Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

उस मोड़ से शुरू करें...

15 mins. read

‌Published in the Sunday Sakal on 13 July 2025

’वीणा तू मॉरिशसला चाललीयस, तुझे इव्हेंट्स तर संध्याकाळी असतील, दिवसा काय करणार आहेस? आपला मित्र प्रशांत बापट तिथे आहे, त्याला भेटून ये‌’ सुधीरचा सल्ला, ‌‘शुअर, नक्कीच भेटेन मी प्रशांत, प्राची आणि त्यांच्या छोटीला, म्हणजे आनंदिताला.‌’ प्रशांतबरोबर तारीखही ठरवली आणि माझं वास्तव्य असलेल्या रिसॉर्टमध्येच आम्ही लंच फिक्स केलं. सिनियर्स स्पेशल आणि वुमन्स स्पेशलचे मोठे ग्रुप्स मॉरिशसमध्ये होते त्यांना भेटणं आणि संध्याकाळी त्यांचे इव्हेंट्स कंडक्ट करणं हा माझा तिथला कार्यक्रम. प्रशांत फॅमिलीला भेटायचा दिवस आला आणि तिथल्या रेस्टॉरंटमध्ये मी जरा छानसं टेबल द्या म्हणून रिक्वेस्ट केली. कितीजणं येणार आहेत म्हणून एफअँडबी मॅनेजरने विचारलं. मी म्हटलं, ‌‘तिघं, आई वडील आणि छोटी मुलगी.‌’ ‌‘ओह्‌‍ नो!‌’ त्या मॅनेजरच्या चेहऱ्यावर नाराजी. ‌‘का? काय झालं?‌’ माझा आपसूक प्रश्न. तो म्हणाला, ‌‘या रिसॉर्टमध्ये लहान मुलांना प्रवेश नाही. `ॲडल्ट्स ओन्ली‌’ रिसॉर्ट आहे हे.‌’ अरे बापरे, प्रशांत घरून निघाला पण असेल इथे यायला. हे माझ्याही लक्षात आलं नाही. तसंच मी आमच्या तिथल्या असोसिएटलही सांगितलं नाही की मी इथे माझ्या गेस्टसोबत लंच करतेय म्हणून, त्याने तरी मला कल्पना दिली असती. चूक माझी होती आणि तातडीने ती निस्तरणं गरजेचं होतं. आता माझी वेळ होती मॅनेजरला विनवणी करण्याची. आम्ही बऱ्याच ठिकाणी सीआयपी कॅटेगरीत येतो म्हणजे कमर्शियली इम्पॉर्टंट पर्सन, त्यामुळे एकूणच झालेला गोंधळ मॅनेजरच्याही लक्षात आला आणि तो निस्तरायचा कसा याचा तो ही विचार करू लागला. आपल्याला ह्यात ‌‘त्यात काय मोठंसं?‌’ असं वाटेल, पण या अशा सुपिरियर रिसॉर्टचं बुकिंगच जगभरातून आलेल्या लोकांनी केलेलं असतं ते इथे ह्या हॉटेल्स वा रिसॉर्टमध्ये फॅमिलीज्ा, लहान मुलं आणि त्यांचा गडबड गोंधळ नाही म्हणून. ती पहिली अट असते या पर्यटकांची. त्यामुळे लहान मूल दिसलं किंवा त्याच्या रडण्याचा वा हसण्याचा आवाज जरी आला तरी तिथला एखादा पर्यटक हॉटेल, रिसॉर्टला डायरेक्ट कोर्टात खेचू शकतो. तो मॅनेजर म्हणाला, ‌‘आपण त्यांना थोडंसं चोरी छुपे घेऊन येऊया आमच्या दुसऱ्या रेस्टॉरंटला, तिथे गर्दी नसते दुपारच्या वेळी, आणि तिथलं एक छानसं सेक्लुडेड असं टेबल तुम्हाला देतो. एकच रिक्वेस्ट, बाळ रडणार नाही असं बघा.‌’ कुणाला लंचला बोलवायचं मोठ्या आनंदाने आणि तिथे आपली ही अशी अडनिडी अवस्था. बरं काही करताही येत नव्हतं. मॅनेजरला थँक यू म्हटलं आणि प्रशांतलाही आल्यावर परिस्थिती समजावून सांगितली. आमचं जेवण छान झालं, आनंदिताही शहाण्या बाळासारखी राहिली. पण माझी गिल्टी मनस्थिती जेवण संपल्यावरही बराच काळ राहिली. प्रत्येक गोष्टीत ‌‘रात गयी बात गयी‌’ असं होत नाही नं. आज इतक्या वर्षांनी हा प्रसंग लिहितानाही मला, अरे असं कसं झालं आपल्याकडून, एवढी साधी गोष्ट आपण कशी विसरलो? हा विचार आलाच. यानंतर म्हणजे तुम्हा सर्वांशी शेअर केल्यानंतर कदाचित हे जे काही बॅक ऑफ द माइंड गिल्ट आहे ते निघून जाईल.

