IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Business hours

10am - 6pm

जम्प... डाईव्ह... ड्राईव्ह इटस् टाईम फॉर आफ्रिका!

10 mins. read

त्या दोघीही आफ्रिकन्स असल्या तरी तोडक्या-मोडक्या हिंदीत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या. बरं इतकंच नाही तर आपले आडनाव भारतीयच कसे आहे हेही मला पटविण्याचा प्रयत्न करीत होत्या. गेले दहा दिवस मी साऊथ आफ्रिकेत प्रवास करीत होते, आणि केपटाऊन हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. ही टूर सुरू झाल्यापासून जी गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली तीच गोष्ट प्रवासाच्या शेवटीसुद्धा मनाला स्पर्शून गेली... ती गोष्ट म्हणजे आफ्रिकन लोकांच्या वागण्यातील मायेची ऊब, आपलंसं करणारं आदरातिथ्य आणि त्यांचं भारताबद्दलचं प्रेम व कुतूहल.

माझे नाव नाइडू आहे आणि माझे सेनगुप्ता आपली ओळख करून देत, हसत-हसत त्या जुळ्या बहिणी माझ्याशी गप्पा मारत होत्या. ह्यात एरव्ही नवीन किंवा वेगळं असं काहीच नाही पण गम्मत अशी होती, की मी साऊथ आफ्रिकेच्या अतिशय सुंदर केपटाऊन शहरात वॉटरफ्रंट वरच्या एका फूडकोर्टमध्ये फिश अ‍ॅन्ड चिप्स विकत घेत होते, त्या रेस्टॉरंटमध्ये ह्या दोघी काम करीत होत्या. आणि त्या दोघीही आफ्रिकन्स असल्या तरी तोडक्या- मोडक्या हिंदीत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या. बरं इतकंच नाही तर आपले आडनाव भारतीयच कसे आहे हेही मला पटविण्याचा प्रयत्न करीत होत्या. गेले दहा दिवस मी साऊथ आफ्रिकेत प्रवास करीत होते, आणि केपटाऊन हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. ही टूर सुरू झाल्यापासून जी गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली तीच गोष्ट प्रवासाच्या शेवटीसुद्धा मनाला स्पर्शून गेली... ती गोष्ट म्हणजे आफ्रिकन लोकांच्या वागण्यातील मायेची ऊब, आपलंसं करणारं आदरातिथ्य आणि त्यांचं भारताबद्दलचं प्रेम व कुतूहल. पुढे मला कळले ह्या दोघी झिम्बाब्वेच्या नागरिक होत्या. त्या खरंतर शिक्षण आणि कामासाठी साऊथ आफ्रिकेत आल्या होत्या, इतर अनेक आफ्रिकन्ससारखंच त्यांनासुद्धा भारतीय संस्कृतीचे फार मोठे आकर्षण होते आणि जमेल तसे त्या भारताबद्दल माहिती गोळा करायचा प्रयत्न करायच्या, यामध्ये त्यांना मोठी मदत होत असेल ती बहुधा इथे इंग्रजी आणि झुलू भाषेत टीव्हीवर प्रसारीत होणारे बॉलीवूड सिनेमे आणि हिंदी टि.व्ही मालिकांची. आफ्रिकेला अप्रतिम निसर्गसौंदर्य तर लाभलेलंच आहे पण आफ्रिका आवडण्याचे आणि ह्या देशाच्या प्रेमात पडण्याचे खरे कारण हे तिथले लोक आणि त्यांचे अगत्यशील वागणे. खरंतर बरेचजणं आफ्रिकेला आपल्या पर्यटनाच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर ठेवतात. जाऊ कधीतरी,काय आहे एवढं पाहण्यासारखं तिथे असं म्हणत ह्या खंडाकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. पण मला जर विचाराल तर मी म्हणेन, आफ्रिकेत काय आहे म्हणण्यापेक्षा, तिथे काय काय नाहीय, अख्खं जग ह्या एका खंडात सामावलंय असं म्हटलं तर अतिश्योक्ती ठरणार नाही. ह्या आफ्रिका खंडाला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलंय. आपला बिलंदर हात अगदी अलगद निसर्गानं ह्या खंडावरनं फिरवलाय ह्याचा प्रत्यय येतो जेव्हा आपण इथे गेल्यावर पाहतो, एकसेएक नॅचरल वंडर्स, ड्रॅमॅटिक सीनरी, रिच फॉरेस्ट, मॉडर्न सिटीज् आणि विविध वंशांचा लाभलेला प्राचीन इतिहास व कलरफुल कल्चर. ह्यावेळेला मी व्हिझिट दिली ती रेन्बो नेशनला म्हणजेच साऊथ आफ्रिकेला. ही टूर म्हणजे खरंतर बिझनेस ट्रीप होती. अर्थात त्या निमित्तानं कॉन्फरन्समधनं मी भेटले ते आमच्या तिथल्या लोकल पार्टनर्सना, हॉटेल ओनर्सना आणि इतर डेलिगेट्सना.

