We Just Opened 3 New Branches!
We're Open, now in Vadodara, Kochi & Nungambakkam (Chennai).
India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Veena World Travel Stories

  • Travel Inspiration
  • Destination Guides
  • Travel Tips

स्वालबार्ड

9 mins. read
Sunila Patil
Sunila Patil
9 Mins Read
April 27, 2026
April 27, 2026

Quick Summary

स्वालबार्डमधील लाँगइयरब्येन हे जगातलं सर्वात उत्तरेकडील शहर असून नॉर्थ पोलपासून फक्त सुमारे १३०० किमीवर आहे.

इथे हवामानासाठी तयार रहा आणि बाहेर पडताना चार थरांचे कपडे घाला, कारण बर्फाळ रस्ते आणि थंड हवा लगेच जाणवते.

लाँगइयरब्येनमध्ये साध्या लंचच्या शोधातही अनपेक्षित आर्क्टिक चव मिळते, जसे थाई सूप आणि फ्राइड राईससारखे पदार्थ.

नॉर्थ अटलांटिक करंटमुळे इथे समुद्र वर्षभर पूर्ण गोठत नाही, त्यामुळे आर्क्टिकमध्ये राहणं शक्य होतं.

स्वालबार्ड ट्रीटीमुळे अनेक देशांतील लोक इथे राहू आणि काम करू शकतात, त्यामुळे छोट्या वस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय संस्कृती दिसते.

ह्युसेटसारख्या ठिकाणी आर्क्टिक घटकांसह क्रिएटिव्ह डायनिंग आणि फुन्केन लॉजमधलं मेणबत्त्यांचं बर्फाळ पर्वत दृश्य असलेलं डिनर अविस्मरणीय ठरतं.

Published in the Sunday Loksatta Lokrang on 26 April 2026

नॉर्थ पोलपासून फक्त १३०० किमीवर असलेलं जगातलं सर्वात उत्तरेकडील शहर!

इथे तुम्ही जन्माला येऊ शकत नाही आणि इथे तुम्ही मरणही पावू शकत नाही. इथे तुरुंग नाही, आणि फक्त डझनभर पोलिस शांतपणे या छोट्याशा गावावर लक्ष ठेवतात. ऐकायला अगदी एखाद्या न सुटणाऱ्या कोड्यासारखं वाटतं, ज्याचं उत्तरच नाही असं. पण हे काही कोडं नव्हतं. माझं फ्लाइट खरंच इथे उतरलं होतं, आणि मी उभी होते पृथ्वीवरील एक विलक्षण, जवळजवळ अविश्वसनीय ठिकाणी -लाँगइयरब्येन.

हे गाव इतकं वेगळं, इतकं स्वप्नवत आहे, की प्रत्येक क्षणी तुम्हाला असं वाटत राहतं - आत्तापर्यंत जगाच्या टोकावरच्या आयुष्याबद्दल आपण जे काही समजत होतो, ते सगळंच इथे येऊन बदलतंय. जणू काही तुम्ही एका नव्या वास्तवात प्रवेश करता, जिथे सगळे नियम थोडेसे वेगळे आहेत.

दुसऱ्या दिवशी, चार थरांचे कपडे घालून मी बाहेर पडले. सगळीकडे पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेले रस्ते, आणि हवेत एक वेगळाच ताजेपणा. मी फक्त लंचच्या शोधात होते. वाटलं होतं काहीतरी साधं, बेसिक मिळेल. पण जे मिळालं, ते पूर्णपणे अनपेक्षित होतं. मी शांतपणे गरमागरम ‌‘टॉम खा सूप‌’ पीत होते आणि भात खात होते - जणू काही चुकून थायलंडमध्ये पोहोचले आहे! पण नाही हे बँकॉकमधलं एखादं कॅफे नव्हतं.

