IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

वुमन्स डे येतोय हॅलो गर्ल्स! कुठे आहात तुम्ही?

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 18 February, 2024

डर के आगे जीत है’ ही एक छान टॅगलाईन कोणत्यातरी सॉफ्टड्रिंकच्या जाहिरातीतली. हल्ली आपण आरोग्याकडे किंवा हेल्दी फूडच्या पाठी असल्याने सॉफ्ट ड्रिंक्स वा पॅकेज्ड फूड वर्ज्य करतो आणि ते चांगलंच आहे म्हणा. आरोग्य उत्तम ठेवणं हे बर्‍यापैकी आपल्या हातात आहे, हे तसं बर्‍याच उशीरा कळलं पण ज्याक्षणी कळलं त्या क्षणापासून सुरुवात करायला हवी तशी आम्ही केली. सर सलामत तो पगडी पचास. शक्यतोवर औषधाविना आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा. हेल्दी रहायचं शरीराने आणि मनाने म्हणजेच विचारांनी, आणि हाच आमचा पाया आहे वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल टूर्सचाही. हसूया, नाचूया, गाऊया, बागडूया, नटूया, सजूया, घराची गावाची शहराची राज्याची देशाची सीमा ओलांडूया, आत्मविश्वासाने एकएक पाऊल पुढे टाकूया, आयुष्याला आनंदी बनवूया. घरातही उत्साहाचं कारंजं लावूया.

पुर्वी बर्‍याचदा वुमन्स स्पेशल टूर्सवर महिलांना भेटायला लेहलडाखपासून लंडनपर्यंत, शिमल्यापासून सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत, ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कुठेही जिथे वुमन्स स्पेशल सुरू असेल तिथे मी जात असे. प्रचंड प्रवास केलाय पण कधी दमले थकले नाही कारण ह्या प्रत्येक टूरवर महिला ज्या तर्‍हेने एन्जॉय करायच्या, सहलीवर जो काही सळसळता उत्साह दिसायचा तो बघून मला शक्ती मिळायची. नऊवारीतून पाचवारी, पाचवारीतून पलाझो, चुडिदार मधून जीन्स, जीन्समधून स्कर्ट आणि चक्क स्विमिंग कॉश्च्युम घालून पूलमध्ये मनसोक्त डुंबणार्‍या महिलांची ट्रान्सफॉर्मेशन्स बघून मिळणार्‍या आनंदाला परिसीमा नव्हती.

खरंतर मला ह्या सर्व महिलांचे आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी उर्जा दिली. माझ्या आयुष्याला आणि व्यवसायाला अर्थ दिला. कमर्शियली व्यवसाय होत असतो. पण तो करीत असताना जे एक प्रकारचं समाधान मिळावं लागतं ते ह्या वुमन्स स्पेशलने दिलं. इतक्या वर्षांमध्ये महिलांना चौकटीबाहेर येऊन मुक्त आनंद घेताना बघून आपण समाजाची एक गरज भागविण्यामध्ये छोटंसं का होईना योगदान दिल्याचं समाधान मिळालं. ‘मी एकटी कशी बाहेर फिरायला जाऊ? लोक काय म्हणतील?’ मुलांना आणि पतीला सोडून एकटी मजा कशी करू? ह्या टॅबू मधून बाहेर यायलाच बरीच वर्ष लागली. प्रत्येक टूरवर माझ्या आणि महिलांच्या संवादात एकच सांगणं असायचं, ’मुलगी शिकली प्रगती झाली’ हे आपल्याला माहित आहे पण ’मुलगी आनंदी झाली तर घर आनंदी होतं सर्वार्थाने’ तेव्हा ह्या मुलीला पर्यटनाच्या माध्यमातनं आनंद देण्याचा हा प्रयत्न आहे. स्वत:ला गिल्टमध्ये टाकू नका. तुम्ही घराबाहेर येताय, धम्माल करताय ही तुमची गरज आहे. पर्यटन हा आपला चार्जर आहे. जमेल तसं तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून किमान एकदातरी असं स्वत:ला चार्ज करायचं आणि मग हसतहसत आयुष्याला सामोरं जायचं.

