IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

झाले मोकळे आकाश...

20 mins. read

Published in the Sunday Sakal on 21 April, 2024

नर्सरी शाळा कॉलेज ह्या सगळ्यातून शिकत असताना, मोठे होत असताना अनेक गोष्टी, सुविचार, सुभाषितं, बोधकथा आपल्या मनावर कोरल्या जातात आणि बऱ्याचदा आपल्या आयुष्यावर त्यांचा अंमल सुरू राहतो. शाळेत फळ्यावर रोज नव्याने लिहिल्या जाणाऱ्या सुविचाराकडे आपले डोळे वळायचेच. सुविचाराची पुस्तकं किंवा छोटी टेबल कॅलेंडर्स जमवायचा छंद आपणा अनेकांना जडला असेल तो ही त्याच वयात. अनेक शाळा वा चर्चेसच्या बाहेर बोर्डवर सुविचार लिहिलेले असायचे. आजही माहीम चर्च, बांद्रा बँडस्टँड चर्च, पोर्तुगिज चर्च इथून जात असताना डोळे त्या बोर्डकडे वळतात. काय लिहिलंय बरं आज, हे वाचणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं हे वर्षानुवर्ष तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे. कधीतरी पूर्वी ॅव्हल अँड टूरिझमचा कोर्स करीत असताना तेथील प्रोफेसरनी सांगितलं होतं, ‘दिवसाला एक जरी चांगला विचार आपल्याला मिळला किंवा आत्मसात करता आला तर तो करायचा. विचारांचं धन जमवा, आचार बदलतील, सवयी बदलतील, तुमच्या स्वत:मध्येच चांगल्याची शर्यत लागेल आणि तुम्हाला आयुष्य अगदी रसरसून जगता येईल‘. त्यांचं हे वाक्य लक्षात राहिलं. अर्थात आपल्या आजी-आजोबा, आई-वडील, शिक्षक, कवी, लेखक, वक्ते, मोठी व्यक्तिमत्व ह्यांनी कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्या मनावर उत्तमोत्तम विचारांचं अत्तर शिंपडलंय आणि ज्याने आपलं आयुष्य सुकर झालंय.

जसजसं जग जवळ आलं तसतसं वेगवेगळे धर्म-पंथ विचारांनीही आपल्या वैचारिक बँकेत भर टाकली. मग काही नवीन विचारधारा आधीच्या विचारांवर आक्षेप घ्यायला लागल्या आणि ते ही बरोबरच होतं कारण काळ बदलतो, संदर्भ बदलतात, आपल्यामध्ये बदल घडवणं, जुने आऊटडेटेड विचार बदलणं ही गरज बनून जाते. उद्योगधंद्यांमध्ये तर हे वास्तव जो स्विकारणार नाही तो संपला अशी स्थिती आहे. जुन्या विचारधारांना शह देणारी अनेक माणसं होती, आहेत आणि ह्यापुढेही असतील, कारण आजचा नवीन विचार उद्या जुना होणार आहे. उद्याची परिस्थिती आजच्यापेक्षा वेगळी असणार आहे. गतानुगतिके चालत आलेल्या गोष्टी सगळ्याच जशाच्या तशा स्विकारायची गरज नाही किंवा कधी आपण त्याला प्रतिप्रश्‍न करू शकतो हे मनावर बिंबलं डॉ. व्ही. बी. आठवले ह्यांच्याकडून. नीलचे ते डॉक्टर. सायनचं त्यांचं क्लिनिक नवजात बालकांपासून शाळकरी मुलांसाठी होतं. एवढे बिझी असायचे डॉक्टर तरी तिथे आलेल्या पालकांना मुलांचं शरिरशास्त्र, मानसशास्त्र, आरोग्य समजावून सांगायचे. काय करायचं आणि काय करायचं नाही हे अगदी पोटतिडकीने समजावून सांगायचे. भूक लागल्यावर मुल रडतं तेव्हा खायला द्या. उगाच बळेबळे त्यांच्या तोंडात अन्न कोफ्लबू नका. मुलांची झोप पूर्ण होऊ द्या. अशा अनेक गोष्टी आम्हाला पूर्ण पटवून दिल्यावर ते म्हणाले, ‘मुलांना चिऊ काऊची गोष्ट अजिबात सांगू नका.‘ आमचे डोळे मोठे झाले. ‘अहो, ही गोष्ट ऐकत तर किती पिढ्या वाढल्या‘. ते म्हणाले, ‘कावळा पावसात भिजलाय, थंडीने कुडकुडतोय, दार वाजवतोय, त्याला आत घेऊन त्याला त्या परिस्थितीतून वाचवणं हे सोडून चिऊताई म्हणते, ‘थांब मी माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब मी माझ्या बाळाला पावडर लावते, थांब मी माझ्या बाळाला तीट लावते...‘ डॉक्टरांचं बोलणं संपलं आणि मी आणि सुधीरने एकमेकांकडे पाहयलं. अरे खरंच की, ‘त्या गरजवंताला मदत न करता आपण आपल्या चैनीत रहायचं‘ हे थोडक्यात आपण आपल्या मुलांना शिकवतोय. डॉक्टरांनी नुसता विचारच दिला नव्हता तर एक वेगळा दृष्टीकोन दिला होता ज्याचा उपयोग पुढच्या आयुष्यात खूप झाला.