हे होतं लाँगइयरब्येन, ७८.२२ नॉर्थवर, स्वालबार्ड आर्किपेलागोमधल्या स्पिट्‌‍सबर्गेन आयलंडवर वसलेलं एक छोटंसं पण अत्यंत वेगळं जग. नॉर्वेच्या मुख्य भूमी आणि नॉर्थ पोल यांच्या साधारण मधोमध. जगातल्या सर्वात उत्तरेकडील शहरांपैकी एक, जिथे रेग्युलर शेड्युल्ड फ्लाइट्‌‍स येतात. आणि तरीही, इथे उभं राहिल्यावर तुम्हाला जाणवत राहतं की तुम्ही परिचित जगापासून किती दूर आला आहात - जणू सगळ्या ओळखीच्या गोष्टी मागे सोडून, एका अगदी वेगळ्याच टोकावर.

स्वालबार्ड खूप दिवसांपासून माझ्या ‌‘बकेट लिस्ट‌’मध्ये होतं. नॉर्वेमधल्या ट्रॅव्हल एक्झिबिशनची संधी मिळताच मला कळलं - इथवर येऊन थांबायचं नाही, अजून उत्तरेकडे जायलाच हवं. या ‌‘लेजेंडरी फ्रंटियर‌’चा अनुभव घ्यायलाच हवा. मला नेहमी वाटतं, दूरच्या ठिकाणी पोहोचण्याची ओढ ही माणसाच्या स्वभावातच असते. आपल्यात एक एक्सप्लोरर असतो - जिज्ञासू, थोडा बेचैन, आणि पुढे जाणारा. आपण अशा ठिकाणी जातो कारण ती सोपी असतात म्हणून नाही, तर कारण ती आपल्याला जिवंत असल्याची जाणीव करून देतात. लाँगइयरब्येन हे तसंच ठिकाण आहे. इथले अनुभव विसरता येत नाहीत; ते मनात खोलवर राहतात.

स्वालबार्डमधली प्रत्येक गोष्ट एकाच वेळी गूढ आणि रोमांचक वाटली. बर्फाचं जग म्हटलं की ग्रीनलँड आठवतं, पण स्वालबार्ड त्याहूनही उत्तरेला आहे. ओस्लोहून इथे येताना जणू तुम्ही एका वेगळ्याच जगात प्रवेश करता. नकाशावरची अंतरं अचानक खूप खरी वाटायला लागतात. मनात प्रश्न - इथे लोक राहतात कसे? समुद्र तर वर्षभर गोठलेला असेल ना? पण निसर्गाने वेगळंच उत्तर दिलं आहे. ‌‘नॉर्थ अटलांटिक करंट‌’, जो गल्फ स्ट्रीमचा भाग आहे, त्याच्या प्रभावामुळे इथलं पाणी पूर्णपणे गोठत नाही. त्यामुळे हा आर्क्टिक भाग कायम बर्फात अडकून राहत नाही - आणि तेच त्याला अधिक आश्चर्यकारक बनवतं.

राजकीयदृष्ट्याही स्वालबार्ड हे वेगळंच आहे. १९२० च्या ‌‘स्वालबार्ड ट्रीटी‌’अंतर्गत अनेक देशांतील लोक इथे येऊन राहू आणि काम करू शकतात, फक्त त्यांनी स्वतःचा खर्च भागवला पाहिजे. म्हणूनच कदाचित मला आर्क्टिकमध्ये थाई सूप आणि फ्राइड राईस खायला मिळालं. थायलंडमधले अनेक कामगार आणि कुटुंबं इथे स्थायिक झाली असून, ते लाँगइयरब्येनमधल्या प्रमुख समुदायांपैकी एक आहेत. एवढ्या छोट्याशा वस्तीमध्ये जगभरातील संस्कृती पोलर आकाशाखाली शांतपणे एकत्र नांदताना दिसतात, आणि ते पाहताना एक वेगळीच उबदार भावना निर्माण होते.