महिला हळूहळू त्या अपराधी वाटण्याच्या मानसिकतेतून बाहेर आल्या. नंतरचं आमचं लक्ष्य होतं ते घरच्यांना महिलेच्या ह्या पर्यटनाकडे सहृदयतेने बघण्यासाठी प्रवृत्त करण्याचं, कारण इथे दबंगशाही नव्हती. जे काही करायचं ते प्रेमाने. ‘केल्याने देशटन... मनुजा चातुर्य येतसे फार’ ह्या उक्तीप्रमाणे महिला एकट्या पर्यटन करू लागल्या. त्यांच्यातल्या स्वागतार्ह्य बदलाचे पडसाद घरात उमटू लागले. घरातला आनंद वाढायला लागला आणि मग, ’तू एकटी जाणार?’, ’तू आम्हाला सोडून कशी जाऊ शकतेस?’, ’आम्ही नाही बाबा असे मुलांना आणि नवर्‍याला सोडून भटकायला जात’, ’काय मेलं ते भटकायचं खूळ डोक्यात भरलंय’, ’असे पैसे उधळायला लाज नाही वाटत?’... अशा आणि ह्यापेक्षा टोकाच्या कमेंट्स घराघरातून कमी व्हायला लागल्या. टोमणे मारणारी शेजारीण किंवा रिश्तेदारही हळूहळू वुमन्स स्पेशलवर यायला लागल्या. घरातल्या मंडळींना वुमन्स स्पेशलच्या टॉनिकची महती कळली आणि घरातली चिडचीड वाढायला लागली की, ’अगं तुला आता बाहेर जायची गरज आहे’ असं घरातले म्हणायला लागले आणि आम्ही भरून पावलो. आता घरातली मंडळी वुमन्स स्पेशलची टूर गिफ्ट देताहेत.

2006 साली म्हणजे सतरा वर्षांपूर्वी पहिली वुमन्स स्पेशलची संकल्पना मी राबवली, यशस्वी केली आणि वीणा वर्ल्ड झाल्यानंतर तर आत्ता दर आठवड्याला किंवा दररोज वुमन स्पेशलद्वारे महिला देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपर्‍यात मुक्त विहार करीत असतात, धम्माल करतात, मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करून घेतात. हवे तसे मस्त मस्त कपडे घालतात, सिनेस्टार्सप्रमाणे मोठ्ठे गॉगल्स लावतात, असंख्य फोटोज काढतात, स्वत:वर प्रेम करतात आणि ’आय अ‍ॅम द क्वीन’ ’मीच माझी राणी’ चा रुबाब मिरवतात. हे सगळं करीत असताना आणि होत असताना वुमन्स स्पेशल कधीही ‘चीप‘ झाली नाही तसंच डीसेन्सी आणि एलिगन्सची पातळी कधी सोडली नाही म्हणूनच वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलच्या एवढ्या सहली भारतात आणि जगात सतत सुरू आहेत.

आठ मार्च येतोय. आपला वुमन्स डे! म्हणजे प्रत्येक दिवस आपलाच असतो, पण पर्यटनाला निघायला काहीतरी बहाणा पाहिजे नं. मग आम्ही वुमेन्स डे‘ च्या निमित्तानं जास्तीत जास्त महिलांना ह्या आनंदाच्या नव्या रंगात न्हाऊन निघायला सांगतो. त्यासाठी अथक तयारी करतो. आमच्या ऑफिस टीम्स आणि टूर मॅनेजर्स सज्ज असतात ही ’दे  धम्माल’ घडवून आणायला. ह्या वुमेन्स डे ला आम्ही घेऊन आलोय देशविदेशातले साठहून अधिक टूर ऑप्शप्स. ह्यामध्ये महिला युरोपला जायचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करू शकतात किंवा ऑस्ट्रेलियाच्या महाखंडाची वारी करू शकतात किंवा जपान कोरियाची अद्भुत दुनिया बघू शकतात किंवा चक्कं आपल्या इनक्रेडिबल इंडियाच्या ट्रॅव्हल मिशनमधली बघायची राहून गेलेली राज्य पूर्ण करू शकतात.