आमची कॉन्फरन्स डर्बनमध्येच होती, तेव्हा ह्या टूरवरही अ‍ॅडव्हेंचरस अनुभव घेण्यासाठी मी सेल्फ ड्राईव्हचा पर्याय निवडला आणि ह्यामध्ये माझी एक मैत्रीणही सहभागी झाली. साऊथ आफ्रिकेत गाडी चालविण्यासाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालतं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारखंच साऊथ आफ्रिकेत राइट हॅन्ड ड्राईव्ह असल्यामुळे इथे ड्राईव्ह करणे आपल्या भारतीयांसाठी सोपे आणि सुरक्षित आहे. सगळा प्रोग्राम सेट झाल्यावर आम्ही आमचा प्रवास सुरू केला तो डर्बनहून जॉर्जच्या दिशेने, त्यासाठी आम्ही शॉर्ट फ्लाईटचा पर्याय निवडला. साऊथ आफ्रिकेच्या साऊथ-वेस्टर्न किनार्‍यालगत मोसल बे पासून पुढे पूर्वेकडे स्टॉर्म नदीपर्यंत जवळ-जवळ ३०० किलोमीटर लांबलचक पसरलेल्या गार्डन रूटवर नाइस्ना, प्लेटेनबर्ग बे, मोसल बे, सेजफील्ड, नेचर्स व्हॅली आणि जॉर्ज अशी रमणीय ठिकाणे आहेत. जॉर्जला पोहचल्यानंतर आम्ही नाइस्नाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला. ह्या रस्त्याची खासियत म्हणजे ह्या रस्त्याला बराच वेळ समुद्रकिनारा सोबत करत राहतो, एका बाजूला मोठ्या पर्वतरांगा आणि दुसर्‍या बाजूला अथांग- अवखळ समुद्र, त्या दोघांच्या मधनं जाणारी आपली गाडी आणि त्यात अशा संस्मरणीय प्रवासाचा आनंद घेणारे आपण. आम्ही इथल्या नाइस्ना या सुंदर समुद्रकिनारपट्टी लाभलेल्या छोट्याशा गावाला जोडलेल्या थीसेन आयलंडवर राहण्याचा पर्याय निवडला होता.

