नित्य नवं काही…

0 comments
Reading Time: 8 minutes

बॅकस्टेजला अबुधाबीने निकोप स्पर्धेद्वारे जगाच्या पर्यटन नकाशावर स्वत:ला कधी तयार केलं हे कुणाला कळलंही नाही. काही दिवसांपूर्वी अबुधाबी टूरिझमचं शिष्टमंडळ आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये धडकलं त्यांच्या एतिहाद एअरलाईन्सच्या रीप्रेझेंटेटिव्हजसह आणि त्यांनी अबुधाबीचं प्रेझेंटेशन दिल्यावर आमच्या सर्वांच्या तोंडून एकच प्रश्‍न आला ‘एवढं सगळं आहे अबुधाबीत?’ प्रगतीचा वेग म्हणजे काय ते ह्यांच्याकडून शिकावं.

दर आठवड्याच्या ह्या लेखासाठी काय नवीन विषय निवडावा? सतत एखादी नवीन सहल मागणार्‍या आमच्या पर्यटकांसाठी कोणत्या नवीन सहली आणाव्या? असलेल्या सहलींमध्ये नवीन काही अ‍ॅडिशन करता येईल का? एखादं आऊटडेटेड स्थलदर्शन काढून टाकता येईल का? किंवा पर्यटकांच्या बदलत्या आवडींनुसार एखादं नावडतं झालेलं पर्यटनस्थळ वगळता येईल का? सहलींची कॉम्बिनेशन्स कशी वेगवेगळी करता येतील? पर्यटकांसाठी सहलीचा क्रम किंवा सीरियल कशी व्यवस्थित करता येईल? जेणेकरून एकापाठोपाठ एक सहली करताना रीपिटेशन होणार नाही, यासाठी माझ्यासोबतच संपूर्ण वीणा वर्ल्ड टीमही नेहमी नवनवीन गोष्टींच्या शोधात असते. सध्याच्या जगात ज्या वेगाने गोष्टी घडताहेत, बदलताहेत, साधं मोबाईलचं उदाहरण बघितलं तर पूर्वीचे म्हणजे अलिकडचेच चार-पाच वर्षांपूर्वी आपण वापरत असलेले फोन्स आता खेळणं वाटताहेत. न्यू अपडेट्स आणि अपग्रेड्सनी आपल्या आयुष्याला एक वेग दिलाय. अर्थात त्याचा वापर करून आपल्या कामामध्ये-व्यवसायामध्ये आपल्याला गती आणता आली पाहिजे. तर त्याचा उपयोग आहे. ह्या नित्य नव्याने आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या-आयुष्य आणखी सोप्प करणार्‍या अनेक गोष्टींचा वापर आपल्याला विधायक कामासाठी करता आला पाहिजे तर इंटरनेटसारखी गोष्ट वरदान आहे, अन्यथा… काही बोलायची गरजच नाही, आपण रोज पेपरात वाचतोय. असो.

आपण जे करतोय त्यात सतत नित्य नवं काही करण्यासाठी आता वीणा वर्ल्ड टीम सरावलीय. एखाद्या सहलीचा कार्यक्रम जर काही वर्ष तसाच असेल तर आता आमचे टूर मॅनेजर्स किंवा प्रॉडक्ट डिझायनिंग टीम आग्रह धरायला लागलीय की, ‘चला आता नवीन काही आणूया, वेगळं काहीतरी अ‍ॅड करूया’. कोणत्याही संस्थेत ‘बदल’ किंवा ‘चेंज’ घडविणारी आणि स्विकारणारी मानसिकता असेल तर त्या संस्थेचा उत्कर्ष कुणीही थांबवू शकत नाही. सध्याच्या जमान्यात, ‘जे आहे ते बरं आहे, आता त्यात बदल कशाला? चाललंय ते चांगलंय की’ अशा तर्‍हेची जर मानसिकता असेल तर ती बदलायला हवी कारण झपाट्याने बदलणार्‍या जगाबरोबर आपल्याला रहायचं असेल तर संस्थेची संस्कृती आणि परंपरा ही बदलाची हवी. अर्थात हे एका रात्रीत किंवा लागलीच होत नाही. संस्कृतीची रूजवात आणि त्याची मशागत हे ध्येय असायला हवं. वेळ लागतो ह्या गोष्टींना. वीणा वर्ल्ड सुरू झाल्यावर आम्ही पहिल्यांदा बनवली होती ती काही सुत्र आणि धोरणं. त्याबरहुकूम आणि कधी वेळ पडली तर त्यात थोडासा बदल करून आम्ही मार्गक्रमणा सुरू ठेवली आणि आज पाच वर्षांनंतर त्याची फळं दिसायला लागलीयत. ‘अभी दिल्ली बहुत दूर है’ असं म्हणता येईल. पण आपला मार्ग बरोबर आहे हे ही नसे थोडके.