सतरा वर्षांनंतर म्हणजे अ‍ॅक्च्युअली गेल्या वर्षी वुमन्स स्पेशलच्या टूर्समध्ये आम्ही काही आणखी चांगले बदल करायला सुरुवात केली. जिथे शक्य आहे तिथे राफ्टिंग, कायाकिंग, हायकिंग, ट्रेकिंग, डेझर्ट सफारी, वाइल्ड लाइफ सफारी, जेटबोट राइड, सनसेट क्रुझ, सायंटिफिक मसाज ह्या गोष्टींचा समावेश केला. भारतीय भोजनासोबत लोकल फूडचाही आस्वाद द्यायला सुरुवात केली. पुर्वी आम्ही भारतीय भोजन सर्वत्र द्यायचा आग्रह करायचो पण आता आपल्या भारतातच जगभराचं क्विझिन उपलब्ध झाल्यामुळे आपली टेस्ट डेव्हलप झाली आणि मग ’लोकल फूडही द्या आम्हाला त्या त्या ठिकाणचं’ ह्याची डिमांड वाढायला लागली आणि आम्ही ते बदलही केले. वेगवेगळे एक्स्पीरियन्सेस, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिविटिज्, फॅशन शो, रॅम्प वॉक ह्या अ‍ॅक्टिविटिज्नी वुमन्स स्पेशल टूर्स आणखी हॅपनिंग झाल्या. टूरवर येणार्‍या मैत्रिणी मैत्रिणी आणि फॅमिली गर्लगँगचे ग्रुप्स वाढू लागले. आणि वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल एक लक्झरी न राहता महिलांची गरज बनली.

सो, चलो गर्ल्स, ह्या वुमन्स डे ला मिळून सार्‍याजणी देश विदेश पालथे घालूया, आत्मविश्वास वाढवूया, दृष्टीकोन व्यापक बनवूया, धम्माल करूया, भविष्यासाठी अनमोल आठवणींची साठवण करूया आणि आयुष्य हसत-खेळत झेलूया... कधी मॉरिशसच्या निळ्याशार समुद्रावर तर कधी लेह लडाखच्या हिमालयी उत्तुंगतेसोबत, कधी अमेरिकेच्या फ्रीडम लँडमध्ये तर कधी इंग्लंडच्या राणीच्या दिमाखात, कधी युरोपच्या अद्वितीय सौंदर्यासोबत तर कधी थायलंडच्या फेसाळत्या समुद्रावर.. चला बिनधास्त! लेट्स ब्रेक बॅरिअर्स अ‍ॅन्ड रॉक द वर्ल्ड!

(टूरवर येताना एकट्या असलात तरी डोन्ट वरी, कारण तुम्हाला रूम पार्टनर द्यायची गॅरंटी वीणा वर्ल्डची, त्यामुळे नो एक्स्ट्रॉ चार्ज)