एखादी गोष्ट घडते आणि त्या चांगल्या वाईटातून आपण काहीतरी शिकतो किंवा ती गोष्ट नवीन आयडिया देऊन जाते असं बऱ्याचदा होतं. त्या दुपारी मी रिसर्च केला की मॉरिशियस मध्ये अशी किती रिसॉर्टस्‌‍ आहेत जी फक्त ‌‘ॲडल्टस्‌‍ ओन्ली‌’ आहेत. काय आहे त्यांची फिलॉसॉफी आणि काय असते मानसिकता तिथे येणाऱ्यांची? `शांतता- सॉलिट्यूड, प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून मोकळे झालोय आता आम्हाला आमचं आयुष्य जगू दे. मुलं, नातवंडं सदृश आम्हाला आमच्या ह्या व्हेकेशनमध्ये काही बघायचंच नाहीये. लेट्स सेलिब्रेट टुगेदरनेस‌’ ही पर्यटकांची मानसिकता, ज्याला हॉटेल्स, रिसॉर्टस्‌‍ नी प्लॅटफॉर्म मिळवून दिला ‌‘ॲडल्टस्‌‍ ओन्ली‌’ टॅग लावून. मॉरिशस, मालदीव्हज््‌ा‍, बाली, सॅन्टोरिनी, करिबियन आयलंड्स अशी अनेक डेस्टिनेशन्स आणि सँडल रिसॉर्टस््‌ा‍, सिक्रेट रिसॉर्टस््‌ा‍, अनंततारा अशा हॉटेल चेन्स `ॲडल्टस्‌‍ ओन्ली‌’ रिसॉर्टस्‌‍ चा पाठपुरावा करतात.

समाजातली एक गरज लक्षात घेऊन हॉटेल्सनी त्यावर बिझनेस उभा केला, एक व्यावसायिक म्हणून मलाही यातून आयडिया मिळाली होती. साधारणपणे त्याचवेळी आणखी एक किस्सा घडला. आमचे विलेपार्ले ला राहणारे मित्र शिरीष आणि अंजू गानू नुकतेच जयपूरला जाऊन आले होते आणि आम्ही कुठेतरी भेटलो. मी विचारलं, ‌‘काय कसा काय झाला हॉलिडे?‌’ अंजू म्हणाली, ‌‘असं पहिल्यांदाच मुलांना सोडून गेलो होतो. आपण एवढे गुरफटून जातो नं मुलांमध्ये आणि कुटुंबात की, असं दोघंच गेल्यावर आता काय करायचं हे कळतच नाही.‌’ हा अंजूचाच प्रॉब्लेम नव्हता, तर हा आमच्या वयाच्या संपूर्ण इंडियन जनरेशनचाच तो माईंडसेट होता किंवा अजूनही आहे. मुलांना, घरच्यांना सोडून दोघांनीच एखाद्या हॉलिडेला जाणं ह्यात अनेकांना गिल्ट वाटतं. मुलं मोठी झालेली असतात, त्यांचं आयुष्य ते जगत असतात पण आई वडील म्हणून आपल्या मनात हे एक गिल्ट असतंच. आपली कुटुंब वात्सल्यता ह्या बाबतीत पराकोटीचीच आहे आणि अर्थातच ‌‘वुई आर हॅप्पी अबाउट इट‌’. आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला ही खंत कदाचित कमी प्रमाणात असेल. ह्याबाबतीत आपल्यापेक्षा ‌‘जीवन त्यांना कळले हो' असं मी म्हणेन.