खाण्याबद्दल बोलायचं तर, इतक्या छोट्या ठिकाणी इतकी ‌‘कलिनरी सोफिस्टिकेशन‌’ मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. पण लाँगइयरब्येनने पुन्हा आश्चर्यचकित केलं. ‌‘ह्युसेट‌’ हे त्याच्या लक्षात राहणाऱ्या ‌‘डायनिंग एक्स्पिरियन्स‌’साठी ओळखलं जातं, जिथे आर्क्टिक चार, रेनडियर, सील, टुंड्रा बेरीज आणि ‌‘प्टार्मिगन‌’सारख्या स्थानिक घटकांचा क्रिएटिव्ह वापर दिसतो. मला तिथे जाता आलं नाही, पण ‌‘फुन्केन लॉज‌’ मधलं डिनर मात्र उबदार, एलिगंट आणि अविस्मरणीय ठरलं, जिथे मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आणि बर्फाच्छादित पर्वतांचं दृश्य एक खास माहोल तयार करत होतं.

स्वालबार्डने स्वतःला मोठ्या प्रमाणात बदलून घेतलं आहे. एकेकाळी कोळसा खाणींसाठी ओळखलं जाणारं हे ठिकाण आज टुरिझम, सायंटिफिक रिसर्च आणि हॉस्पिटॅलिटीवर उभं आहे. लोक इथे ‌‘मिडनाइट सन‌’ आणि ‌‘पोलर नाइट‌’ हे दोन अनोखे अनुभव पाहायला येतात. मी एप्रिलमध्ये आले, या संक्रमणकाळात. नॉर्दर्न लाइट्‌‍स किंवा अखंड दिवस पाहायला मिळाला नाही, पण त्या सिझनचा शेवटचा सनसेट पाहिला. दुसऱ्या दिवसापासून सूर्य मावळणार नव्हता. अंधार हळूहळू प्रकाशाला जागा देतो आहे, असा तो क्षण एखाद्या विधीसारखा वाटत होता.

आर्क्टिकच्या थंडीबद्दल ऐकलं की अनेक जण घाबरतात. पण हवामानाचा अंदाज पाहून घाबरू नका. मी माइनस पंधरा अंशात आरामात फिरले. आकाश इतकं स्वच्छ होतं की सनस्क्रीन लावावं लागलं. सिक्रेट सोपं आहे - लेयर्समध्ये कपडे, सतत हालचाल आणि निसर्गाचा आदर. योग्य तयारी असेल, तर आर्क्टिक त्रासदायक वाटत नाही, उलट शरीर आणि मन दोन्ही ताजं करतं.

आमची वॉकिंग टूर लाँगइयरब्येन चर्चपासून सुरू झाली. काही महिन्यांच्या अंधारानंतर पहिला सूर्यकिरण इथेच दिसतो, साधारण मार्चमध्ये. तेव्हा संपूर्ण गाव एकत्र येतं सूर्याचं स्वागत करायला. आजच्या कृत्रिम प्रकाशाच्या जगात, इथे सूर्यप्रकाश अजूनही एक जपण्यासारखा उत्सव आहे.

यानंतर माझ्या आयुष्यातील एक भन्नाट अनुभव आला - स्नोमोबाइल सफारी. पूर्ण थर्मल गिअर आणि जाड ग्लोव्हज घालून मी तयार झाले, आणि त्या क्षणी स्वतःला टुरिस्टपेक्षा एखाद्या आर्क्टिक कथेतली व्यक्तिरेखा असल्यासारखं वाटत होतं. काही क्षणातच आम्ही अफाट पांढऱ्या विस्तारातून वेगाने धावत होतो. चारही बाजूंनी पसरलेली शांतता इतकी खोल होती, की ते खरं आहे की स्वप्न, असंच वाटत होतं. अचानक गाईडने इशारा केला - समोर बर्फात जवळजवळ मिसळलेला आर्क्टिक फॉक्स क्षणात नजरेआड झाला. थोड्याच वेळात टुंड्रावर शांतपणे चालणारे रेनडियर दिसले. त्या क्षणी स्पष्ट जाणवलं - आपण वेगळ्याच जगात आलो आहोत, जिथे माणूस पाहुणा आणि निसर्ग अधिपती आहे.

हा अनुभव आधीच सिनेमॅटिक वाटत होता, पण इथे ‌‘जेम्स बॉण्ड‌’चा ‌‘डाय अनदर डे‌’ शूट झाला आहे हे कळल्यावर तो भाव अजूनच गडद झाला. या विशाल ग्लेशियर्सचा त्या सीनसाठी वापर झाला होता, आणि त्या अखंड पांढऱ्या विस्तारातून पुढे जाताना ते अगदी सहज पटत होतं - इतकं भव्य दृश्य इथे नैसर्गिकपणेच तयार आहे.