Veena World Travel Mission

सप्तखंडांना भेट देणं हे आयुष्यभराचं मिशन असतं. सर्वसाधारणपणे पर्यटक आपल्याच म्हणजे  आशिया खंडापासून सुरुवात करतात. प्रथम भारतात, नंतर साऊथ ईस्ट एशिया असं आशियामधल्या पर्यटनाला सरावताना सतत बॅक ऑफ द माईंड किंवा डोळ्यासमोर दिसत असतो तो युरोप खंड. एकदा युरोप बघून डोळे तुप्त झाले की आपल्याला साद ऐकू येऊ लागते ती एकाचवेळी दोन खंडांची. देश आणि खंड दोन्ही ज्यात सामावलेत तो ऑस्ट्रेलिया आणि जगाला ओढ लावणारा नॉर्थ अमेरिका, खासकरून त्यातला देश द युनायडेट स्टेट्स ऑफ अमेरिका. बहुतेक पर्यटकांचे हे चार खंड आरामात होतात. उरलेले तीन खंड म्हणजे आफ्रिका, साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका. त्यातला आफ्रिका खंड आपल्याला जवळ आहे आणि तसं बघायला गेलं तर तिथे जाणं तेवढं अवघडही नाही. पण अजूनही आपणा भारतीयांकडून तसा थोडा दुर्लक्षित म्हणता येईल असाच हा खंड. आफ्रिकन डेलिगेशन्स किंवा तिथले असोसिएट्स जेव्हा भेटतात किंवा आमच्याकडे येऊन प्रेझेंटेशन्स करतात आणि आग्रहाने बोलावतात त्यांच्या देशात तेव्हा त्यांचा एक प्रश्न असतो. ’आमच्या देशांना युरोप अमेरिकेमधून लाखो टूरिस्ट येत असतात. आम्ही काय करू म्हणजे भारतीय टूरिस्टसुध्दा ऑफ्रिकेकडे एक ‘मस्ट व्हिजिट डेस्टिनेशन‘ म्हणून बघतील?’ त्यांना आमचं एकच सांगणं असतं, जे जाऊन आलेयत त्यांना आफ्रिकतले तुमचे हे देश खूपच आवडतात. आल्यावर ते इतरांना आश्चर्याने सांगतात, ’आम्हाला माहितच नव्हंत आफ्रिका एवढं सुंदर असेल, आम्ही खूपच उशिरा गेलो आफ्रिकेला’. त्यामुळे तुम्हाला सर्व आफ्रिकन कंट्रीजना एकत्र येऊन किमान वर्षभर सातत्याने आफ्रिका टूरिझम किती पुढे गेलंय, आफ्रिकेत काय काय बघण्यासारखं आहे ह्यावर एक मोठ्ठं अवेअरनेस कॅम्पेन करायला पाहिजे. भारतीयांना ओढ वाटली पाहिजे  अमेरिका ऑस्ट्रेलियासारखी आफ्रिकेलापण जायची. सो मंडळी आफ्रीका स्वस्तही नाही पण अति महागही नाही झालंय तोपर्यंतच बघून घेऊया. त्यानंतर मग अप्रतीम साऊथ अमेरिका आणि अद्वितीय अंटार्क्टिका आहेच. या महिन्यात अंटार्क्टिकाला दोन टूर्स सुरू आहेत आणि पुढच्या महिन्यात साऊथ अमेरिकेला टूरवर पर्यटक धम्माल करणार आहेत.

सो, आप भी लगे रहो अपने ट्रॅव्हल मिशन की ओर!

#VeenaWorldTravelMission


माय हजबंड

इज नॉट माय टूर मॅनेजर

अगं उठ, चल पटाटप, आपला ड्राईवर बाहेर आला असेल’...हॅलो हॅलो, आय अ‍ॅम आशिष, हॅड बूक्ड अ कार बट आय अ‍ॅम नॉट फाईंडिंग इट हियर’&व्हेअर टू ईट टुडे? यस्टरडेज् रेस्टॉरंट वॉज नॉट गूड’&हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽ नो बडी इज लिसनिंग, अवर फ्लाइट गॉट कॅन्सल्ड, वुई आर स्टक हियर, हॅलो, हॅलो’...हे आहेत हनिमून टूरवरचे काही डायलॉग्ज, जिथे दस्तुरखुद्द नवरोजी टूर मॅनेजरची भूमिका बजावत असतात. त्यांच्या डोक्याला कितीही नाही म्हटलं तरी ह्या चिंता असतात. विमानतळावर तो माणूस आपल्याला घ्यायला नक्की येईल नं? उद्या अकरा वाजताची आयफेल टॉवरची अपॉईटमेंट आहे, आपली गाडी वेळेवर येईल नं तिथे घेऊन जायला? माझ्या पुढच्या हॉटेलने रिझर्वेशन नाकारलं तर काय करू? वेळेवर पोहोचु नं एअरपोर्टवर? फ्लाइट कॅन्सल झालं तर? एक ना अनेक काळज्या.