कॉर्पोरेट मॅनेजमेंट थिअरीज्‌‍मध्ये तर एक काळ असा आला की पुराणातल्या अनेक कथा नव्या बदलेल्या स्वरूपात आपल्यासमोर यायला लागल्या. अगदी सोपी गोष्ट म्हणजे ससा कासवाची किंवा माकड आणि टोपीवाल्याची. ससा कासव एकमेकांशी कॉम्पीटिशन करण्यापेक्षा नदी अोलांडताना कासवाने सशाला पाठीवर घेतलं तर रस्त्यावर पळताना सशाने कासवाला पाठीवर घेऊन कोऑपरेशनने इच्छित स्थळी पोहचण्यांचं लक्ष्य हासिल केलं. माकडांनी टोप्या चोरून झाडावर जाऊन बसल्यावर टोपीवाल्याने टोपी फेकली ह्या उद्देशाने की आता माकडही टोप्या फेकतील, पण माकडं म्हणाली, ‘ही तुझी युक्ती चालणार नाही रे बाबा, तुला जसं तुझ्या पुर्वजांनी सांगितलंय तसंच आम्हालाही पुर्वज होते. आम्ही टोप्या परत देणार नाही. आता बदला स्वत:ला, नव्या युक्त्या शोधा.‘ कधी टाइमपास करायचा असेल तर यू टयूबवर जाऊन ह्या कथा जरूर ऐका. वेळेचा मस्त सदुपयोग.

उद्योग जगतात अशीच एक थिअरी सांगितली जाते, म्हणजे फक्त उद्योगात नाही तर आपल्या घरात समाजातही आपण अनेकदा ती आचरणातही आणत असतो. ‘प्रशंसा खुलेआम करा आणि शिक्षा किंवा काही चुकलं बिकलं तर एकांतात सांगा‘ एकदम बरोबर. आणि चांगले लीडर्स हेच करीत आलेयत आजतागायत. पण आता अमेरिकेत आणि इतरही देशात एक नवीन विचारप्रवाह जोर धरतोय तो म्हणजे, ‘तुमच्या ऑर्गनायझेशनमधलं वातावरण एवढं मोकळं असू द्या की प्रशंसा असो किंवा एखादी चूक किंवा खटकणारी गोष्ट खुलेआम सांगता आली पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजेे. ज्याच्या बाबतीत ती गोष्ट असते त्याने ती शेअर केली पाहिजे किंवा दुसऱ्याने कुणीतरी ती खुलेआम सांगितली पाहिजेे. मग एखादा एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट सिईअो ला खुलेआम किंवा ई मेलवर स्वत:च्या नावासह  फीडबॅक देऊ शकतो आणि तो सिईअो सुद्धा तेवढ्याच खुलेपणाने तो फीडबॅक इतरांशी शेअर करतो. त्या फीडबॅकनंतर काही चुका जर सुधारल्या असतील तर त्याही सर्वांसमोर चर्चिल्या जातात. आता हे जसं लिहिलंय तेवढं सोप्पं नाहीये. एका वर्षात होण्यासारखी ही गोष्ट नाहीये. कोणत्याही ऑर्गनायझेशनमधलं वातावरण हा अनेक वर्षांचा रीझल्ट असतो. टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप टीम्स एकमेकांशी कशा वागतात ह्यावर बरंच अवलंबून असतं. एकतर आपण भारतीय आहोत, एकदम इमोशनल. सवय नसेल तर असा डायरेक्ट म्हणजे तोफ्लडावर फीडबॅकने हानीच जास्त व्हायची. ‘तू कोण मला सांगणार?‘ म्हणजे मोकळं वातावारण करायला जायचं आणि सगळंच उलटंपालटं व्हायचं, होतं तेच बरं होतं असं म्हणण्याची वेळ.