अंजूच्या उत्तरात आणि मॉरीशियसच्या गोफ्लधळात मला आमच्या बिझनेसमधल्या एका छोट्या स्टार्टअप कॅटॅगरीची आयडिया मिळाली आणि सुरु झाल्या आमच्या 'कपल्स ओन्ली‌‘ टूर्स. प्रथम त्याचं नाव आम्ही 'ज्युबिली स्पेशल' असं ठेवलं होतं. नंतर ते 'कपल्स ओन्ली' असं केलं गेलं आणि आता पुन्हा ते ज्युबिली स्पेशल करूया का? ह्या विचाराने डोकं वर काढलंय. पण एक विचार असाही आहे की ज्युबिली, मग ती सिल्व्हर असो वा गोल्डन, त्यापर्यंत कशासाठी थांबायचं एवढं. एकदा ठरवलं की, `एव्हरी डे इज अ सेलिब्रेशन‌’. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यावर आपण आपल्यासाठी जगायला शिकलं पाहिजे. ह्या दोन प्रसंगांनंतर वीणा वर्ल्डमध्ये ह्या  कपल्ससाठीच्या खास टूर्स सुरू झाल्या. थायलंडच्या अतिशय मस्त टूरने याची सुरुवात झाली. त्यानंतर अगदी युरोपपर्यंत या टूर्स पोहोचल्या. मी स्वतःही या टूर्सना जात होते. तो कन्सेप्ट सेट होईपर्यंत मी जात राहिले आणि नंतर मग माझी उपस्थिती दोन दिवसांवर किंवा फक्त इव्हेंटच्या दिवसापुरती उरली. बिझनेस वाढत होता आणि त्यामुळे आमच्या जबाबदाऱ्याही. एवढे दिवस प्रवासात राहणं अशक्य व्हायला लागलं होतं, त्यात पॅन्डेमिकने घेरलं. जेव्हा जीवन पुन्हा सुरु झालं तेव्हा सर्व्हायव्हलपुढे टूरच्या ह्या छोट्या कॅटॅगरीज सायडिंगला पडल्या. त्यानंतरही बरीच उलथापालथ झाली, पण आता पर्यटन स्थिरावतंय, नव्हे उसळी मारतंय आणि त्याचवेळी आम्ही ‌‘कपल्स ओन्ली‌’ टूर्सना नव्याने सुरुवात करतोय. ह्यामध्ये एक प्रयोग म्हणून आम्ही दोन टूर्स फक्त रिलॅक्सेशन, दररोज थोडंसं साईटसीइंग आणि इव्हिनिंगला आगळेवेगळे ग्रुप गेम्स, गप्पा, गाणी, डान्स, फॅशन शो वा फक्त मोकळा वेळ अशा स्वरूपाच्या करतोय. आणि काही टूर्स या आपल्या रेग्युलर ग्रुप टूर्सप्रमाणे भरपूर स्थलदर्शनाच्या पण एंटरटेनमेंटनेही भरलेल्या अशा आणल्या आहेत. दोन प्रकार करण्याचं कारण हेच की काही कपल्सना रिलॅक्सेशन हवं असणार आहे तर काहींचा `जातोच आहोत तर सगळंच बघून येऊया‌’ हा विचार असणार आहे. आणि पर्यटनसंस्था म्हणून आम्हाला दोन्ही प्रकारच्या कपल्सना खुश करायचंय.

सिल्वर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली किंवा अगदी प्रत्येक पाच वा दहा वर्षांचा माइलस्टोन क्रॉस केल्यावर असं दोघांनी मिळून तशाच समवयीन, समविचारी कपल्ससोबत जगाच्या पाठीवर सुंदर सुंदर डेस्टिनेशन्सवर सेलिब्रेशन करायला काय हरकत आहे? इथे जगजितसिंग चित्रा सिंगची गझल आठवते.