कमॉन! हनिमून है यार, बी स्ट्रेस फ्री, वीणा वर्ल्ड है ना! वीणा वर्ल्डकडे आहेत दोन प्रकार. एक, हनिमून टूर्स आणि दुसरा कस्टमाईज्ड हनिमून हॉलिडे. कस्टमाईज्ड हनिमून प्रकारात दोन भाग आहेत, एक रेडिमेड पॅकेज आणि दुसरा टेलरमेड म्हणजे तुम्हाला हवा तसा तुमच्या मनाप्रमाणे एनिव्हेअर अराऊंड द वर्ल्ड असा हॉलिडे. हनिमून टूर्स हा प्रकार मात्र ऐकल्यावरच अनेकांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उभं करतो. हनिमून आणि टूरसोबत? अरे हनिमून इज सपोज् टू बी अ प्राईव्हेट अफेअर, हाऊ कॅन इट बी विथ अ ग्रुप टूर? अगदी रास्त आहेत हे प्रश्न पण वस्तुस्थिती अशी आहे की गेली दहा वर्ष आम्ही ह्या हनिमून टूर्स अगदी छान प्रकारे आयोजित करतोय, हजारो हनिमूनर्सनी वीणा वर्ल्ड हनिमून टूर्सची मजा अनुभवलीय अँड दे आर हॅप्पी अबाऊट इट! एकतर काय होतं की हल्लीचे हनिमूनर्स म्हणजे फारच बीझी बीझी. वेळ कुठे आहे प्लॅनिंग बिनिंग करायला. त्यामुळे वीणा वर्ल्डचं ट्रॅव्हल प्लॅनर बघायचं, हनिमून टूरचं डेस्टिनेशन ठरवायचं, बुकिंग करायचं आणि निर्धास्त व्हायचं. लग्नाच्या कामांमधलं एक काम कमी म्हणजे डोक्यावरचं थोडं तरी ओझं हलकं झाल्यासारखं. दुसरा फायदा ह्या टूर्सचा तो म्हणजे हनिमून टूर असल्याने ह्याची किंमत रीझनेबल असते. विमानप्रवास, हॉटेल वास्तव्य, साइटसिइंग, ब्रेकफास्ट, लंच डिनर, इंटरनॅशनल टूर असेल तर व्हिसा वैगरे वैगरे सर्व समाविष्ट असतं. आणि ह्याहीपेक्षा महत्वाच्या दोन गोष्टी हनिमून टूर्समध्ये असतात. पहिली गोष्ट म्हणजे अनेक हनिमूनर्सची कंपनी. तुम्हाला जेव्हा मित्रमैत्रिणींशी बोलावसं वाटतं तेव्हा तुमच्या साथीला असतात तुमच्यासारखेच, तुमच्या वयाचेच, भविष्याकडे मोठ्या कुतुहलाने बघणारे हनिमूनर्स. त्यामुळे सहलीवरचा माहोलच बदलून जातो. हसी मजाक, कधी डान्स नाईट तर कधी कँडल लाइट डीनर, कधी गेम नाइट, तर कधी दे धम्माल आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज्. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हनिमूनर्सच्या दिमतीला असतो वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर. हल्ली जग खूपच अनप्रेडिक्टेबल झालंय. तेव्हा आपण बाहेर फिरत असताना हक्काचं आपलं कुणीतरी काळजी घेणारं असावं लागतं, ते काम आम्ही करतो. तुम्ही बिनधास्त धम्माल करा तसंच तुमच्या दोन्हीकडच्या आईबाबांनाही निर्धास्त असू द्या आणि त्यांना काळजी नसणार आहे कारण तुम्ही वीणा वर्ल्डच्या हनिमून टूरवर आहात. सो, चलो बॅग भरो, निकल पडो!