आम्ही सध्या ‘अोपन हाऊस‘, ‘वन टू वन‘, ‘फोन उचला आणि बोला‘ अशा अनेक गोष्टींद्वारे माणसामाणसातली दरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. अशाच एक दोन मिटिंग्जमध्ये फीडबॅक मिळाला की ‘कुणाला जर कधी काही दिवस घरी बसवलं तर त्यामागचं कारण इतरांना कळलं पाहिजेे, नाहीतर उगाचच प्रत्येक जण आपापले तर्क बांधत राहतो.‘ फेअर इनफ. ‘सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते‘ ह्याप्रमाणे जर चूक निस्तरण्यासारखी असेल तर एक चान्स दिला जातो आणि तो द्यावा. पण अशा वेळी त्या मागचं कारण सांगितलं तर थोडंसं ह्युमिलिएशन होऊ शकतं, त्यामुळे आम्ही ते सर्वांना कळवणं अव्हॉइड करतो. त्यालाच विचारलं की, ‘तुला हे आम्ही करतो ते बरोबर वाटतं का?‘ तर म्हणाला, ‘हो, बरोबर आहे. असं ह्युमिलिएशन होऊ शकतं.‘ हा पॉर्इंट पटकन माझ्या लक्षात नाही आला. दुसरा फीडबॅक होता तो म्हणजे, ‘आपण खूप अोपनली एखाद्याची चूक अोपन करतो. थोडं सांभाळून घ्यायला हवं. कुणी मुद्दाम चूका करीत नाही.‘ हा फीडबॅकसुद्धा अगदी बरोबर होता. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात तसा प्रकार. आणि इथेच थोडंसं गोफ्लधळायला होतं आपणा सर्वांनाच. मला पुर्वी वाचलेला एक संदर्भ आठवला. ‘आदर्श घर कसं अोळखावं‘ त्याचं एक परीमाण त्यांनी दिलं होतं. जर एखाद्याच्या नावाने पोस्टाद्वारे एक सील्ड एनव्हलप आलं, घरातल्यांनी ते न उघडता डायनिंग टेबलवर ठेवलं, संध्याकाळी ती व्यक्ती आल्यावर तिने ते पाकीट उघडलं, वाचलं आणि उघडं करून इतरांना वाचायला ठेवलं तर ते घर मोकळेपणाच्या प्रकाशात, विश्वासाच्या छायेत खेळतंय असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच्या जमान्यात मोबाईलच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की, ज्या घरात एममेकांचे मोबाईल लॉकचे पासवर्ड सर्वांना माहीत असतात ते घर आदर्श. हीच गोष्ट ऑर्गनायझेशन्सची. एकमेकांवर एवढा विश्वास आपण टाकू शकत असू तर ती ऑर्गनायझेशन अोपन ऑर्गनायझेशन आहे असं शिक्कामोर्तब करायला हरकत नाही.

वरचे दोनही फीडबॅक्स आपापल्या ठिकाणी बरोबर होते. पण ऑर्गनायझेशनमध्ये होणारी प्रत्येक चूक ही सुवर्णसंधी असते असं मी मानते. आणि म्हणूनच ती ब्रॉडकास्ट करणंही मी महत्वाचं समजते. म्हणजे माझा प्रश्‍न असतोच मॅनेजर्सना, ‘डीड यु ब्रॉडकास्ट धिस?‘. काही ठिकाणी चूक करणारा सर्वांना माहीत असतो किंवा पटकन शोधता येतो तर काही ठिकाणी ते कळू शकत नाही, पण ते महत्वाचं नाही. काय चूक झाली? ती कशा तऱ्हेने पटकन सुधारली? पुढे आपण सर्वांनीच काय प्रीकॉशन्स घ्यायची जेणेकरून ती चूक पुन्हा होणार नाही? हे सर्वांना एका फटक्यात कळतं ह्या ब्रॉडकास्टिंगमध्ये. उदाहरणादाखल जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती सर्वांना समजायला सोपी जाते. ती चूक पुन्हा होण्याचे चान्सेस संपतात. ह्याउलट जर चूका लपवल्या गेल्या तर त्यात ऑर्गनायझेशन खूप मोठं नुकसान करून घेत असते. कारण पुन्हा पुन्हा कुणीतरी त्या चूका करीत राहतं. आणि चूक ही अशी गोष्ट आहे की पहिल्यांदा झाली तर क्षम्य पण पुन्हा झाली तर ती खरी चूक आणि मग मात्र ती अक्षम्य.

