India
Toll free
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

Call us
You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals
Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business Hours

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

वुमन्स डे आऊट

3 mins. read
Veena Patil
Veena Patil
3 Mins Read
June 06, 2018
June 06, 2018

Quick Summary

NDJ Film World मध्ये जुलैपासून वीणा वर्ल्ड वेगवेगळ्या एक दिवसीय टूर संकल्पना सुरू करणार आहे.

Women’s Day च्या निमित्ताने 8 मार्चला Women’s Day Out ही एक दिवसीय सहल यशस्वीपणे राबवली गेली.

सुरुवातीला 300 महिलांचा प्लॅन होता, पण प्रत्यक्षात 1500 महिलांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रम पूर्ण भरला.

टूर मॅनेजर्स विवेक कोचरेकर आणि अमोल सलगर तसेच NDJ Film World आणि वीणा वर्ल्ड टीमच्या नियोजनामुळे सहल 100 टक्के यशस्वी झाली.

श्री. नितीन देसाई लवकरच NDJ Film World सर्वांसाठी खुलं करणार असल्याची आनंदाची बातमी आहे.

महिलांसाठी पुढील एक दिवसीय शेड्यूल महिन्याभरात जाहीर होणार असून आनंदाचा ब्रेक घेण्यासाठी ही उत्तम संधी आहे.

एनडीज् फिल्म वर्ल्ड
100% यशस्वी
जुलैपासून आम्ही सुरू करतोय वीणा वर्ल्ड पर्यटकांसाठी
एनडीज् फिल्म वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या ‘एक दिवसीय’ संकल्पना
फॅमिलीज डे आऊट l सीनियर्स डे आऊट

लव्हर्स (न्यूली मॅरिड) डे आऊट l सिंगल्स डे आऊट (Age 20-35)

आणि पुन्हा एकदा वुमन्स डे आऊट आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच श्री.नितीन देसाई एनडीज् फिल्म वर्ल्ड खुलं करीत आहेत,सर्वांसाठी. संपर्क: 2192 273 354

 

‘ती आली, तिने पाहिलं, तिला आवडलं आणि ती खूश झाली’ अशी परिस्थिती झाली एक नव्हे, दोन नव्हे, तर पंधराशे महिलांची. ‘वुमन्स डे’च्या निमित्ताने आठ मार्चला ‘वुमन्स डे आऊट’ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला मन:पूर्वक साथ मिळाली ती

श्री. नितीन देसाईंच्या एनडीज् फिल्म वर्ल्डची. महिन्याभरापूर्वी तीनशे महिलांना घेऊन जाऊया असा विचार करून आम्ही वुमन्स डे आऊट सहल जाहीर केली आणि ही एक दिवसीय सहल एका दिवसात फुल्ल झाली. एका सहलीच्या तीन सहली कराव्या लागल्या. तीनशे महिलांची आम्ही ठरवलेली संख्या पंधराशे झाली आणि अक्षरश: वीणा वर्ल्ड टीम आणि एनडीज् फिल्म वर्ल्ड टीम ह्या दोघांचीही झोप उडाली. दोघांचाही पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल ह्याची खात्री असतानाही थोडी धाकधूक होती. कारण एप्रिल-मे-जूनचा सीझन डोळ्यासमोर होता, हा प्रयत्न यदाकदाचित यशस्वी झाला नसता तर त्याचे सर्वत्र नॉट सो गूड पडसाद उमटले असते जे वीणा वर्ल्ड

वा एनडीज्साठी डेंजरस होते. पण एकदाका काम अंगावर घेतलं की ते कितीही जोखमीचं असलं तरी यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची अगदी शेवटपर्यंत ही संस्कृती वीणा वर्ल्डची असल्याने बाह्या सरसावून टीम कामाला लागली. सतत भव्य दिव्य आणि चांगलंच करण्याचा ध्यास घेतलेल्या एनडीज् फिल्म वर्ल्डची टीम सुद्धा तशीच असल्याने दोन्ही टीम्सची नाळ जुळली आणि शंभर नव्हे तर दोनशे टक्के यशस्वी झाली ‘वुमन्स डे आऊट’ ची संकल्पना. आता जगभरातल्या आणि भारतभरच्या सहली करताना अशा एकदिवसीय सहली करण्याचा आमचा हुरूप वाढलाय. एनडीज् फिल्म वर्ल्डसोबत अनेक संकल्पना आम्ही राबवित आहोतच पण ज्यांचं एनडीज् फिल्म वर्ल्ड बघून झालंय त्यांच्यासाठीही आम्ही वेगवेगळ्या एक दिवसीय संकल्पना आणीत आहोत. पंधराशे महिला शंभर टक्के खूश होण्यामध्ये किंवा त्यांना खूश करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता तो प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन करणार्‍या आमच्या टूर मॅनेजर्स विवेक कोचरेकर, अमोल सलगर आणि तिथे सर्व महिलांच्या दिमतीला असलेल्या आमच्या टूर मॅनेजर्सचा आणि त्यांच्या साथीला सदैव असणार्‍या वीणा वर्ल्ड ऑफिस टीमचा. आमच्या टीमने जे जे काही ह्या ‘वन डे आऊट’ सहलीच्या यशस्वीतेसाठी मागितलं ते ते सारं स्वत: नितीन देसाईंनी तिथे जातीने हजर राहून दिलं, त्यांच्या सुहास पांचाळ, गुरू पेेडणेकर, मुकुलदत्त शर्मा, हरिश पटेल, प्रवर आणि टीमने मनापासून त्याची कार्यवाही केली त्यामुळे हे अनोखं वेंचर यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही. खाली दिलेल्या काही फोटोजवरून आपल्याला महिलांनी केलेल्या धम्मालीची कल्पना येईल. अ‍ॅन्ड वुई प्रॉमिस, ‘असा एक एक दिवस वीणा वर्ल्ड निश्‍चितपणे तुमच्यासाठी घेऊन येतंय’. महिन्याभरात आम्ही हे शेड्यूल जाहीर करतोय. शेवटी धकाधकीच्या आयुष्यात, रोजच्या रुटीनमधून एक आनंदाचा हॅप्पी हॅप्पी ब्रेक तो बनता ही है ना!

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

You May also like

View all
Similarities between Korean and Tamil Culture
3 mins, read

Similarities between Korean and Tamil Culture

As the world gets connected more and more with technology, we are getting closer to different cultures. Earlier American and British movies and songs were available worldwide and everyone hummed to th

बॉर्डर
3 mins, read

बॉर्डर

‘हा व्हिसाच बंद झाला तर किती बरे होईल ना!’ असे पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाला नेहमीच वाटत असते. व्हिसाच काय, देशांमधल्या ह्या बॉर्डर्सच नसत्या तर किती बरे झाले असते, असंही बर्‍याचदा वाटून

न्यूझीलंड टू न्यूयॉर्क
3 mins, read

न्यूझीलंड टू न्यूयॉर्क

नवीन वर्षाचं स्वागत करायला उगवत्या सूर्याचा देश, ‘लँड ऑफ द रायझिंग सन-जपान’ कसा वाटतो तुम्हाला? की भारतात जिथे सूर्याची किरणं प्रथम पडतात ते अरुणाचल प्रदेश, म्हणजेच नॉर्थ ईस्ट तुम्हाला खुणावतंय? सर्वा

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

150+ Veena World Offices
Locate Us
Request a Quote
1800 313 5555
Connect with us

© 2013 - 26 Veena Patil Hospitality Pvt Ltd. All Rights Reserved.

Payments on website are secure

Scroll to Top