माईंड बॉडी अँड सोल

फटिग, बर्नआऊट, एक्झॉशन, कोलॅप्स, डिप्रेशन, अँग्झायटी... हे शब्द हल्ली खूप प्रमाणात ऐकायला मिळताहेत. म्हणजे ह्या इंग्रजी शब्दांचा वापर आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर करतोय की हेच शब्द मराठी वाटायला लागले आहेत. फास्ट पेस्ड वर्कलाइफ, कॉम्पिटिशन, टार्गेट, परफॉर्मन्स, ग्रीड, वॉन्टस् ह्या सगळ्याचा एकत्रित असा परिणाम आहे तो. सायकॅट्रिस्ट किंवा सध्याचा  शब्द म्हणजे ’थेरपिस्ट’ची गरज भासायला लागलीय खास करून तरुण पिढीला. ’वर्क-लाइफ बॅलन्स’ हा अगदी घिसापीटा शब्द झालेला असला तरी ते एक पूर्णसत्य आहे. काळाजी गरज आहे. ज्याला हा समतोल जमला त्याने बाजी जिंकली आणि त्यासाठीच आवश्यक आहे बॉडी -माईंड डीटॉक्स, हेल्दी लाइफस्टाइल, स्पिरिच्युअल लाइफस्टाइल, बॅक टू नेचर, वेलनेस, इत्यादि गोष्टींची. आणि त्यातच मग आमची आठवण होते. म्हणजे वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्ची. आम्ही गमतीत म्हणतो, आयुष्य थोडं जरी निरस वाटायला लागलं तर उठा, निघा, बाहेर पडा, फिरा... जस्ट चेंज द अ‍ॅक्टिविटी. जे करताय त्यातून काही मिनिटांचा, तासांचा, दिवसांचा ब्रेक घ्या. रीज्युविनेट व्हा आणि नव्या दमाने, नवीन उत्साहाने कामाला लागा.

रीज्युविनेशन हा बिझनेस आहे. आम्हीही त्याच्याशी जोडलेलो आहोत. पर्यटन हा रीज्युविनेशनचाच भाग आहे. पर्यटनाला जाताना एक अनोखा उत्साह असतो आणि परत आल्यावर एक समाधानी आनंद. कस्टमाईज्ड हॉलिडे घेऊन वैयक्तिकरित्या फॅमिली आणि फ्रेंडससोबत जाणार्‍या पर्यटकांना त्यांच्या मनासारखा हॉलिडे आम्ही डिझाइन करून देत असतो आणि ते जेव्हा हॉलिडेवर असतात तेव्हा आमची कस्टमाईज्ड हॉलिडेवाली टीम 24/7 व्हर्च्युअली त्यांच्या दिमतीला असते. आता तर असे वैयक्तिकरित्या जाणारे अनेक छोटे मोठे फॅमिली फ्रेंड्सवाले ग्रुप्स टूर मॅनेजर्सही मागून घेतात. म्हणजे त्यांना हवा तसा हॉलिडे त्यांनी आमच्याकडून करून घेतलेला असतो पण तिथे गेल्यावर स्वत: सगळ्याचं अवधान ठेवण्यापेक्षा टूर मॅनेजर दिमतीला घेतात आणि कोणत्याही टेंशनशिवाय हॉलिडेचा मनसोक्त आनंद घेतात. ह्या कस्टमाईज्ड हॉलिडेज्मध्ये सध्या डिमांड वाढतेय ती वेलनेस हॉलिडेची. कम्प्लीट रीज्युविनेशन. अर्थात त्यासाठी बजेटही बर्‍यापैकी ठेवावं लागतं. पण इट्स वर्थ इट म्हणण्याइतंक रीज्युविनेशन आपण मिळवू शकतो. जगाच्या पाठीवर इतके उत्कृष्ट वेलनेस रीसॉर्टस असतात की काही विचारू नका. आपला भारतही ह्यात मागे नाही बरं का आणि का नसेल, आपली संस्कृतीच त्यावर आधारित आहे. जगातल्या उत्तमोत्तम वेलनेस रीट्रीट्समधली काही नावं इथे खास नमूद कराविशी वाटतात ती म्हणजे स्वित्झर्लंडचं शिनॉ पॅलेस वेगीस, थायलंडमधल्या को सामुईचं कामालया, पार्तुगालचं विलालारा लाँजिटिव्हिटी थॅलासा आणि मेडिकल स्पा, माराक्वेश मोरोक्को मधलं मँडरिन ओरिएन्टल, जिनिव्हा लेकच्या काठावरचं क्लिनिक ल प्राइरी, न्यूझीलंडचं आरो हा, ऑस्ट्रियातलं स्टान्गलवर्ट ग्रीन स्पा रीसॉर्ट, ग्रीसमधलं युफोरिया रीट्रीट, आपल्या ऋषिकेशचं आनंदा, बालीचं सुखावती आयुर्वेदिक रीट्रीट आणि स्पा... ही यादी न संपणारी आहे.