वीणा वर्ल्ड मध्ये तसं म्हटलं तर मोकळं वातावरण आहे. फीडबॅक म्हणा, असं ‘चूक‘ ह्या बाबतीत अोपन डिस्कशन म्हणा, मॅनेजमेंटलाही खुलेआम तुमचं हे चुकलं हे सांगण्याची मानसिकता अगदी नवीन टीम मेंबरमध्ये असणं हे ऑर्गनायझेशनच्या कल्चरचा भाग बनत चाललंय. प्रवास सुरू आहे, लांबचा आहे पण ‘वुई आर ऑन द राइट ॅक‘चं समाधान जरूर आहे.


अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

दोन खंडांच्या बॉर्डर्स जिथे एकत्र मिळतात त्यावर वसलेला आणि त्या दोन्ही खंडांची सांस्कृतिक भौगोलिक वैशिष्टय मिरवणारा देश म्हणजे टर्की. पुरातनकाळापासून आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या या देशानं जगाच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. टर्कीमधल्या ओटोमन साम्राज्यामुळेच युरोपमधून आशियाकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याची स्पर्धा सुरू झाली आणि आफ्रिकेला वळसा घालून युरोपीय सत्तांची जहाजं आशियाकडे जाऊ लागली. टर्कीनेच युरोपला कॉफी आणि ट्युलिपची भेट दिली असं मानलं जातं. आजही टर्कीमधलं ‘ग्रँड बझार’ हे जगातलं सर्वात पुरातन आणि सर्वात मोठं 4000 दुकानाचं मार्केट पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. प्राचीन टर्कीचं वैशिष्ट्य म्हणजे ‘टर्किश हमाम’. या सार्वजनिक स्नानगृहांना टर्कीच्या सामाजिक जीवनात महत्वाचं स्थान होतं.

टर्कीच्या इतिहासाप्रमाणेच इथला भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या देशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांपैकी सर्वात आगळं वेगळं स्थान म्हणजे ‘पामुकाले’. हा भौगोलिक चमत्कार साउथ वेस्ट टर्कीमध्ये डेनिझ्ली प्रांतात आहे. मेन्डेरेस नदीच्या खोऱ्यात विशिष्ट भौगोलिक जडणघडणीमुळे हे निसर्गशिल्प आकाराला आलं आहे. जमिनीतून उफाळून बाहेर येणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांमधील कार्बोनेट मिनरल्समुळे पामुकालेची रचना तयार झाली आहे. या भागात एकूण 17 गरम पाण्याचे झरे आहेत. या झऱ्यांमधील पाण्याचं तापमान 36 अंश सेल्सियस ते 100 अंश सेल्सियस इतकं असतं. झऱ्यातून जमिनीबाहेर येणारं पाणी सुमारे हजार फूटाचे अंतर कापून टेकडीच्या माथ्यावर येतं. पुढच्या दोनशे ते अडिशचे फुटांच्या भागात ते खाली वाहू लागतं आणि तिथे ही रचना तयार होते. डोंगर उतारावरून हे गरम झऱ्यांचं पाणी शतकानुशतकं वाहत आलं आहे, त्यामुळे त्या पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटचे थर साचून त्यांना महाकाय शिंपल्यांसारखा आकार मिळाला आहे. डोंगराच्या उतारावर या भव्य शिंपल्यांच्या जणू पायऱ्याच तयार झाल्या आहेत. या पायरी पायरीवर बनलेल्या शिंपल्यांमधून झऱ्याचे पाणी ओसंडून पुढे वाहत जातं आणि त्याचा अनोखा धबधबा तयार होतो. तुर्की भाषेत पामुकाले या शब्दाचा अर्थ होतो ‘कॉटन कॅसल’ म्हणजे कापसाचा किल्ला. दूरवरून बघताना खरोखरच कापसापासून हे शिंपले तयार झाले असावेत असा भास निर्माण होतो. वाहणाऱ्या पाण्यामध्ये सल्फर आणि आयर्न ऑक्साइडचा अंश असल्याने या पांढऱ्याशुभ्र शिंपल्यांवर कुठे कुठे पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या रेषा उमटल्या आहेत. 1988 मध्ये हा सगळा परिसर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समाविष्ट करण्यात आला आणि या नैसर्गिक शिल्पांना संरक्षण मिळालं.

