध्ये निवांत वेळ घालवा किंवा”…

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, युरोपच्या सहली सुरू करून बर्‍यापैकी वेळ झाला होता. तेव्हा एकाच प्रकारची युरोपची टूर होती, आता एकूण सदुसष्ठ प्रकारच्या युरोपच्या टूर्स आहेत. कसं काय माहीत नाही पण अगदी पूर्वीपासून ‘सहल’ ह्या प्रकारात त्याच्या कार्यक्रमाची आखणी करताना पर्यटकांना भरपूर स्थलदर्शन दाखवायचं हा दृष्टीकोन दृढ होत गेला, आणि पर्यटकांना तो आवडला. आमच्या ऑफिसेसमध्ये सेल्स काऊंटरवर ‘त्यांच्या सहलीत हे आहे, तुमच्या सहलीत हे नाही का?’ अशी तुलना कायम सुरू असते पर्यटकांची आणि त्यामुळे आमच्या प्रॉडक्ट डिझाइन टीमची. दिलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे ही भावना. गेल्या अनेक वर्षात सहलीवरील दिवसाचा, स्थलदर्शनाचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा एक साचा पक्का होत गेला. आम्हाला आणि पर्यटकांनाही त्याची सवय लागली. जेव्हा ही युरोपची एकाच प्रकारची सतरा दिवसांची सहल होती, तेव्हा मी असा विचार केला की अर्धी सहल झाल्यानंतर आठ नऊ दिवसांनी एक अर्धा दिवस मोकळा देऊया. काही जणं आराम करतील, काही मंडळी त्या युरोपमधल्या शहरात पायी फिरल्याचा आनंद घेतील तर काही युरोपीयन्स (म्हणतात नं, ‘व्हेन इन रोम, डू अ‍ॅज द रोमन्स डू’) बनून कॉफी शॉपमध्ये जाऊन त्या छानशा वातावरणात जरा रोमँटिक गप्पा मारतील. उद्देश थोडासा रीज्युविनेशनचा होता पण झालं वेगळंच. सकाळचं सेशन संपलं, जेवण घेऊन सगळी मंडळी हॉटेलला आली आणि आता दुपारी काय करायचं? ह्यासाठी सगळ्यांनी टूर मॅनेजरला प्रेमळ घेराव घातला. तो अनेक ऑप्शन्स देत होता. कुणी म्हणालं, ‘एकत्रच सगळे जाऊया’, कुणी म्हणालं, ‘नाही आम्हाला वेगळं जायचंय’ जवळजवळ एक तास हे सुरू होतं. प्रेमळ संवाद थोडासा गरम व्हायला लागला कारण कुणीतरी म्हटलं की, ‘अ‍ॅक्च्युअली असा फ्री वेळ तुम्ही द्यायलाच नको’. दुसर्‍यांनी री ओढली, ‘अहो, आम्ही तुमच्या भरोशावर, ह्या परक्या देशात आम्हाला कसं कळणार कुठे जायचं ते’. तिसरी कमेंट वातावरण तापवणारी ठरली, ‘आम्ही सहलीला आलो तेव्हा प्रत्येक दिवसासाठी आणि प्रत्येक तासासाठी अमुक एक पैसे भरलेत, आम्ही काय इथे आराम करायला आलोय का? रुममध्येच बसायचं असतं तर आम्ही घरीच राहीलो असतो की’. बापरे बाप. आता प्रकरण खरंच तापलं. माझ्या ‘रीज्युविनेटिंग फ्री अ‍ॅन्ड इझी हाफ डे’ संकल्पनेची वाट लागली. टूर मॅनेजरने मग फोनाफोनी करून आमच्या तिथल्या असोसिएटकडून एक एक्स्ट्रॉ साइटसिइंग करून घेतलं, सर्व पर्यटकांना तो बाहेर घेऊन गेला आणि वातावरण शांत झालं. ह्यामध्ये पर्यटकांचं जराही चुकलं नाही, मी पर्यटक असते तर मीही ह्या अशांत वातावरणात माझ्या संमतीचा दुजोरा दिला असता. कारण सहलीमध्ये जेव्हा आमचा टूर मॅनेजर दिमतीला असतो, त्याच्यासोबत सर्वत्र फिरायची सवय झालेली असते तेव्हा असं एखाद्या दिवशी ‘आता तुमचे तुम्ही फिरा’ ही गोष्ट पल्ले पडत नाही. आणि ह्या ग्रुप टूर्स लोकप्रिय व्हायचं कारणही ते आहे की संपूर्ण कार्यक्रम आखीव रेखीव असतो. वेळेचं नियोजन केलेलं असतं, काळजी घेणारा, सर्व प्रकारच्या सूचना देणारा टूर मॅनेजर असतो त्यामुळे आपल्या डोक्याला कसली चिंता नसते.

त्या सहलीच्या ह्या इन्सिडंटपासून मी कानाला खडा लावला की आता कोणत्याही सहलीत असा फ्री अ‍ॅन्ड इझी वेळ द्यायचा नाही. आणि तेव्हापासून आजपर्यंत सुबह से शाम तक अशा स्थलदर्शनाने पॅक असलेल्या सहली मोठ्या प्रमाणावर हाऊसफूल्ल व्हायला लागल्या. कधी कधी काही पर्यटक म्हणतात की, ‘ह्या सहलीत आम्हाला विश्रांती अशी मिळालीच नाही. रोजच्या धकाधकीतून थोडा विसावा मिळावा म्हणून इथे आलो तर इथे तुम्ही सुबहसे शाम जागते रहो, भागते रहो असं आम्हाला बिझी ठेवलंत’. ह्यांचंही बरोबर आहे, अर्थात त्यासाठी सोल्युशन, वीणा वर्ल्डची सिग्नेचर हॉलिडेजची डिव्हिजन आहे जिथे तुम्हाला हवा तसा तुमच्या मनासारखा मोस्ट रीलॅक्सिंग असा हॉलिडे घेऊ शकता. मग तिथे तुमच्या मागे टूर मॅनेजर नसणार, ‘चला वीणा वर्ल्ड…’ म्हणायला. जस्ट एन्जॉय यूवर ‘मी टाइम’.