कुणाच्याही आयुष्यात कधीही ’आजारी’ ह्या कारणास्तव वेलनेस रीट्रीटला जायची वेळ न येवो पण आजारी पडू नये म्हणून जर एखादी निकोप जीवनशैली आत्मसात करायची असेल तर जरूर अशा वेलनेस रीट्रीट्सची वाट धरा. आम्ही आहोतच म्हणजे वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् आहेच बाकी सर्व गोष्टी सुकर करण्यासाठी. सो डोन्ट वरी.. बी हॅप्पी!..हकुना मटाटा!


अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

परिकथेत वर्णन केलेला देश जर प्रत्यक्षात पाहायचा असेल तर आपल्या शेजारच्या भूतानला अवश्य भेट द्यावी, कारण हिमालयाच्या अंगाखांद्यावर वसलेला हा चिमूकला देश त्याच्या अनेक वैशिष्ट्यांनी खरोखरच चकित करतो. भूतान हा जगातला पहिला देश आहे ज्याने देशाची समृध्दी ‘जीडीपी‘ म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टवर न मोजता ‘ग्रॉस नॅशनल हॅप्पिनेस‘वर मोजायला सुरुवात केली. कदाचित या देशात जगात सर्वात उशिरा म्हणजे फक्त २५ वर्षांपूर्वी टेलिव्हिजनचा प्रवेश झाला, त्यामुळेही इथले नागरिक अधिक आनंदी असतील!

निसर्गसंपदेचं लेणं लाभलेल्या या देशातली ६०% हून अधिक जमीन वनाच्छादित आहे. प्रदूषणकारी उद्योगांना या देशात बंदी असल्याने, हा देश चक्क कार्बन निगेटिव्ह ठरला आहे.१९७४ पर्यंत या देशात परदेशी पर्यटकांना प्रवेशच नव्हता. आताही येणार्‍या पर्यटकांना ‘एन्व्हॉयर्न्मेंट टॅक्स’ भरल्याशिवाय भूतानमध्ये पर्यटन करता येत नाही. ‘आर्चरी ’ म्हणजे ‘धनुर्विद्या’ हा या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. भूतानचे चलन ‘गुल्ट्रूम’ हे भारतीय रुपयाशी जोडलेलं असल्याने, तुम्ही भूतानमध्ये भारतीय रुपये देऊन मनमुराद शॉपिंग करू शकता. आपल्या महाराष्ट्राच्या एक दशांश आकाराचा हा देश नद्यांवर जलविद्युत प्रकल्प चालवतो आणि तयार होणारी वीज भारताला विकतो. तिबेटी भाषांच्या कुळात मोडणारी ‘झोंगका’ ही भूतानची राष्ट्रीय भाषा आहे. ही भाषा लिहीण्यासाठी जी लिपी वापरतात तिला ‘छोके’ म्हणतात, ही लिपी अभिजात तिबेटी लिपीसारखीच आहे. भूतानमध्ये बौध्द धर्म रुजलेला आहे. भूतान देशातील नागरीकांना ‘द्रिग्लाम नामझा’ म्हणजे ‘शिस्तबध्द वर्तनाचे नियम’ यांचे पालन करावे लागते. यामध्ये नागरिकांनी नेहमी पारंपरिक पोशाखच केला पाहिजे इथपासून ते घरे-इमारती-कार्यालये बांधताना पारंपरिक वास्तुशैलीतच त्या बांधल्या पाहिजेत पर्यंत अनेक नियम येतात.