रात्रीच्या छान विश्रांतीनंतर दुसर्‍या दिवशी आम्ही निघणार होतो सित्सिकाम्मा नॅशनल पार्कला. सित्सिकाम्मा नॅशनल पार्क हा खळाळणारा अथांग सागर, खोल दर्‍या, अजस्त्र, अवाढव्य अशा विशिष्ट आकारात पसरून आकाशाला भिडू पाहणार्‍या बिग ट्री, यलोवूडसारख्या झाडांनी समृद्ध असलेला. हे नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे ते नयनरम्य समुद्रकिनारा, रीफ्स, नद्या, घनदाट जंगल अशा नैसर्गिक सौंदर्याने, तर पर्यटकांना ते नेहमीच आपल्याकडे खेचून घेतं ते हायकिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि तिथल्या अनेक थ्रीलिंग अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीजनी. पार्कमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही तिथल्या वेस्टर्न केपकडील नेचर व्हॅलीजवळच्या ब्लुक्रान्स ब्रीजच्या गेटमधनं आत गेलो. साऊथ आफ्रिकेच्या भेटीत तुम्ही जगातल्या सर्वात उंचावरच्या कमर्शियल बंजी जंपिंगचा थरारक आनंद अनुभवू शकता तो इथेच. हा ब्रीज फ्रेब्रुवारी १९८० ते जून १९८३ दरम्यान बांधला गेलाय, ब्लुक्रान्स नदीच्या वर तो जवळ-जवळ २१६ मीटर उंचीवर आहे. आम्ही खरंतर आमचं तिथलं बुकिंग केलं होतं ब्रीज वॉकसाठी. त्या वॉकमध्ये आम्ही ब्रीजखालून बंजी साइटपर्यंत, म्हणजेच ब्रीजच्या कमानीच्या शिखरापर्यंत चालण्याचा थ्रील अनुभवणार होतो. तो रस्ता फारच छोटा होता, थोडा धष्टपुष्ट माणूस तर केवळ एकटाच चालू शकेल इतका अरूंद. एका बाजूला भिंत, दुसर्‍या बाजूला जाळी, आणि मध्ये आपण, तो वॉक खरंच अ‍ॅडव्हेंचरस होता. अर्थात जर आपल्याला चालत जायचे नसेल तर झिपलाईनने म्हणजे जवळ-जवळ लटकून अधांतरी ब्रीजखालील मार्गावरूनही आपण जाऊ शकतो, त्यातही एक वेगळीच मजा असते. अशातर्‍हेने आम्ही वॉकचा आनंद घेत त्या बंजी साईटपर्यंत पोहोचलो, आणि काय वर्णावा तो क्षण, २१६ मीटर उंचीवरून दिसणारं ते दृश्य खरंच रोमांचकारी होतं, मग काय एका क्षणात जणू मला अ‍ॅडव्हेंचरने झपाटल्यागत मी झाले. काय होत होतं कळत नव्हतं पण एक अदृश्य शक्ती मला स्वतःला वार्‍यावर झोकून देण्यासाठी प्रवृत्त करीत होती. माझी मैत्रीण त्या हाय पॉइंटवर माझा तो अ‍ॅडव्हेंचरस अवतार बघून ओरडलीसुद्दा, तू वेडी झालीयस का? पण तिच्या त्या ओरडण्याने माझा बंजी जंपिग करण्याचा निर्धार अधिकच दांडगा बनला आणि मी ते धाडस करायचं ठरवून टाकलं. तिच्याकडे दुर्लक्ष करत तिथली फी देखील लागलीच भरून टाकली आणि बंजी जंपिंगसाठी तयार झाले. पण पुढच्या काही सेकंदात लक्षात आलं की ह्यासाठी फार काही तयारी करावी लागत नाही. एक बळकट रस्सी तुमच्या पायाला घट्ट बांधतात आणि कड्यावर उभं राहून फक्त आपल्याला उंचावरनं स्वतःला झोकून द्यायचं असतं, अर्थात माझ्याबाबतीतही असंच घडलं. त्या उंच कड्याच्या टोकाला प्रशिक्षकाचे, वन, टू, थ्री, बंजी... असे जादूई शब्द कानावर पडले आणि मी स्वतःला तिथून झोकून दिलं. जेव्हा उडी मारली तेव्हा सुरुवातीला काही क्षण हृदयाचे ठोके बंद झाल्यासारखे वाटले, पण माझ्या आत्मविश्वासानं कधीच माझ्यावरची पकड घट्ट केली होती, त्यामुळे ह्या भीतीला मी लगोलग मागे टाकलं. आणि डोळे उघडून पाहते तर काय मी एखाद्या पक्ष्याप्रमाणे हवेत जवळ-जवळ उडत होते, पाहिलं तर मी ब्रीजवरून बर्‍याच अंतरावर लटकत होते. तितक्यात माझी नजर मी सभोवतालच्या त्या निसर्गावर फेकली, मला तो माझ्याप्रमाणेच शांत भासला, जणू आम्ही दोघे एकमेकांना पहिल्यांदाच भेटताना जशी ओळख आपण करून घेतो तसं काहीसं आमच्यात ओळख करून घेण्याचे सोपस्कार करून घेत होतो. तो क्षण सर्वात मनाला शांतता देणारा ठरला एवढं मात्र नक्की. ते म्हणतात नं, की कधी-कधी गोष्टी उलट दिशेने पाहिल्या की त्यांच्यातला योग्य अर्थ उमजतो तो असा.