पर्यटकांची आणखी एक डिमांड वा कुरकूर असते ग्रुप टूर्सला आल्यावर की ‘तुम्ही आमचे आम्ही फिरायला जराही वेळ देत नाही हो’. आता सहलीत ‘कमीत कमी वेळात, कमीत कमी पैशात’ जास्तीत जास्त दाखवायचं असल्याने असा फ्री वेळ शक्य नसतो आणि दिल्यावर नको तो प्रसंग टूर मॅनेजरवर येतो वर सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे असा फ्री वेळ अगदी नव्याण्णव टक्के सहलीत आम्ही देत नाही किंवा देऊ शकत नाही असं म्हणूया आपण, पण मग काय करायचं हा प्रश्‍न होता. पर्यटकांना ग्रुप टूर्स मोठ्या प्रमाणावर हव्या आहेत, हे रोज वाढणारी आकडेवारी निदर्शनास आणतेय. जास्तीत जास्त पर्यटकांना एकटं फिरायचं नाहीये, त्यांना त्यांची काळजी घेणारा टूर मॅनेजर दिमतीला हवाय. पर्यटक गमतीत म्हणतात, ‘तुमच्या टूर मॅनेजर शिवाय आमचं पान हलत नाही’ आणि तरीही काही पर्यटकांना एकट्यांनाही फिरायचंय. सुर्वणमध्य गाठणं आमचं काम.

युरोपमध्ये इतके भाग म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन, ईस्टर्न, वेस्टर्न, सेंट्रल, बाल्टिक, मेडिटरेनियन आहेत तसंच इतक्या सहली आहेत की ह्या प्रत्येक भागाची सहल ही ग्रुप टूर च्या माध्यमातून करावी कारण सर्वत्र भाषेचा अडसर, इझी ट्रान्सपोर्टचा अभाव, भोजनाची अडचण त्यामुळे ग्रुप व टूर मॅनेजर ह्यांच्या साह्याने फिरणारे पर्यटक जास्त, फक्त भारतातलेच नव्हे तर जगभरातले. एकदा एखादा देश-प्रदेश पाहिला, तो आवडला तर नंतर त्या ठिकाणी सिग्नेचर हॉलिडेजकडून हवा तसा हॉलिडे बनवून घ्यायचा हा एक ऑप्शन आम्ही पर्यटकांना देतो. पण ज्यांना पुन्हा त्याच देशात जायचं नाहीये त्या पर्यटकांसाठी आम्ही जाहीर केलेत ‘पोस्ट टूर हॉलिडेज’. ह्यात आपली सहल ज्या ठिकाणी, ज्या शहरात संपते तिथे दोन वां तीन दिवस आणखी राहायचं मग फक्त आराम आणि पायी भटकंती करायची किंवा तिथलं एखादं ‘डे टूर’चं पॅकेज घ्यायचं ही संधी आम्ही पर्यटकांसाठी आणलीय. मागच्या आठवड्यात आम्ही हे जाहीर केलं आणि वीणा वर्ल्डच्या प्रभादेवी सेल्स ऑफिसमध्ये श्री. गणेश घांगुर्डे ह्या आमच्या पर्यटकांनी त्याचा श्रीगणेशाही केला. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आपल्या युरोपच्या बर्‍याचशा सहली ह्या इटलीतील रोम किंवा मिलान ह्या शहरात संपतात. तिथे आम्ही तुमच्यासाठी रोमचं वा मिलानचं दोन रात्रींचं सीटी मधलं हॉटेल, ब्रेकफास्टसह फ्री अ‍ॅन्ड इझी पॅकेज तयार केलंय. रोमहून तीन रात्रींचं ‘कॅप्री अमाल्फी सोरेन्टो’ असं पॅकेज ‘सिटी हॉटेल, ट्रेन तिकिट, डे टूर आणि हॉटेल विथ ब्रेकफास्ट’ असं तयार केलंय. मिलानहून असंच पॅकेज आम्ही लेक कोमो आणि लेक लुगानो ह्या निसर्गसुंदर ठिकाणांना कव्हर करणारं तयार केलंय. युरोपसाठी अनेक सहली आहेत. त्यांना ज्या ज्या शहरात आम्हाला पोस्ट टूर हॉलिडे देणं शक्य आहे तिथे आम्ही ते आणले आहेत. ह्यामध्ये न्यूयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को, मियामी, लंडन, म्युनिक, पॅरिस, रोम, मिलान, झ्युरीक, अ‍ॅमस्टरडॅम, मेलबर्न, सिडनी अशा शहरांचा समावेश आहे. ज्यांना ज्यांना अशा तर्‍हेने टॅ्रव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट ही वीणा वर्ल्ड त्रिसुत्री अनुभवायची आहे, त्यांनी आजच वीणा वर्ल्ड ब्रांच ऑफिसेस किंवा प्रिफर्ड सेल्स पार्टनर्स किंवा डायरेक्ट ऑनलाइन बुकिंग करून संपर्क साधावा. पोस्ट टूर हॉलिडे सहलीचा आनंद निश्‍चित द्विगुणित करेल यात शंका नाही.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*