उस मोड़ से शुरू करें

फिर ये ज़िंदगी

हर शय जहाँ हसीन थी,

हम तुम थे अजनबी।

लेकर चले थे हम जिन्हें

जन्नत के ख़्वाब थे फूलों के ख़्वाब थे वो

मोहब्बत के ख़्वाब थे

लेकिन कहाँ है उन में वो

पहली सी दिलकशी।

उस मोड़ से शुरू करें

फिर ये ज़िंदगी...

आपल्या जबाबदाऱ्या अगदी जबाबदारीने पार पाडल्यानंतर, मुलं त्यांच्या त्यांच्या घरट्यात गेल्यानंतर असं स्वतःला इन्सेंटिव्ह द्यायला काय हरकत आहे? आपले लाड आपण नाही करायचे तर कुणी? आणि तुम्हाला काही करायचं नाहीये बरं का? तुमच्यासाठी फक्त ‌‘चलो बॅग भरो निकल पडो‌’. बाकी सर्व करायला टूरवर तुमच्या दिमतीला वीणा वर्ल्डचा लोकप्रिय टूर मॅनेजर असणार आहेच वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह आयडियाज्‌‍ने टूरची रंगत वाढविण्यासाठी आणि तुम्हाला आनंदी आठवणी देण्यासाठी.  लेट्स एन्जॉय द सेलिब्रेशन ऑफ लाईफ!


वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल

प्रवास म्हणजे मोकळा श्वास घेण्याची संधी !

मी शोभना देशमुख, नागपूरला राहते. वीणा वर्ल्डच्या शिवाजी नगर इथल्या ‌’अर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स‌’ या सेल्स पार्टनर मार्फत माझ्या टूर्सचं बुकिंग करते. आता मी 68 वर्षांची आहे. आजवर मी वीणा वर्ल्ड सोबत साधारण 10 टूर्स केल्या आहेत. 2017 साली मी पहिली टूर केली ती श्रीलंकेची. तिथे आम्ही हनुमानाने सीतेला ज्या अशोकवाटिकेत अंगठी दिली त्या अशोकवनात गेलो. खूप विलक्षण अनुभव होता तो. श्रीलंकेनंतर मी मलेशिया, थायलंड, सिंगापूर, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बाली इंडोनेशिया, भूतान या देशांना भेट दिली. अंदमान निकोबार बेटांवर जाऊन आले. युरोपच्या देखील 10 दिवसांच्या टूरवर जाऊन आले. एकदा तर 2-2 महिन्यांच्या अंतराने 3 टूर्स केल्या होत्या. तेव्हा जरा दगदगच झाली. पण तरी बहुतेकदा वर्षातून एखादी परदेशातली टूर मी आवर्जून करते. त्या निमित्ताने वेगवेगळ्या संस्कृतींचं दर्शन होतं. एका डिसेंबर जानेवारीच्या थंडीच्या काळात नैनिताल मसूरीची टूर केली होती. तेव्हा तिथलं निसर्गसौंदर्य अप्रतिम होतं. नैनी लेक, तिथली थंडी सगळंच अगदी स्वप्नवत होतं. वीणा वर्ल्डची  सोय उत्तम असते. त्यांचे टूर मॅनेजर्स सगळ्यांची अगदी आपुलकीने काळजी घेतात. मी वुमन्स स्पेशल टूरसोबत जाते कारण मला छान कंपनी मिळते. आपल्या मनाप्रमाणे वागता येतं, शिवाय वीणा वर्ल्ड सोबत असले की घरच्यांनाही माझी काळजी नसते. घरच्यांसोबत जाण्यातली मजा वेगळी आणि अशी एकटीने जाण्यातली मजा वेगळी. इथलं स्वातंत्र्य वेगळं असतं. या टूर्समध्ये नवीन मैत्रिणीही होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती हे पहायला मिळतं, त्यातून शिकायला मिळतं. माझ्या टूर्समधल्या अनेक मैत्रिणी पुणे-मुंबईत राहतात. तिथे काही निमित्ताने गेले की त्यांना भेटणं होतं. इतक्यात तब्येतीमुळे कुठे फिरायला गेली नाहीये. अमेरिकेची व्हिसा ॲप्लिकेशन्स ओपन झाली की तो काढून अमेरिकेची टूर करायची आहे. या वुमन्स स्पेशल टूर्स म्हणजे माझ्यासाठी आणि अनेकींसाठी मोकळा श्वास घेण्याची संधी असते आणि मी त्या संधीचा पुरेपूर लाभ घेते.