या भागात इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात हिरापोलिस नावाचे शहर वसवण्यात आलं होतं. इथल्या गरम पाण्यातील औषधी घटकांमुळे त्या काळात लोक इथे उपचारासाठी यायचे. या परिसराच्या प्राचीन इतिहासाचं दर्शन घडवणारं एक म्युझियम इथं उभारण्यात आलं आहे. मग अशा आगळ्यावेगळ्या निसर्ग शिल्पाचं दर्शन घ्यायला चला वीणा वर्ल्डसोबत टर्कीच्या टूरला. हायलाईट्स ऑफ टर्की, बेस्ट ऑफ टर्की, ऑल ऑफ टर्की वा ग्रीस टर्की ह्या ऑप्शन्समधून तुमची टूर निवडा.­­


6 वर्षांत 55 देश

माझ्या स्वतःच्या जग पर्यटनाकडे मी बघतो तेव्हा मला नेहमी ‘आनंद‘ सिनेमातला डायलॉग आठवतो, ‘बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं!’. माझ्या जगभ्रमंतीबद्दल असंच म्हणता येईल की मी जरी फक्त गेली सहा वर्षच जगप्रवास करत असलो तरी या सहा वर्षांमध्ये मी तब्बल 55 देश बघितले आहेत आणि हे मी

साध्य करू शकलो वीणा वर्ल्डमुळे. कोविडची दोन वर्ष जर आली नसती तर कदाचित माझे आणखी दहा देश नक्की बघून झाले असते. वीणा वर्ल्डबरोबर माझं नातं जुळलं ते आठ वर्षांपूर्वी. मला स्वतःला पर्यटनासाठी डेस्टिनेशन निवडताना तिथे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मॉन्युमेंट्स किंवा मानवनिर्मित आकर्षणं काय आहेत यावर निर्णय़ घ्यायला आवडतं. म्हणजे लहानपणापासून ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’बद्दल वाचून, ऐकून ती बघायची उत्सुकता माझ्यात निर्माण झाली आणि म्हणून मी चायनाची टूर वीणा वर्ल्डकडे बूक केली. या पहिल्याच टूरमध्ये मी वीणा वर्ल्डच्या परिवारात जणू काही कायमाचाच सामिल झालो. वीणा वर्ल्डच्या माटुंगा ब्रँचमध्ये मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा तिथल्या टिमचं आपुलकीचं वागणं मला जणू मी माझ्या दुसऱ्या घरी आलोय असं समाधान देतं आणि ह्या आपुलकीचं एक्सटेंन्शन मग टूरवरही अनुभवायला मिळतं. वीणा वर्ल्डचे अनुभवी, प्रशिक्षित टूर मॅनेजर्स सहलीवर आलेल्या आम्हा सगळ्यांची अशी काळजी घेतात की जणू आम्ही त्यांचे कुटुंबियच आहोत, मग तो रोजचा सहल कार्यक्रम असो किंवा शॉपिंगसाठी मार्गदर्शन असो. मला सर्वात जास्त काय आवडतं तर वीणा वर्ल्डच्या टूर्स या ऑल इन्क्लुसिव्ह असतात. त्यामुळे सहलीवर फक्त शॉपिंगपुरते पैसे नेले तरी चालतं.