आणखी एक ठिकाण, जे जवळजवळ अवास्तव वाटलं, ते म्हणजे ‌‘स्वालबार्ड ग्लोबल सीड व्हॉल्ट‌’. डोंगराच्या आत बांधलेलं हे केंद्र जगभरातील बियांचं सुरक्षित साठवण करतं. लाखो नमुने सब-झिरो तापमानात जतन केले जातात, जे आपल्या अन्नपुरवठ्याच्या विविधतेचं रक्षण करतात. याला ‌‘डूम्सडे व्हॉल्ट‌’ म्हणतात, पण तिथे उभं राहिल्यावर भीती नाही, उलट भविष्यासाठी काहीतरी जपलं जातंय, अशी आश्वासक भावना निर्माण होते.

आणि मग अनपेक्षितपणे - ब्रुअरी. कारण लाँगइयरब्येनमध्ये जगातली सर्वात उत्तरेकडची ब्रुअरी असणारच. स्वालबार्डमध्येच शक्य आहे की सकाळी तुम्ही अन्नसुरक्षेच्या भविष्यावर विचार करता, आणि दुपारी लोकली ब्रूड बीयरचा आनंद घेत बसता. या विरोधाभासातही एक वेगळीच गंमत आहे.

दुसऱ्या दिवशी मी आर्क्टिक फियोर्ड्सकडे जाणाऱ्या क्रूझमध्ये बसले. आमचं गंतव्य होतं बिललेफियोर्डेन. शांत पाण्यात कोसळणारे ग्लेशियर्स आणि त्या विशाल शुभ्र लँडस्केपमध्ये ब्रशस्ट्रोकसारखी दिसणारी वन्यजीवांची हालचाल - सगळंच अविश्वसनीय वाटत होतं. स्वालबार्डमध्ये सुमारे 3000 पोलर बेअर्स आहेत, कधी कधी ते माणसांइतकेच असतात. मला त्या दिवशी ते दिसले नाहीत, पण बर्फावर विसावलेले वॉलरस, आकाशात फिरणारे सीबर्ड्स आणि एका आई वॉलरसला तिच्या पिलाला अलगद ढकलताना पाहिलं. त्या दृश्यातली कोमलता या कठोर प्रदेशातही खरी वाटत होती.

एका ठिकाणी जहाज हळूहळू बर्फातून पुढे सरकलं आणि आम्हाला गोठलेल्या पृष्ठभागावर उतरायची संधी मिळाली. चारही बाजूंना अंतहीन बर्फ आणि गडद शांतता. त्या क्षणी मला इतिहासातील एक्सप्लोरर्सची आठवण झाली, ज्यांनी धाडसाने या निर्जन प्रदेशात पाऊल ठेवलं. माझ्या प्रवासात मी कधीच इतकी त्यांच्या जवळ असल्यासारखी भावना अनुभवली नव्हती.

हॉटेलमध्ये परतल्यावरही ते विचार मनात होते. गरम हॉट टबमध्ये बसून दूरवर चमकणारे बर्फाच्छादित पर्वत पाहताना विरोधाभास जाणवत होता. त्यांनी जिथे कष्ट सहन केले, तिथे मी आराम आणि मॉडर्न लक्झरी अनुभवत होते. त्यांच्या जिद्दीबद्दल आदर आणि स्वतःच्या अनुभवाबद्दल कृतज्ञता दोन्ही मनात उमटत होते.

लाँगइयरब्येन हे कम्युनिटी स्पिरिटचं सुंदर उदाहरण आहे. वेगवेगळ्या देशांतील लोक एकाच दरीत एकत्र राहतात, जणू छोटंसं जगच. मला भेटलेली ब्राझिलियन आई, तिचं बर्फात खेळणारं मूल, आणि इथल्या गोष्टी - हरवलेलं वॉलेट परत मिळणं, दारं लॉक न करणं, सगळे एकमेकांना नावानं ओळखणं - हे सगळं खूप वेगळं वाटलं. मोठ्या शहरांमध्ये जिथे आपलेपण शोधावं लागतं, तिथे इथे ते सहज तयार झालेलं दिसतं.