भूतानमध्ये अजून तरी रेल्वे मार्ग नाहीये, मात्र भारत सरकारच्या सहकार्याने भारत-भूतान या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. भारतातून भूतानला हवाई मार्गाने जायचे असेल तर ‘ड्रूक एअर’ या एकमेव एअर कंपनीची सेवा उपलब्ध आहे. ही भूतानची राष्ट्रीय हवाई सेवा देणारी कंपनी आहे. भूतानच्या सेनेत नौदल आणि हवाई दल नाही फक्त भूदल आहे. भूतानच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी भारताची आहे तसेच भूतानी लष्कराला प्रशिक्षण देण्याचे कामही भारतीय सेनाच करते. भूतान मध्ये संविधानिक राजेशाहीला संसदीय लोकशाहीची जोड देऊन देशाचा कारभार चालविला जातो. इतिहासकाळापासून राजघराण्याच्या अमलाखाली असलेल्या या देशाचा लोकशाहीतला प्रवास २००८ च्या निवडणुकांमुळे सुरू झाला. हिमालयातील निसर्गापासून ते परंपरा आणि रिवाजांपर्यंत सारं काही आत्मियतेनं जपणार्‍या या आपल्या आनंदी शेजार्‍याला भेटायची संधी दवडू नका. वीणा वर्ल्डकडे भूतान सहलीचे अनेक पर्याय आहेत, त्यातला हवा तो निवडा आणि ह्यावर्षी निघा भूतानला.


काय बाई कसं गं खाऊ!

भारतासारख्या विशाल देशामध्ये प्रांतांनुसार बदलणारी भाषा आणि बदलणारे पदार्थ काही नवीन गोष्ट नाही. पण युरोपमधल्या स्वित्झर्लंडसारख्या छोट्याशा देशात जेंव्हा वेगवेगळ्या भाषा प्रचलीत असतात तेंव्हा त्यांचा प्रभाव तिथल्या खाद्य संस्कृतीवर इतका पडतो की त्यातल्याच एका पदार्थावरून दोन भाषिक प्रदेशांमधलं अंतर दाखवलं जातं. चीज आणि चॉकलेटसाठी जगप्रसिध्द असलेल्या स्वित्झर्लंडची राष्ट्रीय डिश आहे ‘रॉस्ती’. हा पदार्थ म्हणजे आपल्या मराठी बटाट्याच्या किसाची स्विस आवृत्ती म्हणता येईल. रॉस्तीसाठी बटाटे अर्धवट उकडून किंवा कच्चेच घेऊन त्यांचा किस काढायचा, हा किस पॅनमध्ये शिजवायचा, शिजवताना बटर किंवा चीज वापरायचं, चवीप्रमाणे मीठ मिरपुड घालायचं आणि शिजवताना त्याला एकसंध थालिपिठासारखा आकार द्यायचा. काही वेळा पॅटीसच्या आकारातही रॉस्ती बनवला जातो. पारंपरिक पध्दतीमध्ये फक्त बटाटाच वापरला जातो पण नंतर त्यात कांदा, चीज, बेकन, सफरचंद आणि फ्रेश हर्बज् घालायला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे रॉस्ती बनू लागले. मुळात बर्न प्रांतातल्या शेतकर्‍यांच्या न्याहारीत हा पदार्थ बनवला जात असे. आता हा रॉस्ती ब्रेकफास्टपासून ते डिनर पर्यंत कोणत्याही खाण्यात साइड डिश म्हणून सर्व्ह केला जातो. सर्वेलास (स्विस सॉसेज) किंवा लेबरकेझ (बीफ,पोर्क,बेकनपासून बनवलेला पाव) यासोबत रॉस्ती खाल्ला जातो. हा पदार्थ जर्मन भाषक स्विस प्रदेशात उगम पावलेला असला तरी आता संपूर्ण देशात मिळतो. जर्मन भाषिक स्विस आणि फ्रेंच भाषिक स्विस यातील भौगोलिक सिमारेषा सांगताना ‘रॉस्ती ग्राबेन ’ म्हणजे ‘रॉस्तीची दरी ’ असाच शब्द प्रयोग स्वित्झर्लंडमध्ये प्रचलित आहे. मग वीणा वर्ल्डच्या स्वीस टूरमध्ये सहभागी होऊन, रॉस्तीचा आस्वाद घ्यायची संधी दवडू नका. देश विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast

February 17, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top