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

सीझन्स ट्रेंडिंग लडाख

विथ वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

Leh Ladakh

कल्पना करा, तुम्ही गाडीने हिमालयात फिरताय आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्गाची सुंदर दृश्यं तुमचं स्वागत करतायत. एकीकडे निळाशार तलाव, दुसरीकडे उंचच उंच डोंगर, शांत मोनॅस्ट्रीज, आणि रात्री आकाशात चमचमणाऱ्या लाखो ताऱ्यांचा नजारा! ही आहे लेह लडाखची सफर, आणि आत्ताच ती अनुभवायची सगळ्यात उत्तम वेळ आहे. वीणा वर्ल्ड तुमच्यासाठी घेऊन आलंय खास 9 दिवसांचा प्रायव्हेट कस्टमाईज्ड लडाख विथ हानले अँड त्सोमोरिरी फक्त ₹62,000 मध्ये! ह्यात तुम्हाला मिळेल तुमच्यासाठी खास शोफर-ड्रिव्हन गाडी, आणि तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या सवडीनं फिरण्याची संधी.

या हॉलिडेमध्ये थ्रिल आहे खारदुंगलाचं जो आहे जगातला सगळ्यात उंच मोटारेबल रोड. तसंच पँगाँग लेक चे रंग दिवसात तीन वेळा बदलतात आणि बघताना नजर हटत नाही! त्सोमोरिरी आणि त्सोकर हे शांत, सुंदर तलाव आहेत, अगदी पोस्टकार्डसारखे. नुरपा पास आणि याया त्सो सारख्या ऑफबीट रुट्स वरून फिरताना ऍडव्हेंचरची मजा काही औरच असते. हानले मोनॅस्ट्रीमध्ये तुम्हाला शांतता अनुभवता येते आणि तिथलं ऍस्ट्रॉनॉमिकल ऑबझर्व्हेटरी म्हणजे सायन्स आणि नेचरचं सुंदर कॉम्बिनेशन. मेराक किंवा हानले मध्ये रात्रीची गाईडेड स्टारगेझिंग करताना पूर्ण आकाश तुमच्यासाठी उघडलेलं असतं! शेवटी भेट द्या तुर्तुक या बॉर्डरजवळच्या गावाला. तिथलं बाल्टी कल्चर, लोकांचा साधेपणा आणि आदरातिथ्य तुमचं मन जिंकेल.

सध्या जुलै ते सप्टेंबर म्हणजे लडाखला जाण्यासाठी परफेक्ट सीझन आहे. स्वच्छ आकाश, झकास हवामान, आणि रोडस्‌‍ पण अगदी खुले! इतक्या स्पेशल डेस्टिनेशनला जायची हीच योग्य वेळ आहे. आता वेळ वाया घालवू नका. आणखी किती दिवस फक्त मित्र-मैत्रिणींच्या लडाखच्या स्टोरीज लाईक करायच्या? आता तुम्हीही वीणा वर्ल्ड सोबत तुमचा लडाखचा अनफर्गेटेबल हॉलिडे आत्ताच बुक करा आणि आयुष्यभर लक्षात राहील अशा एका सुंदर हॉलिडेचा अनुभव घ्या! बाकी सगळी काळजी घ्यायला आमची टीम सज्ज आहेच.