या गावातील काही गोष्टी ऐकायला अविश्वसनीय वाटतात, जोपर्यंत त्यामागचं कारण समजत नाही. इथे जन्माला येता येत नाही, कारण मेडिकल सुविधा मर्यादित असल्यामुळे गरोदर महिलांना प्रसूतीसाठी मुख्य नॉर्वेला जावं लागतं. आणि इथे मरणही पावता येत नाही असं म्हणतात. प्रत्यक्षात मृत्यू होतो, पण अंत्यसंस्कारांवर निर्बंध आहेत, कारण जमीन कायम गोठलेली आहे. ‌‘परमाफ्रॉस्ट‌’मुळे मृतदेह विघटित होत नाहीत, त्यामुळे कबरींचं व्यवस्थापन कठीण होतं. म्हणून गंभीर रुग्णांना मुख्य भूमीवर हलवलं जातं. इथे मृत्यूच्याही नियमांना निसर्गाने वेगळं वळण दिलं आहे.

स्वालबार्डने शेवटपर्यंत मला आश्चर्यचकित केलं. इतक्या दुर्गम ठिकाणी कॅश लागेल असं वाटलं होतं, पण सगळं कार्डवर चालत होतं. ग्लेशियर्स आणि पोलर विल्डरनेसच्या मध्ये उभं राहून मी क्रेडिट कार्ड टॅप करत होते, अगदी एखाद्या ग्लोबल शहरासारखं. तेव्हा जाणवलं - हे ठिकाण जगाच्या टोकावर असलं, तरी अनेक बाबतीत शांतपणे पुढे आहे.

शेवटच्या संध्याकाळी मी त्या सिझनचा शेवटचा सनसेट पाहिला. बर्फाच्छादित पर्वतांवर सोनेरी आणि जांभळ्या छटा पसरल्या होत्या. आकाश मध्यरात्रीनंतरही उजळलेलं, आणि सूर्य क्षणभरासाठी मावळून पुन्हा उगवण्यासाठी तयार. त्या शांत क्षणी उभं राहून मला जाणवलं - मी किती लहान आहे, आणि तरीही किती जिवंत.

स्वालबार्डने खरंच मन जिंकलं. आर्क्टिक आकाशाखाली मिळणारं थाई सूप, भविष्यासाठी जपलेली बियाणं, बर्फात अदृश्य होणारे फॉक्स आणि मावळायला विसरणारा सूर्य - हे सगळं मिळून हे ठिकाण विलक्षण बनवतं. आपल्या पृथ्वीचं सौंदर्य अजूनही किती अफाट आहे, याची आठवण करून देणारं हेच ठिकाण.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
राजस्थान
9 mins, read

राजस्थान

Published in Sakal Saptarang 2nd August 2026 द कॅमल फेअर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या सुमारास राजस्थानातील शांत, निवांत पुष्कर हे छोटंसं वाळवंटी शहर एका आठवड्यासाठी अक्षरशः बदलून जातं. भारतातील

भारताची सुरावट
9 mins, read

भारताची सुरावट

Published in Maharashtra Times 02nd August 2026 ...एकमेकांशी संभाषण करीत असल्यासारखे थोड्या थोड्या वेळाने हॉर्न्स वाजत असतात, रस्त्यावरचे विक्रेते ‌‘वडा पाव‌’ किंवा ‌‘कटिंग चाय‌’च्या आरोळ्या ठोकत अ

इब्न बतूताच्या देशात!
9 mins, read

इब्न बतूताच्या देशात!

Published on Loksatta Lokrang Date 02nd August 2026. ...ते झाकण उचलताच सुगंधाची एक उबदार लाट हवेत पसरली.  लोणच्यातील लिंबू, ऑलिव्ह्ज आणि केशर यांच्या साथीने मंद आचेवर  शिजवलेलं चिकन इतकं मऊ, 

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!