मागे एकदा वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडे डिव्हिजनच्या एका नाविन्यपूर्ण सहल कार्यक्रमाला  बेस्ट आयटिनरीसाठी फ्रान्स टूरिझम बोर्डकडून ‘फ्रेंच अ‍ॅम्बॅसेडर’अवॉर्ड मिळालं होतं. ह्या आठवड्यात पंचवीस सप्टेंबरला भारतातील युएसए टूरिझम बोर्डच्या इंडिया मिशनचं औचित्य साधून, जास्तीत जास्त पर्यटक उत्कृष्ट सहल कार्यक्रमाद्वारे युएसएला नेल्याबद्दल वीणा वर्ल्डला युएसए टूरिझमकडून ‘गोल्ड अवॉर्ड’देऊन गौरविण्यात आलं. अवॉर्ड मिळालं की विसरायचं आणि नव्याने पुन्हा जोमाने  कामाला लागायचं ही वीणा वर्ल्डची पद्धत, त्यामुळे अवॉर्ड मिरवायचं नाही पण चांगल्या नाविन्यपूर्ण आयटिनरीज ह्या त्या-त्या देशांच्या संबंधित शिष्टमंडळांकडून शाबासकी मिळविताहेत ही उत्साहवर्धक गोष्ट आहे, जी बदलाची मानसिकता स्विकारणार्‍या आमच्या संपूर्ण टीमसाठी त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती आहे म्हणून त्याचं महत्व.

अमेरिकेसाठी आमच्याकडे खूप कमी सहल कार्यक्रम होते पण ह्यावर्षी साउथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका मिळून एकूण १९ वेगवेगळ्या पद्धतीच्या सहली आम्ही पर्यटकांसाठी आणल्या आहेत. ‘अहो आमच्याकडे युएसएचा दहा वर्षांचा व्हिसा आहे, आता पुन्हा कुठेतरी घेऊन चला’ असं हक्काने मागणार्‍या आमच्या पर्यटकांची सोय झाली. साउथ अमेरिका- ब्राझिल-अर्जेन्टिनापासून वेस्ट इंडिज, करेबियन आयर्लंड, मेक्सिको, हवाई, अलास्का, कॅनडा आणि युएसएपर्यंत एकसे एक सहलींचा खजिना निर्माण झाला तो बदल घडविण्याचा किंवा करण्याचा उत्साह असलेल्या मानसिकतेमुळे. युएसएच्या नेहमीच्या आयटिनरीजमध्येसुद्धा येलोस्टोन नॅशनल पार्क आणि माऊंट रशमोर हे आम्ही मुख्य सहलींमध्ये घेतलं तर युएसए बाय रोड अशी आणखी एक नाविन्यपूर्ण सहल आणली, ज्यांना इंटरनल विमानप्रवास नकोय आणि युरोपसारखं अथपासून इतिपर्यंत बसने युएसए वारी करायचीय त्यांच्यासाठी. आणि ह्या सर्व सहलींना पर्यटकांनी मस्तपैकी उचलून धरलंय. काही सहलींना लवकरच हाऊसफूल्ल बोर्डही लागेल. आणि हो, पुढच्या वर्षीच्या समर सीझनची गोष्ट करतेय मी.