अराऊंड वर्ल्ड

क्रुझ एक्सपीडिशन

क्रुझ एक्सपीडिशन म्हणजे क्रुझमधून जगभ्रमंती. क्रुझ पर्यटनाचे 2023 मधील उत्पन्न 154 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक होते. या क्रुझ साधारण 90 ते 270 दिवसांचा प्रवास करतात आणि सहा खंडांमधील अनेक देशांना भेट देतात. द वर्ल्ड किंवा एमव्ही नरेटिव्ह सारख्या रेसिडेन्शियल क्रुझ देखील आहेत. या जहाजांवर लोकं घरे घेऊन राहतात आणि वर्षभर प्रवास करतात. अशा क्रुझेस फ्लोटिंग सिटीज्‌‍ मध्ये रूपांतरित होतात, जिथे जिम, स्पा, थिएटर, लायब्ररीज, वैद्यकीय केंद्रे आणि रिमोटली काम करणाऱ्यांसाठी वायफायची उत्तम सुविधा असते. बरेचसे पर्यटक अंटार्क्टिका, आर्क्टिक, अलास्का, ॲमेझॉन रिव्हर, आईसलँड इथे प्रवास करण्यासाठी एक्सपीडिशन क्रुझ घेतात. भारतीय पर्यटकांमध्ये कॉर्डेलिया क्रुझ प्रसिद्ध आहेत ज्या मुंबई, गोवा, लक्षद्वीप, कोचीन इथून जातात. अनेक क्रुझवर भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बॉलिवूड स्टाईल एंटरटेनमेंट, भारतीय खाद्यपदार्थही मिळतात. याशिवाय नॉर्वेजियन क्रुझ लाईन, रॉयल कॅरिबियन, कार्निवल, सेलिब्रिटी क्रुझ, एमएससी हे काही जगप्रसिद्ध क्रुझ ब्रँड्स आहेत. तुम्हालाही आवडेल का अशी जगभ्रमंती?


देखो अपना देश!

तामिळनाडू मंदिरांची भूमी

इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी तामिळनाडू ही सोन्याची खाण आहे. तामिळनाडू हे राज्य भारतातील ‌‘मंदिरांची भूमी‌’ म्हणून देखील ओळखले जाते. या राज्यात 38000 हून अधिक मंदिरे आहेत जी मागील राजवंशांच्या कला आणि शैलीचे दर्शन घडवतात. या राज्याला परदेशी नागरिकही मोठ्या प्रमाणावर भेट देतात. हे जगातल्या सर्वात जुन्या भाषेचे म्हणजेच तमिळचे माहेरघर आहे. या राज्याला अंदाजे 1076 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भरतनाट्यम्‌‍ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रीय तमिळ नृत्यशैलीचे हे जन्मस्थान. हे सात भारतीय शास्त्रीय नृत्यांपैकी एक आहे. या नृत्यात विशिष्ट मुद्रा आणि अभिनय यांचा सुंदर मेळ पहावयास मिळतो. खडू, डिंक, मौल्यवान दगड आणि मोत्यांचा वापर करून उदयास आलेली तंजोर चित्रकला ही तामिळनाडू राज्यातील प्रसिद्ध कला आहे. तामिळनाडूतील सर्वात जुना आणि पारंपरिक बैलांना पकडण्याशी निगडीत जलीकट्टू नावाचा खेळ दरवर्षी पोंगल सणाच्या दरम्यान आयोजित केला जातो. या राज्यात आपल्याला द्रविडिअन शैलीतील वास्तूकला पहायला मिळते. हिंदू पौराणिक कथांमध्ये उल्लेख असलेल्या कांचीपुरम सिल्कसाठी तामिळनाडू हे राज्य प्रसिद्ध आहे. तामिळनाडूच्या कोरोमंडल किनारी प्रदेशातील एक लोकप्रिय स्थळ म्हणजे महाबलीपुरम्‌‍. या ठिकाणची प्राचीन शिल्पं त्यांच्या सुंदर कोरीव कामांसाठी जगप्रसिद्ध आहेत. मदुराई हे तामिळनाडूचे सांस्कृतिक केंद्र आहे. इथले मीनाक्षी मंदिर प्रसिद्ध आहे. इथे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर पहायला मिळते. इथे रामाने, सीतेने बनविलेल्या शिवलिंगाची स्थापना केली होती. याशिवाय धनुषकोडी हे ठिकाण आपल्या पौराणिक ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. हा पूल श्रीरामाने लंकेला पोहोचण्यासाठी बांधला होता असं म्हणतात. राजा रविवर्मा यांची प्रसिद्ध आर्ट गॅलरी आपल्याला इथे पहायला मिळते. या राज्यातील कन्याकुमारी हे भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक. इथलं कन्याकुमारी मंदिर आणि स्वामी विवेकानंद रॉक मेमोरिअल प्रसिद्ध आहे.