मी जेव्हा सहा वर्षांपूर्वी फिरायला सुरुवात केली तेव्हा मी जगभरातली सेव्हन वंडर्स, नैसर्गिक चमत्कार आणि युरोपमधील सर्वोत्तम ठिकाणांची निवड करायचो. आता मी ऑफ बीट डेस्टिनेशन्सची निवड करतो. मी ज्या ज्या ठिकाणाला भेट देतो तिथून काहीतरी सोव्हिनिअर, फ्रीज मॅगनेट, कॉइन किंवा टि शर्ट असं हमखास घेऊन येतो, त्यामुळे त्या सहलीची आठवण माझ्याकडे कायम राहते. आज वयाच्या 72 व्या वर्षीही मी भरपूर प्रवास करतो कारण पर्यटनाची मला आवडच आहे. जेव्हा आपण आपला नेहमीचा प्रदेश सोडून दुसऱ्या देशात जातो तेव्हा वेगवेगळ्या लोकांची भेट होते, नवीन संस्कृतीचं दर्शन घडतं, नवीन काही शिकायला मिळतं. त्यात जेव्हा वीणा वर्ल्डसारख्या संस्थेबरोबर तुम्ही पर्यटन करता तेव्हा  पर्यटनाचा आनंद तुम्ही मोकळेपणानं घेऊ शकता. जसं आम्हाला एका पाठून एक देश पादाक्रांत करायची इच्छा आहे तशीच वीणा वर्ल्ड त्यांच्या टूर लिस्ट मध्ये दर महिन्याला नवनवीन प्रदेशांची आणि देशांची भर घालीत असते. त्यांचं नवीन ॅव्हल प्लॅनर माझ्यातला उत्साह जागवतं आणि मी नव्याने प्लानिंग करायला बसतो. आता मला वेध लागले आहेत ते वीणा वर्ल्ड सोबत साउथ कोरिया बघायचे.

श्री. गणेश कामत, माटुंगा-मुंबई


काय बाई खाऊ कसं गं खाऊ!

संहारक युध्दाचा रक्तरंजित इतिहास मागे टाकून एक विकसनशील राष्ट्र म्हणून आपली नवी ओळख निर्माण करणारा देश म्हणजे व्हिएतनाम. व्हिएतनाम हा देश ‘सिनोस्फिअर’ म्हणजे चायनाच्या सांस्कृतिक प्रभावाखाली येणाऱ्या देशांपैकी एक आहे. इथेही रोजच्या जेवणात ‘चॉपस्टिक्स’ वापरतात. कँटोनिज आणि फ्रेंच पाककलेचा प्रभाव इथल्या पदार्थांवर आहे. लेमनग्रास, पुदिना, व्हिएतनामीज्‌‍ कोरिएंडर अशा सुगंधी, फ्लेवर देणाऱ्या वनस्पतींचा वापर इथल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. व्हिएतनामची आइस्ड कॉफी जगप्रसिध्द आहे. या देशात 1857 मध्ये फ्रेंच राजवटीत कॉफीचे रोप पहिल्यांदा आणले आणि वाढवले गेले. त्याकाळात व्हिएतनाममध्ये पशुपालन मोठ्या प्रमाणावर होत नव्हते, त्यामुळे ताज्या दुधाचा तुटवडा असायचा. मग फ्रेंचांनी कंडेस्ड मिल्क वापरून कॉफी बनवायला सुरुवात केली आणि आजही व्हिएतनामी कॉफी कंडेन्स्ड मिल्क वापरूनच केली जाते. या देशातील आर्थिक सुधारणांच्या काळात कॉफी लागवडीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि आता हा देश कॉफी एक्सपोर्ट करतो. जगभरात कॉफी उत्पादनात व्हिएतनाम दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्हिएतनामी कॉफी नेहमी एका खास पध्दतीच्या ग्लासात दिली जाते. या काचेच्या ग्लासावर एक  स्टिल किंवा अल्युमिनियमचा फिल्टर लावलेला असतो, ज्याला ‘फिन’ म्हणतात. व्हिएतनामी कॉफी करताना या फिल्टरमधे कॉफी पावडर टाकतात, मग ती थोडी प्रेस करतात आणि ओली करायला थोडं गरम पाणी घालतात. काही सेकंदांनंतर फिल्टर गरम पाण्याने संपूर्ण भरतात, मग त्यातून हळू हळू कॉफी खालच्या ग्लासात पडते, या ग्लासात आधीच कंडेन्स्ड मिल्क घातलेलं असतं. सगळी कॉफी खाली गाळली गेली की मग ग्लासातील मिश्रण ढवळायचं. गोड कन्डेन्स्ड मिल्क आणि कडवट कॉफी याची संमिश्र चव तुम्हाला एकदम रीफ्रेश करते. बहुतेकवेळा ग्लासात आधी बर्फाचे क्युब्स घातले जातात आणि कोल्ड कॉफीचा आस्वाद घेतला जातो. मग वीणा वर्ल्डच्या बेस्ट ऑफ व्हिएतनाम, ऑल ऑफ व्हिएतनाम, व्हिएतनाम कंबोडिया सहलीवर असताना अशी खास व्हिएतनामी कॉफी प्यायचा अनुभव नक्की घ्या. देश विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.


समथिंग न्यू...