‘युरोपमध्ये तर अलिबाबाची गुहाच आहे’, असं म्हणता येईल एवढी कॉम्बिनेशन्स आहेत. पण ते करतानाही आम्ही शक्यतोवर रीपिटेशन होणार नाही ह्याची काळजी घेतलीय. वेस्टर्न युरोप-पर्यटक पहिल्यांदा युरोपला जातात तेव्हा ही सहल करतात. ह्यात तेवीस दिवसांपासून पाच दिवसांच्या सहली आहेत. इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, जर्मनी, लक्झमबर्ग, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, लिश्टनस्टाइन, इटली, मोनॅको, स्पेन, व्हॅटिकन ह्या मोस्ट डिमांडमध्ये असलेल्या देशांच्या सहलींची ही कॉम्बिनेशन्स आपल्या सवडीनुसार- आवडीनुसार आणि बजेटनुसार पर्यटक घेत असतात. त्यानंतर सर्वसाधारणपणे पर्यटक स्कॅन्डिनेव्हिया रशियाची म्हणजे नॉर्दन युरोपची सहल करतात. हल्ली तिसर्‍या नंबरवर आलंय, ते सेंट्रल आणि ईस्टर्न युरोप त्यामध्ये पोलंड, जर्मनीतला ईस्टर्न भाग म्हणजे बर्लिन, झेक, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी, माँटेनिग्रो ह्या देशांकडे पर्यटकांची जास्त पसंती दिसायला लागलीय. चौथ्या नंबरवर स्कॉटलंड आयर्लंड वेल्स, स्पेन पोर्तुगाल मोरोक्को किंवा इजिप्त ग्रीस टर्कीवर स्वारी करतात पर्यटक. नव्याने बाल्टिक-बाल्कन आणि युरेशियन युरोपचीही भर पडलीय. पर्यटकांमध्ये एकावेळी खूप देश बघणारे, एकावेळी दोन-तीन देश करणारे किंवा एकावेळी युरोपमधला फक्त एक देश बघणारे पर्यटक अशी वर्गवारी आहे आणि ह्या सगळ्यांसाठी आम्ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स दिली आहेत. ग्रुप टूर्ससाठी वीणा वर्ल्डकडे युरोप खंडासाठी पंचाहत्तर प्रकारच्या सहली आहेत त्यामुळे युरोप प्रेमींना खूश व्हायला हरकत नाही. अर्थात एकच विंनती आहे ती म्हणजे युरोपचं पर्यटन करताना थोडं प्लॅनिंग आवश्यक आहे, कोणत्या वर्षी कोणती टूर करणार ह्याचं. त्यासाठी आम्ही एक पॉकेट लीफलेट बनवलंय ते समोर ठेवा प्लॅनिंगसाठी. युरो वाढतोय पण अजूनतरी आम्ही भारतीय रूपयांत सहलीची संपूर्ण रक्कम भरण्याची सोय मागे घेतली नाही, तेव्हा शुभस्य शिघ्रम.