इथल्या पाककृतींमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात. कडीपत्ता आणि नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चेट्टिनाड पाककृती हा दाक्षिणात्य नाश्ता प्रसिद्ध आहे. याशिवाय जेवण हे केळीच्या पानावर वाढले जाते. डोसा, इडली, सांबार, रस्सम हे इथले प्रसिद्ध खाद्यपदार्थ तर पायसम, गोड पोंगल, रवा केसरी हे खास गोड पदार्थ. असं हे आपल्या सांस्कृतिक इतिहासासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य तुम्ही पाहिलंत की नाही अजून ?


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

भूगोलाच्या पुस्तकात आपण पाहतो की नकाशात पाण्याचे साठे हे निळ्या रंगाने दाखवले जातात. पण निसर्ग आपल्याला आगळ्यावेगळ्या गोष्टींनी थक्क करत असतो. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामधले  अद्भुत असे पिंक लेक्स. पश्चिम ऑस्ट्रेलिया मधले काही लेक्स त्यांच्या नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या बबलगम-पिंक वॉटरसाठी प्रसिद्ध आहेत. जगातील बहुतेक सरोवरांना त्यांचा रंग शैवाल सारख्या सूक्ष्मजीवांपासून मिळतो.  या पाण्याला गुलाबी रंग त्यातील डुनालिला सॅलिना या विशिष्ट प्रकारच्या मायक्रोऑर्गनिझम्स म्हणजेच सूक्ष्म शैवालामुळे मिळतो, जे सॉल्टी कंडिशन मध्ये वाढतात आणि लालसर रंगद्रव्ये म्हणजे पिगमेंट्स तयार करतात. ऐतिहासिकदृष्ट्या पिंक लेक हा लेक वॉर्डन सिस्टीममधील टर्मिनल लेक होता. उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी कमी होत असताना क्षारांचे प्रमाण वाढल्याने या देशातल्या तलावांमध्ये गुलाबी रंग दिसून येतो. ऑस्ट्रेलियामध्ये दहापेक्षा जास्त उल्लेखनीय पिंक लेक्स आहेत. हे आपल्याला प्रामुख्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया मध्ये पहायला मिळतात. पिंक लेक्स हे सूर्यप्रकाशात, कोरड्या हवामानात जास्त व्हायब्रंट दिसतात, तर पावसानंतर किंवा ढगाळ हवामानात ते निस्तेज दिसतात. पिंक लेक्स विशेषतः ड्रोन्स किंवा स्मॉल एअरक्राफ्ट टूर्समधून हवाई फोटोग्राफी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बरेच पिंक लेक्स हे नॅशनल पार्क किंवा कॉन्झर्वेशन झोनमध्ये असल्यामुळे इथे प्रवेश करण्यासाठी आपल्याला परमिट्सची गरज लागू शकते तसंच इथे प्रवेश करण्यासंबंधीच्या नियमांचं पालनही करावं लागतं. इथल्या कटी ठंडा - लेक आयर यांसारख्या लेक साईट्स या पवित्र मानल्या गेल्या आहेत. अनेकदा इथल्या आदिवासी समुदायांचा या स्थळांशी सांस्कृतिक संबंध आढळतो. या लेक्समधून काढलेले मीठ हे सौंदर्यप्रसाधने आणि अन्न उत्पादनांमध्ये वापरले जाते. बर्डलाईफ इंटरनॅशनलने या सरोवराची ओळख एक महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून करून दिली आहे. येथे मोठ्या संख्येने हुडेड प्लोव्हर्स आढळतात. येथे आपल्याला अनेक स्थलांतरित पक्षीही पहायला मिळतात. अशी ही निसर्गाची अद्भुत किमया पहायला चला ऑस्ट्रेलियाला...

July 11, 2025

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top