पुन्हा वेळ होती साऊथ आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या आकर्षणांनी भरलेला गार्डन रूट अनुभवण्याची. हया रूटवर      ड्राईव्ह करताना सर्वात मला भावले ते अचूक चित्रांनी योग्य मार्ग दाखवणारे साइनबोर्ड्स. खरंतर मी ड्राईव्ह करताना गाडी कितीच्या स्पीडवर आहे हे बघायलाही तिथे विसरले होते, हे नंतर माझ्या लक्षात आलं. अर्थात आजुबाजूचं सौंदर्य पाहताना आम्ही दोघीही गडून गेलो होतो म्हणूनच त्या मोकळ्या खुल्या रस्त्यावर भरधाव धावू शकणारी गाडी कासवाच्या वेगानंच मी हाकत होते ह्याची जाणीव झाल्यावर माझंच मला हसू आलं. कदाचित ते योग्यही होतं, कारण तिथे काही ठिकाणी ठराविक स्पीडच्यावर गाडी चालवली तर रितसर दंड भरावा लागतो. गार्डन रूटवर सगळ्यात जास्त माझ्या मनाला स्पर्शून गेलं ते इथलं ग्रुटबॉस नेचर रीझर्व्ह हे ठिकाण. आफ्रिका खंडाच्या शेवटच्या टोकाला जिथे दोन महासागरांचा संगम होतो आणि जगातील सहा फुलांच्या साम्राज्यांपैकी सर्वात लहान असं फुलांच्या साम्राज्याचं ठिकाण जिथे आहे, अशा ठिकाणी उंच टेकडीवर हा लॉज बांधलाय. साऊथ आफ्रिका जसं आपल्याला जमिनीवरच्या म्हणजे जंगलातल्या बिग फाईव्हची ओळख करून देते तसंच इथली वॉकर बे समुद्रकिनारपट्टी आपल्याला व्हाइट शार्क्स, व्हेल्स, सील्स, पेंग्विन्स आणि डॉल्फिन्स ह्या समुद्रातील मरीन बिग फाईव्हची ओळख करून देते. मग घोडयावर स्वार होऊन सबंध हील्सभोवती रंगबिरंगी फुलांच्या साम्राज्यातून फेरफटका मारत फ्लॉवर सफारी एन्जॉय करण्याचा आनंद असो की ऑर्गनिक गार्डनमध्ये भटकून, तिथे हॉर्टिकल्चर स्टुंडंट्सना भेटून आपल्या ज्ञानात भर घालणं असो की अगदी  इथल्या गार्डन रेस्टॉरंटवरील टेरेसवर बसून किंवा फॉरेस्ट लॉजच्या डेकवर बसून सभोवतालच्या पर्वतरांगांचा, अवखळ समुद्राचा मनमोहक नजारा अनुभवत ट्रेडिशनल ब्रांय आणि बार्बेक्यु पदार्थांचा आस्वाद घेणं असो... अशा अनेक एक्सपीरियन्सेसनी भरलेला इथला हॉलिडे हा नेहमीच एक परफेक्ट हॉलिडे ठरतो. म्हणूनच नॅशनल जीओग्राफिकचा युनिक लॉजेस ऑफ द वर्ल्ड हा किताब देऊन या लॉजला गौरविण्यात आलंय.

यानंतर आम्ही ड्राईव्ह करीत निघालो ते गोंडवाना रीझर्व्हच्या दिशेनं. नेहमी गेम ड्राईव्हला आपल्याला घेऊन जातात पण इथे प्रवेश करताच चेक-इनच्या आधीच आमची गेम ड्राइव्ह सुरू झाली, कारण चक्क प्रवेश केल्यानंतर लगेचंच तिथे आमचं स्वागत केलं ते  व्हाइट र्‍हयनोज्नी. त्यानंतर आम्ही इथल्या फ्रान्सेहोक आणि स्टालेनबोश ह्या वाईन टाऊन्सजवळूनही पास झालो. पुढे वाटेत एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही विश्रांतीसाठी उतरलो, ज्याचं नाव होतं हॅप्पी काऊ. जिथे आमचं स्वागत एका युरोपीयन वंशाच्या स्त्रीने केलं. जेव्हा आमच्याकडे पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की आम्ही भारतातून आहोत तेव्हा ती मिश्किलपणे म्हणाली, मला भारतीय स्त्रिया मुळीच आवडत नाहीत कारण त्या फार सुंदर दिसतात आणि खो-खो हसू लागली. त्यानंतर वातावरण एकदम बदलून गेलं अनं थोड्याच वेळात आम्ही छान गप्पा मारू लागलो. पाच मिनिटांच्या ब्रेकसाठी थांबलेलो आम्ही चक्क अर्धा तास तिथे बसलो आणि निघालो ते एक नवीन छान मैत्रीण बनवून. म्हणूनच आफ्रिका खंड हा निसर्गसौंदर्यासोबतच तिथल्या प्रेमळ, क्षणात आपलं मन जिंकणार्‍या आफ्रिकन्समुळे एक परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन ठरतो.

July 14, 2019

Author

Sunila Patil
Sunila Patil

Sunila Patil, the founder and Chief Product Officer at Veena World, holds a master's degree in physiotherapy. She proudly served as India's first and only Aussie Specialist Ambassador, bringing her extensive expertise to the realm of travel. With a remarkable journey, she has explored all seven continents, including Antarctica, spanning over 80 countries. Here's sharing the best moments from her extensive travels. Through her insightful writing, she gives readers a fascinating look into her experiences.

More Blogs by Sunila Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top