बदल घडविण्याची मानसिकता खूप काही करू शकते हे वरच्या युरोप अमेरिकेच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते. अर्थात हे झाले आमच्या छोट्या संस्थेतले छोटे बदल. पण पर्यटनाच्या बाबतीत देशादेशांमध्ये जे बदल घडताहेत त्याने मती गुंग होऊन जाते. एका फिशिंग व्हिलेजमधून सिंगापूर निर्माण झालं. जगातील पर्यटकांच्या नकाशावर ते एक ‘मस्ट डेस्टिनेशन’ म्हणून दिमाखात विराजमान झालं. पण गेल्या दहा वर्षांत सिंगापूरने टूरिस्ट अट्रॅक्शन्समध्ये जे काही बदल घडवले, त्याने सिंगापूर छोट्यांपासून ज्येष्ठांपर्यंत पुन्हा एकदा भेट द्यायचं ठिकाण झालं. सिंगापूरसारखीच मलेशियाची गोष्ट. ‘मलेशिया-ट्रुली एशिया’ म्हणत त्यांनी असं काही आपल्या देशाला जगासमोर आणलं की युरोपीयन्स आणि अमेरिकन्सना मलेशिया म्हणजेच एशिया वाटायला लागलं. अर्थात त्यांनीही प्रचंड प्रमाणावर टूरिस्ट अट्रॅक्शन्स निर्माण केली आणि जगाला दाखवून दिलं, एक छोटा देश काय करू शकतो ते. सिंगापूर मलेशियामध्ये प्रचंड स्पर्धा आहे पर्यटन श्रेष्ठत्वाच्या बाबतीत. उत्कृष्टतेच्या बाबतीतली ही स्पर्धा दोन्ही देशांचं भलं करतेय ही चांगली गोष्ट. आज एशियामध्ये सिंगापूर जास्तीत जास्त भारतीयांना आकर्षित करतेय पण त्यांच्या ह्या वर्चस्वाला टक्कर द्यायची तयारी केली दुबईने. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ हे त्यांनी सर्वार्थाने सिद्ध केलं आणि अक्षरश: वाळवंटातून दुबईची सुवर्णनगरी एक अद्वितीय पर्यटननगरी उभी राहीली फक्त गेल्या दहा वर्षात. आता सिंगापूर म्हणतंय, ‘मलेशिया तू जरा थांब, आम्हाला नव्याने उदयाला आलेल्या ह्या मिडल ईस्टर्न पर्यटकाचा सामना करू दे कारण भारतीय पर्यटक सध्या दुबई की सिंगापूर अशी तुलना करताहेत’ जसं सिंगापूर-मलेशिया स्पर्धेेचं, तेच घडतंय आता अबुधाबी-दुबईच्या बाबतीत. तसं बघायला गेलं तर ही दोन्ही शहरं म्हणजे जुळी भावंडं. दुबईने जरा वेग जास्त ठेवला प्रगतीचा पण दुबई-दुबई असा घोष आम्ही लावत असताना बॅकस्टेजला अबुधाबीने निकोप स्पर्धेद्वारे जगाच्या पर्यटन नकाशावर स्वत:ला कधी तयार केलं हे कुणाला कळलंही नाही. काही दिवसांपूर्वी अबुधाबी टूरिझमचं शिष्टमंडळ आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये धडकलं त्यांच्या एतिहाद एअरलाईन्सच्या रीप्रेझेंटेटिव्हजसह आणि त्यांनी अबुधाबीचं प्रेझेंटेशन दिल्यावर आमच्या सर्वांच्या तोंडून एकच प्रश्‍न आला ‘एवढं सगळं आहे अबुधाबीत?’ प्रगतीचा वेग म्हणजे काय ते ह्यांच्याकडून शिकावं. लुव्र म्युझियम, शेख झायेद मॉस्क, एमिरेट्स पॅलेस, एतिहाद टॉवर, कॅपिटल गेट, वॉर्नर ब्रदर्स मूव्ही वर्ल्ड, फेरारी वर्ल्ड हे सगळं अबुधाबीत आहे. तुम्हीही चक्रावलात नं! दिवाळीच्या सुट्टीत आणि ख्रिसमसच्या सुट्टीत म्हणून तर आम्ही फक्त अबुधाबीच्या सहलींना सुरुवात करतोय. फुल्ल फॅमिली एंटरटेन्मेंट पॅकेज.

बदलाची मानसिकता आणि त्यामुळे घडणारे नित्य नवे बदल प्रगतीपथावर उत्कर्षाकडे घेऊन जातात त्याची उदाहरणं आपल्यासमोर दाटीवाटीने उभी आहेत, आपली उमेद वाढवताहेत. आपल्या घरात विचारात-आचारात सतत नित्य नवं चांगलं सकारात्मक काही आणत राहीलो तर कोण आपल्या यशापासून आपल्याला रोखणार? लेट्स चेंज फॉर द गूड!

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*