प्रत्येक माणसाला, आपणा सर्वांनाच नाविन्याची अोढ असते. क्षेत्र कोणतंही असो, माणूस सतत नवीन काहीतरी करीतच असतो, आणि तोच तर असतो आपल्या उर्जेचा स्त्रोत.  आम्हाला तर पाच सहा महिन्यात नवीन काही केलं नाही तर बैचेनी येते. आमचे पर्यटकसुध्दा तसेच, त्यांचा सतत आग्रह असतो, ‘व्हॉट्‌‍स नेक्स्ट? कुठेतरी नवीन ठिकाणी घेऊन चला‘. आपल्या भारतातली राहिलेली राज्य बघायची आहेत आणि जगातले अनेक देश. आम्हालाही अजून बरंच काही बघायचंय. त्यामुळे गेल्या आठवड्यातच आमच्या प्रॉडक्ट, मार्केटिंग आणि एअर टीमने मिळून जाहीर केल्या सहा नवीन टूर्स, ऑगस्ट ते फेब्रुवारी या दरम्यान. बऱ्यापैकी न झालेले देश ह्यामध्ये आहेत. मी आणि सुधीरनेसुद्धा या सहा टूर्समध्ये पर्यटक म्हणून नाव नोफ्लदवलं आहे, बघूया तर कशी आहे वीणा वर्ल्डची सर्व्हिस. सो ह्या टूर्समध्ये जगाच्या उत्तर टोकावरचं ग्रीनलँड आइसलँड आपण क्रुझसह करणार आहोत. गेली अनेक वर्षे फिलीपिन्स हा देश आमच्याकडून थोडा साइडलाच पडला म्हणायचा, तो बघून घ्यायचाय. आजपर्यंत बँकॉक पट्टाया आम्ही अक्षरक्ष: हजारो पर्यटकांना दाखवलं पण थायलंडमधलं चिंआंग माय चिंआंग राय फुकेत क्राबी बऱ्याच जणांचं नाही झालंय ती थोडी आगळीवेळी टूर घेतलीय. गेली अनेक वर्ष आम्ही पर्यटकांना जपानला घेऊन जातोय पण त्याच्या शेजारचे कोरिया आणि तैवान बघायचे राहिलेत खूप जणांचे आणि तुमचा विश्‍वास बसणार नाही पण आमचेही राहिलेत. पर्यटकांच्या साथीने आणि वीणा वर्ल्ड टूर मॅनेजरच्या दिमतीत आयोजिलेल्या ह्या टूरवर व्हर्च्युअली आम्ही आत्ताच पोहोचलोय कोरिया तैवानला. तसंच राहून गेलंय ते टांझानिया आणि झांझिबार, ते ही खुणावतंय. युरोप तसं कॉन्टिनेंट छोटं पण एकसे एक अतिसुंदर देशांनी नटलेलं. त्यातील दक्षिणेकडच्या ट्युनिशिया माल्टा ह्या दोन देशांसोबत साऊथ इटलीचं सिसिली घेतलंय. आहे की नाही मस्त कॉम्बिनेशन. ह्यासोबत भारतात कुठे जायचं तर पहिल्यांदा खुणावलं ते काश्‍मीरने, आणि का नाही, आपल्या भारताच्या माथ्यापासूनच सुरुवात करूया. थोडीशी वेगळी आयटेनरी करतोय आम्ही, ती आहे सातवी टूर, होईल लवकरच जाहीर. सो मंडळी चलो, आम्हीही चाललोय... तुम्हीही चला!


युरोप बाय रोड

तुमचा हॉलिडे अधिक रंगतदार करायचा मस्त मार्ग म्हणजे एखाद्या डेस्टिनेशनची रोड ट्रीप करायची. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रदेशात रस्त्यावरून प्रवास करता तेव्हा खऱ्या अर्थाने तिथला निसर्ग, लोकजीवन, खाद्यपरंपरा, आणि ऑफ बीट ठिकाणं यांचा आनंद घेता. याचा सर्वात झकास अनुभव तुम्ही घेऊ शकता युरोपसारख्या बहुपैलू, अनेक आकर्षणांनी भरलेल्या डेस्टिनेशन्सवर. इटलीमधल्या कोस्टल रोड्‌‍सपासून ते स्कॉटलंडमधल्या हायलँड्‌‍स पर्यंत युरोप युकेच्या वैविध्यपूर्ण भूगोलाचा आणि त्यात मिसळलेल्या इतिहासाचा अनुभव  ‘युरोप बाय रोड‘ मध्ये नक्की घेता येईल.  ‘युरोप बाय रोड‘ हा अनुभव घेण्याचा एक झकास रूट म्हणजे इटलीमधील अमाल्फी कोस्ट. दक्षिण इटलीतील किनारपट्टीलगतचा हा रस्ता इथल्या मनमोहक निसर्गदृश्‍यांसाठी जगभरात प्रसिध्द आहे. एकिकडे रांगड्या डोंगराची रांग आणि तिच्या पायाशी फेसाळणारा सागर यामुळे या रस्त्यावरचा प्रवास रंगतदार होतो. अमाल्फी हे इथलं सर्वात मोठं आणि ऐतिहासिक शहर. या रस्त्यावर रव्हेल्लो सारखं रोमन साम्राज्याच्या खाणाखुणा जपणारं लहानसं गाव आहे. विला रुफोलोम, विला सिम्ब्रोने, ला रोन्देनैया सारख्या लक्षणीय व्हिलांमुळे या गावाला भेट देणारे पर्यटक त्याच्या प्रेमातच पडतात. अमाल्फी कोस्टचा समावेश 1997 मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत झालेला आहे.  फ्रान्सच्या साउथ ईस्टर्न भागातील प्रोवान्स या प्रांतातला ‘लॅव्हेंडर रूट’ हा सुगंधी रस्ता म्हणूनच प्रसिध्द आहे. जून ते ऑगस्ट या काळात या रस्त्याच्या कडेला असलेल्या कुरणांमध्ये लॅव्हेंडरची जांभळी आणि सुवासिक फुलं मोठ्या प्रमाणावर फुलतात, जी तुमचा प्रवास सुगंधी करतात. वॅलेन्सोलपासून तुम्ही हा रोड जर्नी सुरू करू शकता. क्षितिजापर्यंत पसरलेली आणि जर्द जांभळ्या फुलांनी डवरलेली लॅव्हेंडरची झाडं विशेषतः आसमंत भरून परिमळणारा त्यांचा सुगंध तुमच्या या रोड जर्नीला अविस्मरणीय करतो. या रूटवरची ग्लॉद, रुसिऑन सारखी गावे ग्रामीण फ्रान्सची नवी ओळख करून देतात. युरोपच्या जर्मनीमधील बवारिया प्रांतातला वुत्झबर्ग ते फुस्सन हा रस्ता ‘रोमँटिक रोड’म्हणून खास पर्यटन आकर्षण म्हणूनच डेव्हलप करण्यात आला आहे. हिरव्यागार अरण्यामधून, पहाडी प्रदेशातून जाणारा हा 350 किलोमीटर्सचा रोमँटिक रस्ता साउथ जर्मनीमधील एक मोठं पर्यटन केंद्र बनला आहे. मध्ययुगीन गावं, ऐतिहासिक कॅसल्स आणि हिरव्यागार विनयार्डस्‌‍मुळे या रस्त्यावरचा प्रवास म्हणजे जणू टाइम ट्रॅव्हल ठरतो. नॉर्वेमधील अटलांटिक ओशनच्या किनाऱ्यावरचा कोस्टल रोड, स्पेनमधील कोस्टा ब्रावा प्रांतातला कोस्टल रोड, स्वित्झर्लंडमधल्या आल्प्सच्या रमणीय पर्वतरांगांमधील फुर्का पास आणि ग्रिमसेल पास अशा माउंटन पासेसमधला रस्ता असे अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. या हॉलिडेसाठी तुम्ही शोफर ड्रिव्हन व्हॅन बूक करू शकता, त्याचप्रमाणे मोटरहोम्स म्हणजे कॅम्पर व्हॅनचा पर्यायही असतो. अशा व्हॅनमुळे तुम्ही युरोपमधल्या निसर्गरम्य परिसरात कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. सेल्फ ड्राइव्ह व्हेइकल भाड्याने घेऊन तुम्ही तुम्हाला हवा तसा कार्यक्रम आखून युरोपचा मनासारखा आनंद घेऊ शकता. मग यावर्षीचा युरोप हॉलिडे हा बाय रोड करून युरोपमधल्या लोकजीवनाचं आणि निसर्गाचं अधिक जवळून दर्शन घ्या. आणि हो काळजी करू नका तुमच्या दिमतीला आहेच वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडे टिम सदासर्वकाळ.

April 20, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top